Pik Vima 2022 लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना झाला 39.17 कोटी पिक विमा मंजूर…
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील तूर या खरीप पीकाच्या पीक विमाच्या संदर्भातील एक महत्वाची माहिती दिली आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून लातूर जिल्ह्यामधील आहेत तेवढ्या 60 महसूल मंडळ तूर या पिकाच्या पीक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आली होती. खरीप हंगामातील अंतिम पिक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने (loss of toor crop) तुरीचा जागीच खराटा झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे.
मात्र, अगोदरच उदासिन असलेल्या पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनही कारवाई करीत नसल्याने शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
25 टक्के नुकसान भरपाई मिळणार :
परभणींच्या जिल्हाधिकारी यांनी मात्र, पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर 25 % अग्रिम नुकसान भरपाई जमा करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी च्या माध्यमातून अधिसूचना काढून लातूर जिल्ह्यांमधील 60 महसूल मंडळे तूर पिकाचा पिक विम्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते आणि याच्यासाठी आधिसुचना कडून 25 टक्के पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आल्या.
त्यांच्यासाठी 39.17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. असे एकंदरीत 86 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये सहा हजार हेक्टरच्या पिकासाठी ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. सर्वच्या सर्व शेतकरी पात्र ठरवण्यात आले आणि या रक्कम जरी मंजूर करण्यात आलेली असली तरी फक्त लातूर जिल्ह्यातील 1 लाख 39 हजार शेतकऱ्यांना या पिकासाठी 25 टक्के रकमेचं वितरण करण्यात आलं होतं.
पिक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण :
1 लाख 39 हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला मात्र बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना रोष वाढत चाललेला होता. त्या सर्वच्या सर्व महसूल मंडळ पात्र असताना सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता. सर्वांनीच जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालयातील येथे शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायला आंदोलन करायला सुरुवात झाली होती आणि या सर्व शेतकऱ्यांमध्ये ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक वेळापत्रक काढून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.
दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील 39.17 कोटी रुपये पिक विमा मंजूर करण्यात आला. या पीक विम्यासाठी क्लेम करण्याची शेवटची तारीख की 15 डिसेंबर 2021 पर्यंत होती. ज्या शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर 2021 पर्यंत क्लेम केले आहे. ते शेतकरी तूर विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
Not found pik vima any Farmer