नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत ८,५३,०८,६१२ एवढी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
Pik Vima Yojana
Table of Contents
मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्याचे कोटी नुकसान भरपाई रक्कम १००० रू पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम १००० रुपये अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.
परिपत्रकानुसार सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी तसेच शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्तालयाच्या पत्र अन्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी २०१८ – १९ खरीप २०१९ रब्बी २०१९-२०:व खरीप हंगाम २०२० करिता ८,५२,०५,२४०/- इतकी रक्कम तसेच पत्रानुसार मागणी केल्याप्रमाणे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग २०१८, आंबिया २०१८-१९ मृग २०१९ आंबिया २०१९-२० करिता १,०३,३७२/- इतकी रक्कम अशी एकूण रुपये ८,५३,०८,६१२/- इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेसाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरता येथे क्लिक करा
“प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने प्रस्तावित केल्यानुसार एकूण रुपये ८,५३,०८,६१२ /- इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त रकमेपैकी प्रधानमंत्री विमा योजना रब्बी २०१८-१९ , खरीप २०१९ , रब्बी २०१९-२० खरीप हंगाम २०२० करिता रुपये ८,५२,०५,२४०/- इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यात येत आहे.
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ आताच करा अर्ज
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज