Mahatma Jyotiba Phule karj Mukti Yojana | महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना पाहणार आहोत जगाच्या पाठीवर पाहिले असता शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवतो शेतीमध्ये काबाडकष्ट करतो घाम गाळून धान्य पिकवतो शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते आपल्याला माहीतच आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्यांच्या शेतात रात्र काबाड कष्ट करून अन्नधान्य भाजीपाला पिकवत असतो शेतकरी कशाचीही काळजी न करता अहो रात्र ऊन वारा पाऊस काहीही असो फक्त आपले काम करत असतात इतके काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवत असतो परंतु त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही तर कधीही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कधी अस्तिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होतात या सततच्या नुकसानीमुळे आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते या सर्व बाबींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त राहण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे राज्यात मागील काही वर्षापासून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती राज्यातील काही भागात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच राज्यातील काही भागात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते महाराष्ट्र राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत हे शेतकरी शेती आणि शेतीच्या संबंधित गरजा पूर्ण करण्याकरिता व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचे उद्देश :-
समाजात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील की जिथे कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबीय निराधार होतात शेतकरी अहोरात्र शेतीमध्ये घाम जाळत असतात शेतीसाठी कष्ट करीत असाल बहुतांश वेळा येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी पिकांना भाव मिळत नाही या सर्व समस्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमधून सोडवण्याच्या दृष्टीने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात सुरुवात केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे दोन लाख रुपये पर्यंतचे दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेले पीक कर्ज राष्ट्र राज्य शासनाकडून माफ करण्यात येणार आहे तसेच या योजनेचा लाभ राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच ऊस आणि फळबागांची शेती करणाऱ्या व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे या योजनेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अट असणार नाही या संबंधित विवरण भविष्यात काही मुख्यमंत्री कार्यालयातून जारी केले जाणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दहा हजार कोटी रुपयांचे तरतूद जाहीर केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे फायदे :-
महाराष्ट्र राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांना आर्थिक सहायता देण्यासाठी व त्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी मिळणार आहे
या योजनेच्या अंतर्गत ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
ही योजना महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका ग्रामीण बँका किंवा व्यापारी बँकांमधून घेतलेले अल्पमुदतीचे पीक कर्ज तेव्हा पुनर्गठण केलेले पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीची धनराशी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये कोणते नागरिक पात्र आहेत ?
शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरण महावितरण एसटी महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी आणि कर्मचारी ( एकत्रित मासिक वेतन पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त असणारे).
निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ( ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 25000 पेक्षा जास्त आहे माजी सैनिक वगळून)
केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ( पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त असणारी मार्ग मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून ).
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.