Pik Vima Kadhava ki Nahi? पीक विमा काढावा की नाही?

Pik Vima Kadhava ki Nahi मागच्या वर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात िकाचे खूप नुकसान झाले शेतकऱ्यांना या परिस्थितीतही पिक विमा मिळालेला नाही.  मागील पीक विम्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना असल्याने आता नवीन पीक विमा काढायचा की नाही? असा प्रश्न शेतकर्‍यांना उपस्थित झालेला आहे.

Pik Vima Kadhava ki Nahi? पीक विमा काढावा की नाही?

शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी लागू करण्यात आलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 15 जुलै ही मुदत सुद्धा देण्यात आलेली आहेे. आपल्याला माहिती आहे की, पिक विमा योजने करता सोयाबीन, तूर, कापूस, मका, उडीद, मूग आणि ज्वारी या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित अशा उत्पन्नाची नुकसानभरपाईची आहे ती सामूहिक स्वरूपात मिळावी अशा उद्देशाने ही योजना जिल्ह्यांमध्ये लागू आहे. खरीप हंगामामध्ये हवामानातील बदल, अपुरा पाऊस अशा घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावनी न झाल्याने विमा संरक्षण देय राहणार आहे.

सर्वसाधारणपणे काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पावसातील खंड असेल, पुर, दुष्काळ असेल आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण ते राहणार आहे. ज्या जोखमी टाळता येत नाही, त्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटी पासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधीसुचित केल्या गेलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी, प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जात असते.  जर सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी  आले असेल, तर नुकसान भरपाई देय असणार आहे.

Read  MACS 6478 गहू वाण

पिक विमा काढताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात?

1) पिक विमा चा फॉर्म भरताना पिक पेरा फॉर्म वर 10 जून 2021 नंतरची कुठलीही तारीख टाकावी.

2) डिजिटल सातबारा अपलोड करायचा का पाठव आराखडा सातबारा अपलोड करायचा हा प्रश्न आपल्याला नेहमी असतो तर मित्रांनो दोन हजार वीस पासून आपला डाटा ऑनलाइन झालेला आहे आणि महाभूमी सी हे लिंक केलेला असल्यामुळे खाते नंबर आणि सर्वे नंबर टाकल्यानंतर शेतकऱ्याचा डाटा ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफाय होत असतो. म्हणून फॉर्म सोबत सातबारा अपलोड करणे जरुरी नाही. आपल्या सातबाऱ्यावर अचूक नोंदी ऑनलाईन झालेले असतील तर डिजिटल सातबारा सुद्धा अपलोड करता येऊ शकतो. तसेच आपण हस्तलिखित सातबारा सुद्धा अपलोड करू शकतो. सातबारा हा कंपल्सरी कागदपत्रांमध्ये येत नाही.

3) सामाजिक क्षेत्रासाठी पीक विमा कसा काढायचा असा प्रश्न नेहमी असतो. ज्या वेळी आपलं ऑनलाईन क्षेत्र व्हेरिफाय असतं, जो मुख्य क्षेत्रधारक असेल त्या क्षेत्रधारकाचे म्हणजेच मुख्य क्षेत्रधारकाचे नाव घ्यावे त्या क्षेत्र धारकाच्या नावाने पिक विमा काढावा. पिक विमा आपल्याला एक ऑप्शन दिसते सामाईक क्षेत्राचे, तेथे सामाईक क्षेत्र धारकाचे हमीपत्र भरून द्यायचे असते. इतर जे सहकारी शेतकरी आहेत त्या सहकारी शेतकरी आहेत  त्यांची नावे व सह्या त्याठिकाणी लागतात.

Read  आता घ्या कांद्याचे 75 ते 80 दिवसात उत्पादन नाविन जात एन एच ओ 920 विकसित

4) 2020 करता ज्या पीक विमा कंपन्या होत्या, त्याच पिक विमा कंपन्या त्या त्या जिल्ह्यासाठी असणार आहेत. तसेच 2020 मध्ये जो पीक विम्याचा हप्ता होता तो तसाच राहणार आहे.

5) पिक विमा फक्त सीएससी csc सेंटर च्या माध्यमातूनच भरावा.

6) शेतकऱ्यांचे लँड व्हेरिफाय जर होत नसेल तर सीएससी csc सेंटर धारकांनी शेतकऱ्यांचे जबरदस्ती शेत व्हेरिफाय करू नका. कुणाच्याही नावावर चुकीने भरू नका. कारण 2020 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा यामुळे नुकसान झालेल आहे.

7) पिक विमा भरताना आपण ज्या बँकेत अकाऊंट ओपन केलेल आहे, त्या बँकेचा आय एफ एस सी कोड IFSC भरावा लागतो. चुकीचा भरू नका. कारण बऱ्याच बँकांचे आयएफसी कोड चेंज झालेले आहेत. लँड व्हेरिफाय केल्यानंतर त्या ठिकाणी दुसराच आयएफसी कोड दाखवला जातो. आयएफसी कोड जर कन्फर्म होत नसेल तर आपल्या बँकेकडून अद्ययावत आयएफसी कोड घेऊन तो टाकावा.

Read  Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra शेळीपालन 2021

8) पिक विमा काढताना शेतकऱ्यांचा बँक अकाउंट नंबर आवश्यक असतो, अकाऊंट नंबर टाकल्यानंतर नेक्स पेजवर आपल्याला त्या शेतकऱ्याच पूर्ण डिटेल दिसते. ते नाव त्या शेतकऱ्याची जुळत नसेल तर, पासबुक, सातबारा, आधार कार्ड वरील नाव जुळत नसेल सीएससी सेंटर धारकास याची कल्पना द्यावी.

पीक विमा काढावा की, नाही? अशा संभ्रमात आपण नेहमी असतो. माझ्या वैयक्तिक मताने आपण पिक विमा भरावा असं मला वाटतं. आपल्या शेती पिकाला संरक्षण असणं खूप गरजेचं असतं. परंतु सध्या पिक विमा कंपन्या पिक विमा देण्यास बऱ्याच ठिकाणी टाळाटाळ करत आहेत. अशा शेतकऱ्यांची मनस्थिती पिक विमा भरण्याची नाही. परंतु मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा भरण्याचे आव्हान केले गेले आहे. कारण आपण ज्या वेळेस पेरणी करतो तीथपासून तर घरी पीक येईपर्यंत आपण क्लेम करू शकतो. यामध्ये 72 तासांची अट आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे विचार करून नुकसान आणि फायदा बघून पिक विमा काढण्याचा निर्णय घ्यावा. Pik Vima Kadhava ki Nahi? आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

 

Share on:

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment

x