group

EPFO E-Nomination Information | पीएफ खात्यातील जमा ई-नोमिनेशन शिवाय पाहता येणार नाही?

EPFO E-Nomination Information मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO खाते धारकांसाठी इ नोमिनेशन अनिवार्य केलेले आहे. नॉमिनेशन केल्याशिवाय खातेधारक पीएफ पासबुक पाहू शकणार नाही आतापर्यंत मित्रांनो आपल्याला तसे करण्याची गरज नव्हती पण आता पीएफ खात्यातील आपल्याला जर बॅलन्स पहायचे असले तरी नॉमिनेशन करणे अनिवार्य केले आहे.

खातेधारक आतापर्यंत नॉमिनेशन न करताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन आपले पीएफ बॅलन्स आणि पासबुक सहज तपासू शकत होते. ईपीएफ खात्यामध्ये नॉमिनी साठी नॉमिनी चे नाव आधी घ्यावे लागणार आहे. तसेच पत्ता व खातेदाराची असलेले नॉमिनी चे नाते नमूद करावे लागेल जमिनीच्या जन्मतारखे सोबतच हेदेखील करावे लागेल की पीएफ खात्यात किती टक्के रक्कम जमा केली जाईल जर नॉमिनी अल्पकालीन असल्यास त्याच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे नॉमिनी व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा सुद्धा आवश्यक आहे.

Read  Atiwrushti Nuksan Bharpai Yadi | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

कोणत्याही बचत योजनेमध्ये त्या खात्याच्या बाबतीत नॉमिनी चे नाव अनिवार्य आहे यामुळेच खातेदारांच्या मृत्यू नंतर पैसे त्या नॉमिनी व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात. जेणेकरून अकाली मृत्यू झाला तर नॉमिनी च्या नावे निधी वेळेत जमा होईल.

ई-नॉमिनेशन कसे करता येईल?

सर्वप्रथम वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून EPF पोर्टल वर लॉगिन करा.

लॉगिन झाल्यानंतर मॅनेज शिक्षण मध्ये जा आणि ई नोमिनेशन ऑप्शन वर क्लिक करा.

त्यानंतर प्रोफाईल मध्ये कायमस्वरूपी व तात्पुरता पत्ता टाका आणि सेव बटणावर क्लिक करा तुमचे कुटुंब आहे की नाही हे देखील सिलेक्ट करा.

तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक नाव तसेच जन्मतारीख पत्ता व पालक म्हणजेच अल्प नोमिनी असेल तर यासंबंधी माहिती भरा आणि सेव फॅमिली डिटेल्स वर क्लिक करा जास्त ना मी देखील आपण तिथे जोडू शकता कोणत्या ना मिला किती रक्कम मिळेल हे देखील तुम्हाला घोषित करता येईल.

Read  Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language | ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र नियम

आधारचा व्हर्च्युअल आयडी टाकून व्हेरिफाय वर क्लिक करा.

आधार क्रमांक किंवा आधार व्हच्युअल आयडी टाकून ओटीपी मिळेल व त्यावर क्लिक करा आधार लिंक केलेल्या मोबाईल वर ओटीपी जाईल.

ईपीएफओ मध्ये नोमनेशन पूर्ण करण्यासाठी ओटीपी टाका व त्यानंतर फिजिकल डॉक्युमेंट येण्याची गरज भासणार नाही.

group

Leave a Comment

x