CCI चे चांगले पाऊल
सध्या शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांकडून विचारणा केली जात आहे ती म्हणजे कापूस खरेदीच्या नोंदी बदल. यावर्षीची जी कापूस खरेदी होणार आहे, यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे CCI चा आहे.
मागील वर्षासारख्या चुका होणार नाहीत-
CCI App च्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कापूस खरेदी केंद्रावर नोंद होत असताना, प्रत्येक जिल्हानिहाय किंवा खरेदी केंद्रनिहाय लिंक बनवल्या गेलेल्या आहेत. त्या माध्यमातूनच आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे. गेल्या हंगामामध्ये सुद्धा ऑनलाईन नोंदणी च्या लिंक दिल्या होत्या.
मात्र एका जिल्ह्याची लिंक असल्यामुळे ती त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता वापरायची होती, ती लिंक दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वापरली तर त्या लिंक च्या माध्यमातून खरेदीची नोंद चूकीची होत असे.
कोणते app आहे?
त्यामुळे आता आपण जिल्हानिहाय किंवा केंद्रनिहाय लिंक्स आहेत. त्या माध्यमातून आपल्याला खरेदी करता नोंदणी अचूक पद्धतीने करता येणार आहे. हे एक अँड्रॉइड मोबाईलचे ॲप्लिकेशन आहे ज्याचं नावं आहे Cott Ally.
डाउनलोड कसे करायचे?
मित्रांनो हे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://play.google.com/store/app
किंवा
आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कॉटन फेडरेशन सीसीआय ॲप अशाप्रकारचा एप्लीकेशन दिसेल किंवा आपण सीसीआय कॉटन अॅपस सुद्धा टाकू शकतो. हे सारं केल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लिकेशन चा नाव दिसेल. अप्लिकेशन तीन नंबरला दिसेल, Cott Ally म्हणून आपलिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचा आहे.
कोठे करायचे रजिस्ट्रेशन?
मित्रांनो app ओपन केल्यानंतर साधारण 6.64 MB हे app आहे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला cci चा लोगो दिसेल. भारतीय कपास निगम हे अप्लिकेशन आहे. सर्वात प्रथम आपल्याला तिथे मागितल्या जाते रजिस्ट्रेशन.
आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट करायच आहे. मित्रांनो मोबाइल नंबर टाकल्यानंतर, आपल्याला नाव टाकायचा आहे. नंतर आपल्याला ब्रँच विचारले जाईल. अकोला जर आपण सिलेक्ट केला, तर त्या अंतर्गत विदर्भामधील जिल्हे दिसतील.
यादी पाहता येईल-
या जिल्ह्यांमधील खरेदी केंद्राची यादी आपण पाहू शकतो. या जिल्ह्यातील केंद्र आपण यामध्ये पाहू शकता. औरंगाबाद जिल्ह्यातील अंतर्गत केंद्र आपल्याला दिसतील. जेही आपले कापूस खरेदी केंद्र असेल ते आपल्याला येथे निवडायचे आहे, म्हणजे कापूस विक्री करता येणे सोपे होईल. यानंतर आपल्याला साइन उप (sign up) ला क्लिक करायच आहे.
क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाते, लैंग्वेज म्हणजे भाषा जी भाषा आपल्याला वापरासाठी ठेवायचे असेल ती तुम्ही निवडू शकता. आपण मराठी select केले, सर्वात पहिले ऑप्शन आहे एम एस पी दराचे ऑप्शन, त्या वाणांमधून आपल्याला जे वाण असेल ते निवडायचा आहे. वाणांचा रोजचा रेट आपल्याला दिसतो. एक नंबर आपण येथे सिलेक्ट केले आणि त्या वाणाचा रेट आपण बघू शकता. आता सध्या या वाणाला किती भाव आहे हे आपल्याला दिसेल.
कापसाचे भाव पण बघू शकाल-
दुसरा ऑप्शन आपल्याला दिसते देयक स्थिती, आपण कापूस विकला असेल तर आपल्याला जी पावती मिळाली असेल, त्या पावती वरचा नंबर टाकून आपण देयक स्थिति पाहू शकतो.
त्यानंतर शेतकऱ्यांविषयी, कापसाविषयी च्या बातम्या आपल्याला इथे बघायला मिळतील. आता त्यानंतर महत्वाचा खरेदी केंद्र राज्य निवडायचे महाराष्ट्र, नंतर आपल्याला विचारला जाईल ब्रँच कोणती आहे. शाखा कार्यालय सिलेक्ट करायचे आहे जसं की, अकोला select केले तर विदर्भ आणि विदर्भातील जिल्हे आपल्याला दिसतील.
अकोला आपण जर सिलेक्ट केला तर, अकोला मधून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. ज्या खरेदी केंद्रावर आपल्याला विक्री करायचे असेल, ते आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पूर्ण केंद्रांची यादी तिथे आपल्याला दिसेल.
संपर्क कोणाशी करायचा-
मोबाईल नंबर दिसतील यावर आपण संपर्क करू शकतो. म्हणजेच अकोला असेल किंवा औरंगाबाद असेल तर ह्या अंतर्गत येणारे सर्व जिल्हे आपल्याला दिसतील. अकोला सिलेक्ट केल्यानंतर अकोल्या मधील सर्व जिल्हे दिसतील.
त्यामधला एक जिल्हा आपल्याला निवडायचा आहे, तो आपला असेल तो आणि मग आपल्याला सेंटर ठेवता येईल. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने ॲप बनवलेला आहे. आपण सुद्धा याचा लाभ घेऊन आपल्याला ह्या कापूस खरेदी केंद्रावर आपला कापूस विकता येणार आहे.
आमच्या खालील पोस्ट सुद्धा आपण वाचाव्या