PM Kisan Samman Nidhi Yojana 2021

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणारी PM Kisan Samman Nidhi Yojana 2021 राबविण्यात येत आहे.तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या ४६ हजार २५८ आहे .लाभार्थ्यांना दर चार महिन्यांंना प्रति लाभार्थी २ हजार प्रमाणे वर्षाला ६ हजार दिले जातात. आतापर्यंत कोट्यवधी रूपये वितरित करण्यात आले आहेत.सामान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजनेला काहींनी सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.परंतु शासनाने अशांना शोधून वसुलीचा बडगा उगारला आहे.आणि भरणा केला नाही तर फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2021

अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ लाभ घेतलेल्या रक्कम शासनास परत करावी अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंढे व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 1.15 लाख कोटी रुपये 10.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे.

आपण PM-Kisan Scheme योजना काय आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, PM-Kisan nidhi चा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं, इतकंच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती जाणून घेणार आहोत.

PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात.

सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. असं असलं तरी घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक – या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.

CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं. शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

Read  LIC Kanyadaan Policy | एलआयसी कन्यादान पॉलिसी

ऑनलाईन नोंदणी कशी करायची? PM Kisan Samman Beneficiary Status2021

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pm kisan असं गुगलवर सर्च करावं लागेल. त्यानंतर PM-Kisan Samman Nidhiची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की 7 पर्याय तुमच्यासमोर येतात. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.

या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे. captcha म्हणजे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही, तर माणूस आहात, हे तुम्हाला तुम्ही ज्या मशीनवर फ़ॉर्म भरता त्या मशिनीला (फोन किंवा कॉम्प्युटर) पटवून द्यायचं असतं. त्यासाठी captchaमधील आकडेवारी किंवा अक्षरं जशीच्या तशी समोरच्या रकान्यात लिहायची असतात.

त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केलं की Record not found with given details असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेजखाली असलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?” असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही,

तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का, असा होतो. त्याखाली असलेल्या YES या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.त्यानंतर एक पानी रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.

यात सुरुवातीला state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

त्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.

त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.

आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.

यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर Land Holdingमध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Read  PAN CARD true or false? | Pancard खरेआहे का बनावटी कसे शोधावे?

त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे. आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे.

हे टाकून अॅड बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते. आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.

सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं.

आता पाहूया पीएम-किसान योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं बघायचं ?

हप्ता जमा झाला की नाही? PM Kisan Samman Nidhi Yojana

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता. ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.आतापर्यंत PM-Kisanचे 5 हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

आधार संबंधित दुरुस्ती कशी करायची?

पीएम-किसान योजनेत नाव नोंदवताना आधार कार्डसंबंधीची माहिती चुकली असेल, तर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमधील Edit Aadhar Failure Record या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक आणि captcha टाकून सर्च या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

Read  Solar Penal Yojana online Form 2022 | सोलर पैनल योजना ओनलाईन फॉर्म २०२२ .

त्या पेजवर आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेली दुरुस्ती तिथं नोंद होईल. आता आपण बघणार आहोत की या योजनेसाठी आपल्याला कशाची गरज आहे २५ डिसेंबर २०२० रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि 9 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18,000 कोटी रुपये हस्तांतरित केले”

पंतप्रधान किसान निधी ही भारत सरकारच्या, केंद्र सरकारची एक योजना आहे. देशातील सर्व भूधारक शेतकरी कुटुंबांना शेती व त्यासंबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजा संबंधित विविध साधनांच्या आर्थिक गरजा भागविण्याकरिता त्यांना मिळकत आधार मिळवून देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत लक्ष्यित लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित करण्याचे संपूर्ण आर्थिक उत्तरदायित्व भारत सरकार घेईल.

प्रधान किसान योजनेसाठी निकष व पात्रता

१)शेतकर्‍यांना भारताचे नागरिक असले पाहिजेत.

२)शेतकर्‍यांचे जमीन आकार २ हेक्टरपेक्षा जास्त नसावा.

३)जन धन बँक खाते क्रमांक, आधार आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.

४)भूमी अभिलेख तपशील.

५)सामाजिक वर्गीकरण (अनुसूचित जमाती / अनुसूचित जमाती).

