CWC PAK vs ENG Match | पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध किती धावा काढाव्या लागतील?

CWC PAK vs ENG Match – आज पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध आपला अंतिम सामना खेळणार आहे, परंतु हा सामना पाकिस्तानला करो या मरो आहे.  फक्त एवढेच नाही तर पाकिस्तानला फार मोठ्या फरकाने इंग्लंडला हरवावे लागणार आहे.  या अगोदर पाकिस्तानने आपल्या मॅच हारल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे,  परंतु आता आजच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध किती धावा काढाव्या लागतील किंवा किती रन्स ने इंग्लंडला हरवावे लागेल, हे गणित पाहूया.

आजचा सामना पाकिस्तान हरला तर आजच पाकिस्तानला क्रिकेट वर्ल्डकप 2023 संपणार आहे. श्रीलंका न्यूझीलंड विरुद्ध हरली त्यामुळे पाकिस्तानच्या पुढच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला आहे. जर श्रीलंका चांगल्या फरकाने जिंकली असती तर पाकिस्तानच्या आशा आजच्या सामन्यांमध्ये पल्लवी झाल्या असत्या त्यांना फार कमी फरकाने न्यूझीलंडला हरवावे लागणार असते. परंतु आता चित्र बदलले आहे.

Read  अवैधरीत्या देशी दारूची दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडले; गुन्हा दाखल

पाकिस्तानला काय करावे लागेल?..

जर पाकिस्तानला सेमी फायनल मध्ये खेळायचे असेल तर नाणेफेक जिंकावी लागेल तरच पाकिस्तान न्युझीलँड वर हावी होऊ शकतो. सुरुवातीला बॅटिंग घेऊन 400 ते 500 रन पाकिस्तानला काढावे लागतील आणि त्यानंतर इंग्लंडला 287 रनांनी हरवावे लागेल तरच पाकिस्तान सेमी फायनल मध्ये जाऊ शकतो.

पाकिस्तान नाणेफेक हरले आणि इंग्लंडने भावांचा डोंगर उभा केला तर पाकिस्तानला इंग्लंडला फक्त 3 ते 4 ओव्हर मध्येच हरवावे लागेल. तरच पाकिस्तान नेट रन रेट मध्ये न्युझीलँड च्या पुढे जाऊन सेमी फायनल मध्ये पोहोचेल परंतु याची शक्यता कमी आहे.

पहिला पर्याय पाकिस्तानसाठी चांगला आहे नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करून चारशे ते पाचशे धावा पाकिस्तान ने काढल्या तरच पाकिस्तान सेमी फायनल मध्ये जाण्याची शक्यता अधिक असेल.

Read  Kanya Sumangal Yojana Maharashtra Online Form 2023 | कन्या सुमंगल योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म 2023.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment