Pip Line Subsidy Online Application 2022 | पाईपलाईन अनुदान ऑनलाइन अर्ज 2022

Pip Line Subsidy Online Application 2022 महाराष्ट्र शासनाकडून पाईपलाईन अनुदान योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते, याकरता आता अर्ज ऑनलाइन मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करत असताना कागदपत्रे,पात्रता अटी आणि शर्ती काय आहेत, अनुदान किती मिळेल ते आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना विषयीच्या सर्व योजना ह्या MahaDBT Portal च्या माध्यमातून राबवल्या जातात. आज करत असताना आपल्याकडे सिंचनाचा स्रोत कोणता आहे? याची माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सातबारा व सुद्धा सिंचनाच्या स्त्रोताची नोंद असणे गरजेचे आहे. योजनेची लॉटरी लागल्यानंतर जमिनीचा सातबारा, 8अ, HDP किंवा पीव्हीसी पाईप चे कोटेशन, बँकेचे पासबुक हे सर्व देणे बंधनकारक आहे. पूर्वसंमती नंतर आपल्यालाही सर्व कागदपत्र अपलोड करावी लागणार.

Read  Maha Police Bharti Ground Test 2022 Date | पोलिस भरती मैदानी चाचणी २०२२ तारीख.

किती अनुदान मिळतं?

एचडीपी किंवा पीव्हीसी पाईप साठी अनुदान मिळत असतं. या योजनेच्या माध्यमातून 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये अनुदान मिळते. HDP टाईप करता 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये 300 मिटर पर्यंत, तर पीव्हीसी पाईप करता 35 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये 500 मीटर म्हणजेच 1500 फूट पर्यंत पर्यंत अनुदान मिळते.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

 • प्रथम आपल्याला MahDBT Farmer Scheme Portal वर जायचे आहे.
 • यूजर आयडी पासवर्ड किंवा आधार कार्डच्या ओटीपीने लॉगिन करायचे आहे.
 • लोगिन केल्यानंतर मुख्य मुख्यपृष्ठावर अर्ज भरा असे ऑप्शन दाखवले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्याला विविध अशा योजनांचे ऑप्शन दिसेल.
 • सिंचन साधने व सुविधा या अंतर्गत पाईप करिता अर्ज हे दिसेल त्यानंतर बाबी निवडा वर क्लिक करायचे आहे
 • त्यानंतर आपल्यासमोर पाईपलाईन साठी चा अर्ज उघडेल.
 • त्यानंतर आपल्याला तिथे सात सुविधा दिसतील.
 • त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर आपल्याला निवडायचा आहे.
 • सिंचन साधने आणि सुविधा आपल्याला निवडायचा आहे.
 • त्यानंतर पाईप हे ऑप्शन निवडायचे आहे.
 • त्यानंतर पुढील ऑप्शन येईल उपघटक तेसुद्धा निवडायचा आहे.
 • त्यानंतर एचडीपी पाईप किंवा पीव्हीसी पाईप चे ऑप्शन निवडायचे आहे.
 • त्यानंतर बाब जतन करू शकता.
 • त्यानंतर अर्ज सादर करा या प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्याला ऑप्शन दाखवली जाईल की आपण आवडीच्या बाबी निवडले आहेत का जर असेल तर पहा या बटनवर क्लिक करायचे आहे.
 •  पहा वर क्लिक केल्यानंतर आपण ज्या भाभी निवडले आहेत ते आपल्या समोर दिसतील.
 • ज्या बाबी आपण निवडलेले असतील त्यांना सर्वप्रथम प्राधान्य क्रम त्या अगोदर तुम्हाला कोणती स्कीम पाहिजे आहे.
 • या योजनेच्या अटी व शर्ती मान्य आहेत टिक करायचे आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपण जर अगोदरच पेमेंट केलं असेल तर अर्ज सादर होईल अन्यथा आपल्याला तिथे 23.69 रु पेमेंट करावे लागेल.
Read  Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना.

अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो त्यानंतर अर्जाची लॉटरी लागेल त्यानंतर आपल्याला पाईपलाईन सरकारकडून मिळेल.

हे नक्की वाचा: अद्भुत मराठीबातमी मराठी

 

Leave a Comment