तुमच्या जमिनीवर कब्जा केला असेल तर त्या जमीनीवर केलेला कब्जा तुम्हाला हटवण्याचा अधिकार आहे. जाणून घेऊया या विषयी माहिती.
ज्यांच्याकडे खूप सारी संपत्ती आहे ते लोक गरीब लोकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच अनाधिकृत जमिनीचा भोगवटा असे देखील म्हटले जाते.
आधी ती जमीन पिकवली जाते किंवा त्या जमिनीवर काही काळ लागवड केली जाते. मग मोठे व्यापारी लहान शेतकऱ्यांना कर्ज खाली आणून जमीन हडपण्याचा प्रयत्न करतात.
ही जमीन हातातून गेल्यानंतर गरीब लोकांना करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. ती गेलेली जमीन परत कशी मिळवायची याचविषयी आपण पाहणार आहोत.
अनाधिकृत भोगवटा मध्ये गेलेली जमीन परत मागण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडे याविषयीची तक्रार करावी लागते. ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज स्वतःच्या अक्षरांमध्ये किंवा मग ग्राहक सेवा केंद्रावर अर्जाचा नमुना तुम्हाला मिळेल.
त्या अर्जाच्या नमुन्या सोबत जमीन तुमच्या मालकीची असणे याबाबतची काही सादर पुरावे असतील, तर ते पुरावे त्या अर्जासोबत जोडावे लागतील. म्हणजेच अर्जासोबत प्रबळ हक्कांच्या नोंदीचा पुरावा आपल्याला द्यावा लागणार आहे.
हा अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी ह्या हक्कांच्या नोंदीचा संक्षिप्त चौकशी करून जमीन कोणाच्या मालकीची आहे, त्या मालकाला ती परत मिळते व अधिकृत भोगवटा केलेल्या व्यक्तीला तिथून हाकलून दिले जाते.
तुमची जमीन तुम्हाला परत मिळते. यासाठी कोणत्या मोठ्या गोष्टीची गरज नाही. फक्त तुमच्या जवळ असलेला पुरावा, त्याचे योग्य पद्धतशीर कागदपत्रे आवश्यक आहेत या मार्गाने तुम्ही तुमची जमीन परत मिळवू शकता.
“आमचा लेख जमिनीवरील कब्जा केल्यास काय करावे कसा वाटला, ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा”.
शॉर्टकट माहिती आहे ही. जरा संक्षिप्त माहिती द्या.