पिक विमा मंजुरी यादी 2021 | Kharip Pik Vima District List

Kharip Pik Vima District List शेतकरी मित्रांनो 2021 मध्ये पावसाचा खंड पडला आणि अतिवृष्टी सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे खरीप हंगाम 2021 करीता शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेला आहे.

पावसाचा खंड झाल्यामुळे ज्या जिल्हा करता अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यात या जिल्ह्याला पात्र मंडळास 25% पीक विम्याचे वाटप करण्यात आले होते. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते. अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचे वाटप केले जाते आहे. नांदेड जिल्हा करता 73 टक्‍क्‍यांपर्यंत पीक विम्याची वाटप करण्यात आले होते. काही मंडळांमध्ये पूर्ण पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आली.

काही ठिकाणी काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा आला आणि काही शेतकऱ्यांना आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे की आपल्याला पिक विमा का आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, विमा कंपनी यांच्याकडे निवेदन देत आहेत.

Read  Aapleabhilekh Mahabhumi Shetkaree | 1880 साल पासून चे जमिनीचे जुने कागदपत्र पहा मोबाईलवर

ज्या जिल्ह्यांमध्ये प्रेस नोट किंवा अधिसूचना काढण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी ह्याकरता आपला आय एफ एस सी कोड, बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड या सर्व बाबतीत अपडेट माहिती देणे खूप गरजेचे आहे. आपण प्रेम केला असेल तर आपण पीक विमा कंपनीशी संपर्क करणे आवश्यक आहे. जर आपण पूर्वसूचना दिली नसेल तर आपला जो पीक कापणीचा अंतिम अहवाल आहे हा वाली पर्यंत वाट पाहणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपल्याला पिक विमा मिळणार नाही.

आपण जर पूर्वसूचना दिली असेल आणि आपला डाटा अपडेट असेल तर आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळाली असेल. या दोन्ही गोष्टी आपल्याकडून करण्यात आल्या नंतर हे आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल तर कंपनीच्या माणसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. आपली सर्व माहिती व्यवस्थित असेल तर कृषी विभागाच्या मार्फत अशाप्रकारे सांगण्यात येत आहे की आपल्याला पिक विमा नक्की मिळेल.

Read  Corona Vaccine Available in Medical | लवकरच मेडिकल मध्येही मिळणार कोरोना लस?

 

 

 

Leave a Comment