Draksh Lagwad Mahiti Marathi | द्राक्ष लागवड माहिती

Draksh Lagwad Mahiti Marathi – द्राक्ष पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे.  द्राक्ष ही अतिशय गोड आणि रसाळ असल्यामुळेत्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.  तसेच द्राक्षापासून अनेक पदार्थ बनत असल्यामुळे प्रक्रिया उद्योगामध्ये द्राक्षांना खूप जास्त मागणी आहे. द्राक्ष हे एक सर्वोत्तम प्रकारचे फळ पीक असल्यामुळे त्याची निगा राखणे आणि योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. जेव्हा द्राक्षबाग वाढीस पोषक असे वातावरण तयार होते त्यावेळी काडीची परिपक्वता ही शेवटच्या टप्प्यात असते.

Angur Draksh Sheti Lagwad | द्राक्ष बागेतील फळे छाटणी व त्यानंतर करायचे व्यवस्थापन

बऱ्याच वेळी पाऊस जास्त प्रमाणात झाला असेल किंवा पावसाळी वातावरण असल्यास भागात वाढलेल्या आद्रतामुळे वेलीच्या वाढीचा जोम हा जास्त प्रमाणात झाल्यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाऊ शकते अशा परिस्थितीत द्राक्ष बागेचा शेंडा पिंचिंग करून त्याची जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून व पूर्तता करावी.

काडीची परिपक्वता ओळखण्यासाठी जे काळी कापल्यानंतर तिच्या आतील भागात जितका जास्त तपकिरी भागअसेल तितकी काडी चांगल्या तऱ्हेने परिपक्व झाली असे समजावे काडीची परिपक्वता झाली असल्यास त्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.


 फळ छाटणीनंतर पानगळ करणे –

बागेत खरड छाटणीनंतर लवकर व एकसारख्या फुटी मिळण्याकरिता महत्वाचे म्हणजे काडीवरील डोळे तपासायला हवे हा डोळा जितका जास्त वेळ उन्हात राहील तितका व्यवस्थित व त्याचा परिणाम बागेमध्ये फुटी निघण्यास होईल याकरिता बागेमध्ये पानगळ करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनीही पानगळ फळ छाटणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर करणे गरजेचे असते . हाताने केलेली पानगळ व रासायनिक पदार्थाचा वापर करून केलेली पानगळ यापेक्षा मजूर मिळत असतील तर उत्तम नाहीतर रासायनिक पदार्थांचा म्हणजेच फवारणीचा वापर आपण येथे करू शकतो

त्यासाठी इथेफोन या रसायनाचा वापर 3 ते 3.5 मी.ली.लिटर याप्रमाणे शेतकऱ्यांनी करावा बागेत कॅनोपी जास्त असल्यामुळे जवळपास 450 ते 500 लिटर पाण्याचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे रसायनाचा वापर करत असताना फवारणीचे पाच-सहा दिवस आगोदरच बागेत पाण्याचा ताण दिला गेलेला असावा असे केल्यावर पाणगळ चांगली
घडून येण्यास मदत होते.

* द्राक्ष बागेची व्यवस्थित छाटणी घेणे –

Read  SheliPalan Yojana Maharashtra 2022 | शेळीपालन योजना महाराष्ट्र २०२२ .

द्राक्ष बागेची छाटणी घेण्याकरिता डोळे फुगलेले असणे महत्त्वाचे आहे आणि अशाच परिस्थितीत फळ छाटणी घ्यावी अन्यथा दोन ते तीन दिवस पुन्हा थांबावे त्यासाठी सरळ काळी व सबकेन अशा दोन प्रकारच्या काड्या बागेमध्ये दिसून येतील. ह्या काड्या शक्यतो डोळे तपासणी अहवाल नुसारच छाटून घ्यावेत जर ही सुविधा उपलब्ध नसल्यास शेतकरयांना यापूर्वीचा अनुभव नक्कीच कामात येऊ शकतो शेतकऱ्यांनी यामध्ये सबकेन काडीवर शेजारी एक डोळा राखूनच छाटणी करून घ्यावी तर सरळ काडी असलेल्या बागेत काडीवर ज्या ठिकाणी दोन झाडांमधील अंतर कमी असेल अशा ठिकाणी छाटणी केली तरी चालेल.

* खताचा वापर करणे -Angur Draksh Sheti Lagwad 
                                                                                                                                                                                            खताचा वापर करतेवेळी पाऊस झाला असल्यास मातीच्या कणांमध्ये पाणी जमा झालेले दिसून येईल त्यामुळे चारी घेणे शक्य होत नसल्यास फक्त दोन वेलीमध्ये ड्रीपर च्या खाली थोडेफार गडडे करुन त्यामध्ये महत्त्वाची खते टाकून द्यावीत यामध्ये सिंगल सुपर फास्फेट 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, डीएपी 50 किलो, फेरस सल्फेट दहा किलो असे एकरी प्रमाण घेऊन त्यावर हलकासा मातीचा थर झाकून घ्यावा यामुळे पिकास आवश्यक असलेले अन्नद्रव्यांची पूर्तता केली जाईल

सोबतच वेलीची पांढरी मुळी सुद्धा तयार होण्यास मदत होईल ती कार्यवाही फळ छाटणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर करावी कारण चारी घेणे किंवा बोद त्यामुळे वेळीच यामुळे काही प्रमाणात तुटणार त्यापासून नवीन मूळ तयार होणे व ती मुळे कार्यरत होणे या गोष्टी करता कालावधी आवश्यक आहे.

* द्राक्ष बागेसाठी हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करणे –

Read  Sheli Palan Yojana Yadi 2023 | शेली पालन योजना यादी २०२३ .

