Ativrushti Nuksan Bharpai Nidhi | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर

Ativrushti Nuksan Bharpai Nidhi अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता सक्रिय….! माहिती जाणून घ्या. मित्रांनो, 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी बांधवांसाठी मदतीचा वाटप करण्यासाठी राज्यातील जिल्ह्यासाठी 1035 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे, याचे साधारपणे वाटप कधी होऊ शकतं. याबद्दलची माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण पाहीलं की 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये ठिकाणी नुकसान झाले आणि त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शासन निर्णय घेऊन मदतीचे वाटप करणे संबंधातील एक मदत केली आणि जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी 75% मदतीसाठी यापूर्वी शासन निर्णय घेऊन ये मदत वितरित करण्यात आलेली होती आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागले होते तुमचे उर्वरित 25% मदतीची.

मित्रांनो, याच्यासाठी साधारणपणे हजार ते दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज पडू शकते. अशा प्रकारची वारंवार माहिती शासनाच्या माध्यमातून दिले जात होते आणि मित्रांनो याच मदतीसाठी यात 25% निधीसाठी 1035 कोटी रुपये निधीचे वितरण अधिकारी मंजुरी देण्यात आले आणि यांच्या संबंधातील अनेक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णयची ही माहिती पुढील प्रमाणे.

Read  शेतकरी आंदोलन-"जनता कर्फ्यु"

ऑगस्ट-सप्टेंबर 2021 कालावधी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान यासाठी यापूर्वी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आपण जर पाहिलं तर जिराईत क्षेत्रासाठी 10, 000 रुपये, फळबागांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे बागायती क्षेत्रासाठी 15,000 रुपये प्रति हेक्‍टर या दरानुसार बाधितांना मदत देण्याकरता अधिकारी शासन निर्णय घेण्यात आला होता. याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या हप्त्यापोटी 1035 कोटी रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी मदतीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी मदतीचा वितरण करण्यासाठी यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यासाठी एकूण 97 लाख रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 20 कोटी रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे. तर नागपूर विभागातील नागपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यासाठी मिळून 1900.47 लाख एवढा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. याचप्रमाणे औरंबाद विभागासाठी आपण जर पाहिलं तर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड लातूर आणि उस्मानाबाद या औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यासाठी 1763.75 कोटी एवढा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे.

Read  Mukhyamantri Sahayata Nidhi 2023 | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना २०२३ .

याप्रमाणे आपण अमरावती विभागाचं पाहिलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम या पाच जिल्ह्यांसाठी मिळून 95 कोटी एवढा निधी वितरित केला जाणारा असून बुलढाण्याला कुठले प्रकारचा निधी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केला जाणार नाही. त्याचप्रमाणे आपण नाशिक विभागासाठी जर पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळून एकूण 154.39 कोटी निधी या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. एकंदरीत एकूण राज्यासाठी आपण पाहिलं तर 23 जिल्ह्यासाठी 1035 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे.

अशाप्रकारे मंजुरी देऊन वरती दाखवलेल्या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी 1035 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. मित्रांनो या मदतीचे वाटप झाल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात यावा अशा प्रकारची माहिती स्वतः शासन निर्णयामध्ये याठिकाणी देण्यात आलेले आहे. असा प्रकारची माहिती शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

Read  Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 घरकुल योजना यादी

मित्रांनो, शासन निर्णय घेऊन आणि वितरित करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले त्यानंतर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात करण्यासाठी साधारणपणे मार्चचा पहिला किंवा दुसरा आठवडा सुद्धा या ठिकाणी लागू शकतो.

तर मित्रांनो गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लाभार्थी ज्या निधी अनुदानाची प्रतीक्षा करत होते. अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून याच्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. याचबरोबर यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या 75% मदतीचे याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या या याद्या सुद्धा आपण आपल्या जिल्ह्याच्या संकेत स्थळाचे पाहू शकतात.

Ativrushti Nuksan Bharpai Nidhi ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतर शेतकरी बांधवांना ही शेअर करा.

Leave a Comment