६).डेटा बेस मध्ये जमीन मालकाचे नाव असावे.

७)मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरलेला सर्व व्यक्ती पात्र नाहीत.

१)कामगारांना स्थानिक

पंतप्रधान किसान सन्मान निधी :-

“२५ डिसेंबर २०२० रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ९ कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात १८,००० कोटी रुपये हस्तांतरित केले”

पंतप्रधान किसान निधी ही भारत सरकारच्या, केंद्र सरकारची एक योजना आहे. देशातील सर्व भूधारक शेतकरी कुटुंबांना शेती व त्यासंबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजा संबंधित विविध साधनांच्या आर्थिक गरजा भागविण्याकरिता त्यांना मिळकत आधार मिळवून देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत लक्ष्यित लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित करण्याचे संपूर्ण आर्थिक उत्तरदायित्व भारत सरकार घेईल.

पंतप्रधान किसान योजना १ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती, त्याकरिता एकूण ७५,००० कोटी बजेट आहे. पीयूष गोयल यांच्या पुढाकार मध्ये 2019 च्या वर्षात हा प्रस्ताव जाहीर जाहीर केला होता. हे अर्थसहाय्य व्यक्तीला अर्थसंकल्प मधून, दर वर्षी देण्यात येईल. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

PM Kisan Samman Nidhi Yojna Information

१) प्रधान किसान योजनेसाठी निकष व पात्रता

२) पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी कशी करावी

३) ऑनलाइन नोंदणीसाठी पायर्‍या

४) प्रधानमंत्री संमान साठी आवश्यक असणारी आवश्यक कागदपत्रे

५) शेतकऱ्यांसाठी काही इतर महत्त्वाच्या आणि तत्सम योजना.

प्रधान किसान योजनेसाठी निकष व पात्रता :-

१)शेतकर्‍यांना भारताचे नागरिक असले पाहिजेत.

२)शेतकर्‍यांचे जमीन आकार 2 हेक्टरपेक्षा जास्त नसावा.

३)जन धन बँक खाते क्रमांक, आधार आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.

४)भूमी अभिलेख तपशील.

५)सामाजिक वर्गीकरण (अनुसूचित जमाती / अनुसूचित जमाती).

६) डेटा बेस मध्ये जमीन मालकाचे नाव असावे.

७)मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरलेला सर्व व्यक्ती पात्र नाहीत.

९)सर्व निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन 10,000 रुपये पेक्षा जास्त आहे ते पात्र नाहीत.

पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी कशी करावी? How to Apply PM Kisan Samman Nidhi Yojana

1.कामगारांना स्थानिक महसूल अधिकारी (पटवारी) किंवा नोडल ऑफिसर (राज्य सरकारद्वारे नामित)
यांच्याकडे जावे लागते.

2.राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकता – http://pmkisan. gov. in

ऑनलाइन नोंदणीसाठी पायऱ्या :-

1.http://pmkisan.gov. in एन्टर किंवा क्लिक करा.

2.नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा . उजव्या बाजूच्या पहिल्या पर्यायात.

३.फक्त आधार क्रमांक आणि प्रतिमा मजकूर प्रविष्ट करा जे प्रतिमेच्या मजकूरामध्ये आहे.

पंतप्रधान निधीसाठी आवश्यक असणारी आवश्यक कागदपत्रे :-

-नागरिकत्व प्रमाणपत्र

-जमीन धारण कागदपत्रे

-आधार कार्ड
-बँक खात्याचा तपशील

पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे काय?

हे केंद्र सरकारचे नियंत्रण आहे, या योजनेत सरकार तुम्हाला सर्व भारतीय शेतकऱ्यांना ६,००० रूपये चा लाभ देईल.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचे एकूण बजेट

पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी एकूण अर्थसंकल्प ७५,००० कोटी आहे.

PM Kisan Samman Nidhi योजनेसाठी पात्रता

शेतीयोग्य जमीन असलेल्या सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे.

पी. एम. निधी योजनेचे फायदे Benefits of PM Kisan Samman Nidhi Yojana

या योजनेअंतर्गत सरकार कुटुंबाला वर्षाकाठी 6,000 रुपये देईल म्हणजेच दर चार महिन्यांत प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात भरपाई दिली जाईल.

 

Leave a Comment