                                                                                                                                                                                       द्राक्ष बागेत फळ छाटणीनंतर काडी एकसारखी व लवकर फुटण्याकरिता पांढरी सोबतच हायड्रोजन सायनामाईड चॅटिंग सुद्धा महत्त्वाचे आहे काडीची जाडी नुसार तसेच वातावरणातील तापमानानुसार हायड्रोजन सायनामाईड चा वापर करणे गरजेचे आहे.

हायड्रोजन सायनामाईड चे द्रावण फवारण्या अगोदर काडीची जाडी आठ ते 10 मि.ली. असेल अशा परिस्थितीमध्ये 40 मि.ली. हायड्रोजन सायनामाईड फवारणीसाठी पुरेसे असते. द्राक्ष बागेत काडी जर या पेक्षा जास्त जाड असेल तर त्यांनी वेलींना पुन्हा काड्यांना पुन्हा एकदा तितक्याच मात्रेचे पेस्टिंग करून काडीला दिल्यास त्याचे चांगले परिणाम डोळे फुटण्यास दिसून येतील. अशाप्रकारे द्राक्ष बागेत हायड्रोजन सायनामाईड चे पेस्टिंग उपयुक्त ठरते.

* द्राक्ष बागेत डोळे फुटण्याच्या अवस्थेमध्ये –

द्राक्ष बागेत खरड छाटणी घेतल्यानंतर17 ते 18 दिवसांनी डोळे पूर्णपणे पडलेले दिसतील या अवस्थेला पोंगा अवस्था म्हणतात या अवस्थेत बागेमध्ये पाऊस नसायला पाहिजे त्यामुळे वेलीत जिबरेलिंन चे प्रमाण वाढते त्याचाच परिणाम आपल्याला घडावर दिसून येईल या वेळी बागेत बोदामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला हवी याकरिता दोन ओळींमध्ये लहान चरी घेतल्यास बोदा मध्ये साचलेले पाणी निघून जाईल व बोद मोकळे राहतील. त्याचा अनुकूल परिणाम आपल्याला द्राक्ष बागेमध्ये डोळे फुटण्याच्या अवस्थेवर दिसून येईल .

* द्राक्ष बागेत घडांची विरळणी करणे -Draksh Lagwad Mahiti Marathi

Read  Kusum Solar Pamp Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना २०२३ .

द्राक्ष बागेत वेलीवर साधारणता 50 ते 100 घडांची संख्या आपल्याला दिसून येत असते ही संख्या तशीच राहिल्यास वेलीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचा वापर अधिकाधिक होईल व घडांची वाढ योग्य प्रमाणात न होता लहानच राहील यावेळी वेलाचे आकारमान पाहून द्राक्ष घडांची संख्या निश्चित करावी व इतर घळ काढून टाकावेत असे करण्यासाठी दोन प्रकार पडतात स्थानिक बाजारपेठ आणि निर्यात अशावेळी निर्यातीकरिता प्रति दिडवर्गफूट अंतरावर एक घड तर स्थानिक बाजारपेठेकरिता प्रति वर्ग फूट या प्रमाणात झाडे राखून ठेवावीत.

* द्राक्ष बागेतील रोग नियंत्रण –

द्राक्ष बागेत फळ छाटणीनंतर आद्रता जास्त असणे साहजिकच आहे यापूर्वी पावसाळी वातावरणात वाढलेल्या बागेमध्ये वेग वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला दिसून येईल अशी बाग निघाल्यानंतर ही त्रासदायक परिस्थिती निर्माण करत असते अशा परिस्थितीत बागेत काडीवर, ओलांड्यावर तसेच खोडावर असलेली रोगग्रस्त पाने गोळा करून बागेच्या बाहेर फेकून द्यावी त्याचबरोबर बागेमध्ये बोर्डो मिश्रणाची फवारणी पूर्ण वेलीवर तसेच जमिनीवर बांधावर सुद्धा करून घेण्यात यावी यामुळे बागेत असलेले रोगाचे जिवाणू नियंत्रणात ठेवणे अधिक प्रमाणात शक्य होईल.

* द्राक्ष बागेमध्ये संजीवकाची फवारणी करणे –

द्राक्ष बागेमध्ये 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये द्राक्ष घड जी .ए.3 व पी.पी.एम. या संजीवकांच्या फवारणी करण्याजोगा होतो वातावरणातील परिस्थितीची पाऊस बघूनच फवारणी करावी .जी .ए. 3. ची फवारणी व कार्य करण्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बागेमध्ये एका दिवसापूर्वी झिंक आणि बोराॅनची 0.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.जी.ए.3 . चे अधिक चांगले परिणाम होण्यासाठी जी. एक.3. च्या द्रावणात युरिया फॉस्फेट एक ग्रॅम प्रति लिटर किंवा सायट्रिक ऍसिड0.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा फॉस्फरिक ऍसिड 0.3 मि.लि.लिटर पाणी या प्रमाणात मिसळून घ्यावे

पाच दिवसानंतर पुन्हा पंधरा पी.पी.एम तीव्रतेच्या फवारणी केल्यास प्रिब्ल्यूम अवस्थेमध्ये घर चांगल्या रीतीने मोकळा झालेला दिसतो अशाप्रकारे द्राक्षाच्या काळी मधून घड बाहेर येण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये छाटणी करणे आवश्‍यक असते. त्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे Draksh Lagwad Mahiti Marathi व्यवस्थित नियोजन करून द्राक्ष बागेत अधिकाधिक उत्पादन घ्यावे.

Leave a Comment