शेतकऱ्यांसाठी रस्त्याबाबत खूप मोठ्या भानगडी निर्माण होतात. एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. हा रस्ता मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? तर चला मग पाहूया
शेतासाठी रस्ता मिळण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार, तुम्ही दुसऱ्याच्या शेतातून 100% रस्ता मिळवू शकता.
तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला तहसीलदारांकडे तक्रार नोंदणी अर्ज सादर करावा लागेल की, आम्हाला या शेतातून जाण्यासाठी रस्ता पाहिजे किंवा आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा.
या तक्रारीवर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल आणि अर्जासोबत तुम्हाला कोणत्या बाजूने रस्ता पाहिजे. याचा कच्चा नकाशा लावावा लागणार आहे. तसेच आणखी एक म्हणजे की, तुमची शेतीची शासकीय मोजणी झालेली असेल तर त्याचा नकाशा लावावा लागेल तसेच तीन महिन्याच्या आतील सातबारा तुम्हाला या अर्जाला जोडावे लागेल.
शेताच्या बाजूच्या किंवा ज्या शेतातून रस्ता पाहिजे, त्या शेती विषयी काही माहिती असेल तर ती माहिती अर्जासोबत जोडून तो अर्ज तहसिलदाराकडे सादर करावा. हा अर्ज तहसीलदारांकडे गेल्यानंतर तहसीलदार त्या शेतकऱ्याला अधिकृत नोटिसा पाठवतो.
त्यांना तारीख देतात. ह्या नोटिसा पाठवल्यानंतर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार दिलेल्या दिनांकाला तिथे प्रत्यक्षपणे येऊन पाहणी करतात व सर्वप्रथम तुम्हाला खरच रस्त्याची गरज आहे का? पूर्वीच्या मालकाचा रस्ता कोणता होता, हे पाहिले जाते.
तुमच्या शेतात जाण्यासाठी जवळचा रस्ता कोणता आहे हे पाहतात. रस्ता किती फुटाचा आहे? तुम्हीच या रस्त्याची मागणी करत आहात त्यासाठी तुम्हाला दुसरा रस्ता आहे का, याची सर्व पाहणी करतात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतात रस्ता तयार करण्यासाठी काही नुसकान होते काय याची सर्व दक्षता घेतली जाते.
दोन्ही दोघांची बाजू लक्षात घेऊन तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यावर आपला निर्णय ठरवतात. जर खरोखरच तुम्हाला रस्त्याची गरज आहे आणि त्यासाठी इतर कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नसेल तर तुम्हाला तिथूनच मार्ग काढून देतील.
पायवाटीचा रस्ता असेल तर 8 फुटाचा रस्ता तुम्हाला मिळेल, अशी काही तरतूद आहे. गाडी वाटेचा 8 ते 12 फुटाचा रस्ता हा देखील असेल तर अशी सुद्धा एक तरतूद आहे. शेजारच्या शेतकऱ्याचा नकार असेल परंतु तुम्हाला खरच रस्त्याची गरज असेल तर तुम्हाला तुम्हाला हे रस्ते जमीन महसूल अधिनियमानुसार मिळू शकतात.
“तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा”.