mahadbtmahait gov in पीक फवारणी यंत्रासाठी मिळणार अनुदान… कसा करणार अर्ज जाणून घ्या.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी केंद्र सरकार नेहमी तत्पर असते ते नवनवीन योजना राबवण्यासाठी. त्याच प्रकारे आता फवारणी यंत्र साठी देखील अनुदान मिळणार आहे. ज्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकतील. यासोबतच आता पीक फवारणी (Crop spraying) यंत्रसाठी देखील अनुदान दिले जात आहे. पीक फवारणी यंत्राची जी किंमत असेल त्यानुसार 50 % अनुदान दिलं जात.
या योजनेमध्ये 3 हजारांपासून 1 लाख 25 हजारापर्यंत अनुदान दिलं जातं. तसेच यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र तसेच पॉवर टिलर, वीडर, रिपर कापणी यंत्र, खरेदी करायचे असतील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत.
आवश्यक कागदपत्रे :
यासाठी सातबारा व 8 अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर आर. सी. बुक, जातीचा दाखला या कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करावी. या अनुदानासाठी ऑनलाईन (online) अर्ज करावा लागतो तो कशा पद्धतीने करावा ते जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :
सर्वप्रथम महाडीबीटी (Mahadbt) या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड किंवा आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.
नंतर तिथे आपली प्रोफाईल (profile) दाखवली जाईल तिथे आपली सर्व माहिती (Information) अचूक भरावी जेणेकरून आपला अर्ज योजनेसाठी पात्र ठरेल.
नंतर अर्ज या ऑप्शन क्लिक (Click) करा व तिथे आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. पाहिजे त्या पर्यायावर क्लिक करा.
नंतर यंत्रसामग्री अवजारे निवडून यातून पीक संरक्षण (Protection) अवजारे हा ऑप्शन निवडा.
अशा पद्धतीने सर्व प्रक्रिया करून तुम्ही पीक फवारणी यंत्रसाठी अनुदान मिळवू शकता.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतर शेतकरी बांधवांना ही शेअर करा.