पॅन कार्ड काढा अवघ्या 10 मिनिटात मोफत – Free PAN Card Apply Online

Free PAN Card Apply Online – आपल्याला कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आपल्याला पॅन कार्डची खूप आवश्यकता आहे. अगोदर पॅन कार्ड काढणे म्हणजे फार वेळ त्यासाठी लागत असे. परंतु आता पॅन कार्ड काढण्याकरता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही आता पॅन कार्ड आधार कार्ड च्या मदतीने काही मिनिटांमध्ये बनवू शकता आणि ही इन्स्टंट कार्ड बनवण्याची सुविधा मोफत आहे.

 

पॅन कार्ड म्हणजे काय?

 

इन्कम टॅक्स विभागाकडून (Income Tax Department) प्रत्येक नागरिकाला दहा अंकी क्रमांक असलेला कायम खाते क्रमांक दिला जात असतो PAN म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर(Permanent Account Number). तुम्ही आधार कार्ड (Adhaar Card) द्वारे अर्ज केल्यास तुम्हाला आज 10 मिनिटांमध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये (PDF Format) आधार कार्ड मिळते.

Read  राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन / मशरूम उत्पादन अनुदान योजना

 

पॅन कार्ड (PAN Card)करिता अर्ज कसा करायचा?

 

सर्वात प्रथम आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला न्यू पेन याकरता अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. याकरता तुमच्या आधार कार्ड तुमच्या सोबत असणं आणि तुमच्या मोबाईल नंबरची लींक (link)असणे खूपच गरजेचे आहे.  कारण केवायसी पूर्ण करण्यासाठी पाठवला जाणारा ओटीपी (OTP) जो आहे तो तुमच्या मोबाईल क्रमांकावर येणार.

 

दहा मिनिटात पॅन कार्ड कसे बनवायचे?

 

आता मी तुम्हाला काही स्टेप सांगतो आहे त्यात तुम्हाला पूर्ण करावे लागतील.

1.  सर्वात प्रथम आयकर विभागाच्या म्हणजेच टॅक्स विभागाच्या ई – फायलिंग (efilling) पोर्टलला भेट द्या.

Read  Online Driving License Application - लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा घर बसल्या

2.  त्यानंतर इन्स्टंट पॅन कार्ड आधार (Instatant PAN Card Adhaar) या ऑप्शन वर क्लिक करावे.

3.  हे केल्यानंतर पुठे गेट न्यू पॅन कार्ड (get new pancard) वर क्लिक करा आणि त्यानंतर नव्या पॅनकार्डसठी आधार क्रमांकाची नोंद करा.

4.  त्यानंतर कॅपच्या कोड टाका. आधार ओटीपी (OTP) जनरेट करा. तो तुमच्या मोबाईल फोनवर येईल. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करुन, आधार डिटेल प्रमाणित केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड (PAN Card Download)करता येऊ शकते.

आमच्या exams hall ब्लोगला पण भेट द्या

31 thoughts on “पॅन कार्ड काढा अवघ्या 10 मिनिटात मोफत – Free PAN Card Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published.

x