शेतातील पाईपलाईन टाकण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही, यासाठी अस्तित्वात आहे कायदा.

शेतातील पाईपलाईन टाकण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही, यासाठी अस्तित्वात आहे कायदा.

शेतकरी बांधवांना सर्वात मोठी येणारी अडचण म्हणजे शेतातील पाणी एकीकडून दुसरीकडे वाहण्यासाठी, पाण्याचा पाईप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून कसा न्यावा. तेच आपण या लेखात पाहणार आहोत.

पाण्याचा पाईप दुसऱ्या ठिकाणी नेत असताना मध्येच एखाद्या दुसऱ्याचे शेत येते त्यावेळेस शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्या शेतातून पाण्याचा पाईप टाकू देत नाही.

याव्यतिरिक्त आणखीन दुसऱ्या काही अडचणी येत असतात. अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.

तर याविषयी एक तरतूद आहे. एका जागेवरील पाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणता कायदा लागतो ते आपण पाहणार आहोत.

शेतातील पाणी वाहून नेण्यासाठी जर दुसऱ्या शेतातील व्यक्ती जागा देत असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही परंतु जर ती जागा दिली नसेल तर आपण पाणी कसं न्यायचं हा प्रश्न पडतो तर शेतीविषयी एक नियम लागू होतो, तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 49 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1967 या नियमानुसार आपण आपल्या शेतातील पाईपलाईन दुसऱ्याच्या शेतात ऊन येऊ शकतो.

Read  कोणत्या जिल्याकरिता कोणती कंपनी पीक विमा काढणार?

मग समोरच्या व्यक्तीचा होकार असो किंवा नाकार असो, तरीही या कायद्याअंतर्गत पाईप शेतात टाकण्यास मनाई करू शकत नाही.

सीमा सुरक्षा दलात 1312 पदांसाठी मेगाभरती

हा अधिनियम लागू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम करायचे काय? तर एक अर्ज तहसीलदाराला द्यावा लागतो. हा अर्ज एखाद्या ग्राहक सेवा केंद्रावर तुम्हाला हा अर्ज उपलब्ध होऊ शकतो.

हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला शेतीचा कच्चा नकाशा लावायचा आहे. की पाइपलाइन तुम्हाला कुठून कुठपर्यंत करायची आहे. ही माहिती भरावी लागणार आहे. सातबारा हे अर्जासोबत जोडून शेतकऱ्याने तहसीलदाराजवळ जमा केल्यानंतर, जो शेतकरी तुम्हाला पाईपलाईन टाकून देत नाहीत.

या शेतकऱ्यांना अधिकृत नोटीसा पाठवल्या जातात आणि तुमच्यासाठी हा मार्ग मोकळा केला जातो. परंतु यासाठी तुम्हाला देखील काही अटींचे पालन करावे लागेल. त्यामध्ये पहिली अट म्हणजे ही आहे की तुम्हाला शेतकऱ्याची कमीत कमी नुकसान झाले पाहिजे.

Read  Shetsara Maharashtra 2022 | शेतसारा महाराष्ट्र शासन

कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ द्यायची नाही. आणि जिथून जवळजवळ मार्ग असेल त्या मार्गाने पाईपलाईन करण्याचा अधिकार आहे. तुमच्या पाईपची रुंदी दीड मीटर पेक्षा जास्त नसावी. जमिनीत पाईप टाकताना अर्ध्या मीटरपेक्षा जास्त खोल नसावे. तसेच शेतकऱ्याला त्या पाईप टाकल्याचे भाडे देखील तुम्हाला द्यावे लागतील अशी अट या अधिनियमामध्ये आहे.

या अधिनियम मुळे एखाद्या शेतकऱ्याचे वेडेवाकडे जरी वातावरण झाले असले, तरी ही पाईपलाईन करण्यास समोरचा शेतकरी मना करू शकत नाही.

“मित्रांनो आमच्या हा लेख आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. “.

Aayushi Verma Age, birthday,Biography,

Leave a Comment