Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना

Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना  https://shetkaree.com/bhausaheb-phundakar-falbag-lagvad-100-anudan-yojana/

 नमस्कार शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ती ही शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे.  सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन येते जसे की,  शेतीची अवजारे ट्रॅक्टर,  कृषी,  सिंचन याकरिता अनुदान देण्यात येते.  महाराष्ट्रात सण 1990 पासून रोजगार हमी योजनेची निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून,  या योजनेअंतर्गत अर्थ सहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारण केलेल्या अल्प व  अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरिता दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे,  अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत अनुदानास पात्र राहता येईल. महाराष्ट्रात 80% अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांना जॉब कार्ड नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन 2022 पर्यंतच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चय केले आहेत. आणि ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पिक याचबरोबर फळबाग शेतीला ही प्रोत्साहन मिळणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2018 ते 19 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना लाभ देण्यात येणार आहे.                                                                                                                                                                                                                   या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 टक्के तर दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा तीन वर्षात देण्यात येणार आहे.  लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के असणे गरजेचे आहे.  हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्यांनी स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे. अशाप्रकारे शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान तीन वर्षात फळबाग लागवडीवर मिळणार आहे.Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

Read  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra 2023 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र 2023.

या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी दहा गुंठे तर जास्तीत जास्त दहा हेक्टर इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त सहा हेक्टर क्षेत्र मर्यादित असणे आवश्यक आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अल्प व अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्रथम प्राधान्य दिले गेले आहे.

Pratibha Joshi Age,biography,Birthdate,instagram, family & More

या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

Read  solar Panal Yojana Maharashtra 2023 | सोलर पैनल योजना महाराष्ट्र २०२३ .

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या नवीन आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी रुपये सहा कोटी अर्थसंकल्प निधीची तरतूद करण्यात आली होती. याच अर्थसंकल्प तरतुदीच्या 20% म्हणजेच एक कोटी वीस लाख एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी 17 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली सदर निधी शासन निर्णय कृषी विभाग,  कृषी आयुक्तालय यांना वितरित करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे.Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता :-

लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.

सर्व प्रवर्ग अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.  व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.

Read  Post Office PPF scheme | पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना

वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देय आहे.  संस्थात्मक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार च्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर सातबारा असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.

सातबारा वर कुळाचे नाव असल्यास गुळाचे संमती असणे आवश्यक आहे.

Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची उद्दिष्टे :-

या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याचबरोबर फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समाविष्ट असलेली पिके

आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, आणि अंजीर.

Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

या योजनेतील नाविन्यपूर्ण बाबी म्हणजे :-

कलमानद्वारे लागवड.

घन लागवडीचा समावेश

ठिबक सिंचन अनिवार्य

शेतकऱ्यांचा सहभाग समाविष्ट बाबी  :-  शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे म्हणजे जमीन तयार करणे, खत मिश्रण आणि खड्डे भरणे,  कुंपण करणे,  खाते देणे, आंतरमशागत करणे इत्यादी.Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment