अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 22 जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. कोणते ते बावीस जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे सविस्तर या लेखामध्ये बघूया.
Ativrushti Madat 2021 हे 22 जिल्हे अतिवृष्टी मदतीसाठी आहेत पात्र
जुलाई 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान करिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत अशाप्रकारचा शासन निर्णय 6 ऑक्टोबर 2021 चा आहे.
यानुसार जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे, जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्यानुसार एकूण तीन लाख 36567.00 लाख अक्षरी रुपये तीनशे 65 कोटी 67 लाख फक्त इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
आणि हाच मदत निधी आहे तो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशाप्रकारे जीआर मध्ये म्हटले गलेले आहे.
22 जिल्ह्यांची नावे व मदत
ठाणे 142 लाख, पालघर 98 लाख, रायगड 267 लाख, रत्नागिरी 183 लाख, सिंधुदुर्ग 141 लाख कोकण एकूण 851 लाख.
नाशिक 1 लाख नाशिक एकूण 1 लाख.
पुणे 366 लाख सातारा आठशे एक लाख सांगली 5275 लाख कोल्हापूर 8570 लाख एकूण पुणे विभाग 15012 लाख.
बुलढाणा 37 लाख अकोला 8436 लाख वाशिम 153 लाख अमरावती 2396 लाख यवतमाळ 829 लाख एकूण अमरावती 19841 लाख.
जालना 200 लाख, उस्मानाबाद 19 लाख, नांदेड 3036 लाख परभणी 4542 लाख एकूण औरंगाबाद 7797 लाख.
नागपूर 250 लाख चंद्रपूर 799 लाख गडचिरोली 16 लाख एकूण नागपूर 1065 लाख
एकूण मदतनिधी 36567.00 हा निधी जिल्हा कार्यालयावर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होईल.