(Cash Limit At Home 2023) (घरामध्ये किती रक्कम ठेऊ शकतो २०२३) कोणतेही घर असो घरामध्ये पैसे ठेवावे लागतात कारण पैशाची कधी व कुठे गरज पडेल हे सांगता येत नाही घरामध्ये पैसे ठेवण्याची परंपरा ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे कारण पैशाची गरज हे कधी व कोठे असेल हे सांगता येत नाही म्हणून घरामध्ये पैसे असणे अत्यंत आवश्यक आहे. पण यालाही एक लिमिट आहे म्हणजे आपण घरामध्ये पैसे एक प्रमाण पर्यंतच ठेवू शकतो. आज-काल खूप बँक आहे चांगल्या ऑफर्स देतात म्हणजेच तुमच्या पैशावर व्याज देतात तरीही पैसा हा घरामध्ये थोड्या प्रमाणात ठेवावाच लागतो कारण कधी कधी बँक बंद असतात आणि आपले काम होण्यापासून राहते व कधीकधी पैशाची गरजही भासते. पैसा हा कोठे व कसा कमी पडेल हे सांगता येत नाही
मात्र घरामध्ये किती कॅश ठेवावी याच्यावरही एक बंधन आहे. असा प्रश्न नेहमी कोणाला कोणाला पडला असेल. तरी याचे उत्तर आहे की आपण घरामध्ये कितीही केस ठेवू शकतो त्याला कोणतेही बंधन नाही. आणि याची माहिती आयकर विभागाला कळवण्याची ही गरज नाही पण या रकमेबद्दल इन्कम स्त्रोत काय आहे या संदर्भातील माहिती आपल्याकडे असावी व याच्याशी निगडित कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये कॅश आहे तेवढी कॅश कुठून आली व त्याबद्दल आपल्याकडे प्रूफ असणे गरजेचे आहे याबद्दल आपल्याकडे पुरावे असावे. बाकी आपण आयकर विभागाला माहिती दिली नसली तरीही चालेल पण याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असणे गरजेचे आहे.
हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल की एखाद्या व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसा सापडला म्हणजेच केस सापडले असता त्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला तर छापेमामध्ये मिळणारे खूप सारे पैसे याचं काय केलं जाते. यामध्ये माहिती अशी आहे की अधिकारी या संबंधित छापेमारी करून घरातील कॅश आणि मौल्यवान वस्तू या एकत्र करतात आणि कागदपत्रांची तपासणी करून त्या वस्तू चेक करतात आणि घर मालकाला त्याबद्दल विचारपूस करतात.
यामध्ये आयकर विभागाने छापीमारी केली असता मिळालेल्या रकमेबद्दल सोर्स काय आहे याबद्दलची माहिती आयकर विभाग हे घर प्रमुखाला विचारते आणि याचे उत्तर घर मालकाला देणे बंधनकारक असतात. आणि या रकमेबद्दल योग्य कागदपत्र ही दाखवणे घरमालकाला गरजेचे असते याबद्दल घरमालकाला काही सांगता नाही आले किंवा कागदपत्रे ही अर्धवट असतील तर घरमाल गाभार मोठ्या प्रमाणात दंड लावला जातो. आयकर विभागाच्या कायद्यानुसार घरामध्ये जेवढ्या प्रमाणात केस सापडल्या जाते त्याच्या 137% रक्कम दंड म्हणून घरमालकाला भरावी लागते जर घर मालकाला उत्तर देता आले नाही तर एवढी मात्र त्याला भरावी लागते. यावर असे सांगता येईल की जेवढी केस सापडली आहे तेवढी आणि त्यावर त्याच्या 37% कॅश हे घरमालकाला आयकर विभागाला द्यावी लागेल
या पोस्ट मधून आपल्याला माहिती मिळालीच असेल की आयकर विभागाने छापा टाकला असता त्यांना काय हवे असते व आपल्याला कॅश किती प्रमाणात घरात ठेवता येते व याबद्दल ठोस पुरावे असणे गरजेचे आहे ते नसल्यास आपल्याला किती दंड भरावा लागतो याबद्दलही आपणास माहिती मिळालीच असेल धन्यवाद !