मित्रांनो कृषीमित्र पंजाब डक Panjab Dak हे महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगणारे सर्वपरिचित व्यक्तिमत्व. या वर्षी सोयाबीनचा पेरा (पेरणी) खूप आहे आणि त्यामुळे शेतकरी काळजीत आहेत की, आपल्याला किती सोयाबीन होणार?. पंजाब डक यांनी अलीकडेच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर आपल्या शेतातील सोयाबीन किती होणार हे जाणुन घ्यायचे असेल, तर त्यांनी सांगितलेल्या कृतीप्रमाणे आपल्याला काही गोष्टी करून बघाव्या लागतील.
Panjab Dak पंजाब डक यांचा सोयाबीन पिकाचा अंदाज
बरेच शेतकरी आपल्या अंदाजाप्रमाणे, मला एवढे सोयाबीन होणार, मला तेवढे होणार अशा प्रकारे एकमेकांना सांगतात सांगतात. तर हे सोयाबीनचे अंदाज सांगत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचे अंदाज हे खरे ठरतात तर कुणाचे खरे ठरत नाहीत त्यामुळेच पंजाब डक यांनी सोयाबीनचा अंदाज कसा घ्यायचा? म्हणजेच आपल्या शेतामध्ये किती क्विंटल सोयाबीन होणार? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी पुढील कृती सांगितली.
पंजाब डॉग यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये चे उत्पादन आपण घेत आहोत ते किती होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच जर तुम्ही या वर्षी सोयाबीन पेरले असेल तर तुम्हाला किती होणार याबाबत त्यांनी पुढील सूत्र सांगितले.
सर्वप्रथम आपल्या शेतामधील कोणत्याही 3 सोयाबीन झाडांच्या शेंगा घ्या, त्या वाळलेल्या असोत का ओल्या असोत त्यात तिन्ही झाडांच्या शेंगांची बेरीज करा जसे की, पहिले झाड 59 शेंगा दुसरे झाड 41 शेंगा तिसरे झाड 50 शेंगा एकुण 59+41+50 = 150 म्हणजेच सोयाबीन च्या तीनही झाडांच्या शेंगा ची बेरीज केली तर ती 150 येईल. आता तीन झाडांच्या शेंगांची सरासरी आपल्याला काढायची आहे म्हणजेच 150 भागेला 3
160÷3 = सरासरी
50 या सरासरीला 6 ने भागावे,
50 ÷ 6 = 8.33
म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतात 8 क्विंटल 33 किलो पर्यंत एकरी सोयाबीन होईल. तुम्ही कॅल्क्युलेटर च्या साह्याने सुद्धा भागाकार करू शकता. काय करावे लागेल पुन्हा एकदा माहिती करून घेऊया.
सुरुवातीला तुमच्या एका एकरातील कोणतेही 3 सोयाबीन चे झाडे घ्या. त्या तीनही सोयाबीन झाडांच्या शेंगांची बेरीज करा, त्या संख्येला 3 ने भागा, नंतर आलेल्या संख्येला 6 ने भागा, म्हणजेच एकरी तुम्हाला किती सोयाबीन होईल याचा अंदाज निघेल.
अशाप्रकारे मित्रांनो वरील प्रमाणे आपण आपल्या शेतातील सोयाबीनचे उत्पादन एकरी किती होईल याचा अंदाज येऊ शकतो अशा प्रकारची माहिती हवामान तज्ञ पंजाब डक Panjab Dak यांनी सांगितले आहे. तुम्हाला कमेंट कराव्याशा वाटल्या तर जरुर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि हो तुमचे काही प्रश्न असतील, तर जरूर विचारा. आणि हो आमच्या फांद्या ब्लॉगला भेट द्यावीशी वाटली तर खाली क्लिक करा
आई मराठी येथे क्लिक करा