How to Change Driving License Addesss? | ड्रायव्हिंग लायसन्स पत्ता कसा बदलायचा?

How to Change Driving License Addesss?DRIVING LICENSE मध्ये बदल करता येऊ शकतो. ADDRESS, RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही.

Driving License मध्ये घरबसल्या बदल करता येऊ शकतो. Address, RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही. ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी. वाहन चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स खूप महत्त्वाचा डॉक्यूमेंट असतो. त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या या डॉक्युमेंट वर सर्व डिटेल्स अपडेट असणे गरजेचे असते. जर तुमचा पत्ता, मोबाईल नंबर बदललेला असेल तर तो आधार कार्डसह सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर अपडेट करण्याचा सांगितला जातो. कारण कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता अपडेट (Driving License Address) करू शकता. यासाठी RTO ऑफिस जाण्याची गरज नाही किंवा मग एखाद्या एजंटकडून हे काम करून घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. परंतु तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता आणि एजेंटकडून हे काम करुन घेण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत.

Read  Agricultural pump consumers MSEB Bill एक रकमी वीज बिल थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के सूट

ऑनलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलता येऊ शकतो. यासाठी काही पैसे आणि आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.

ऑनलाइन पत्ता कसा बदलाल :

सर्वात आधी parivahan.gov.in जा.
Online Services मध्ये Driving License

Related Services वर क्लिक करा.

ड्रॉप डाउन लिस्टमध्ये तुमच्या राज्याची निवड करा.

License Related Services ऑप्शन अंतर्गत Drivers/ Learners License वर क्लिक करा.

त्यानंतर Apply for Change of Address वर टॅप करा.

अर्ज जमा करण्यासाठी एक स्क्रिन ओपन होईल.

स्क्रिनवरील डिटेल्स वाचून Continue वर क्लिक करा.

इथे तुमचा Driving License Number आणि जन्मतारीख टाका.

Read  आधार कार्ड लिंक करण्याबाबत सेबी अल्टीमेटम SEBI Aadhaar Card Link Altimatum

आता Get DL Details वर क्लिक करा.

सबमिट केलेले डिटेल्स तुमचे असल्याचं नमूद करण्यासाठी ड्रॉप डाउनमध्ये Yes वर क्लिक करा.

लिस्टमध्ये जवळच्या RTO ची निवड करा आणि Proceed वर क्लिक करा.

नव्या Address सह इथे आवश्यक सर्व डिटेल्स भरा.

Change of address on DL समोर असलेल्या बॉक्सवर चेक करा. इथे Permanent, Present, किंवा Both पैकी एक ऑप्शन निवडा आणि डिटेल्स भरा. आता Confirm-Submit वर क्लिक करा.

पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

फॉर्म 33 अ‍ॅप्लिकेशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, नवा अ‍ॅड्रेस प्रुफ यासाठी पासबुक, वोटर आयडी, आधार कार्ड किंवा वीज बिल द्यावं लागू शकतं. इन्शुरन्स सर्टिफिकेट, पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल.

Read  Bombay Engineer Group & Center Recruitment |बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी

वरील माहिती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल कि, किती सहज आपण ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल करू शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

One thought on “How to Change Driving License Addesss? | ड्रायव्हिंग लायसन्स पत्ता कसा बदलायचा?

Leave a Reply

Your email address will not be published.

x