PM Kisan Yojna e KYC – देशांमधील शेतकऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा याकरता पी एम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र काही शेतकऱ्यांनी या योजने करिता आवश्यक कागदपत्रे सादर केलेले नाहीत. त्यामुळे अनियमितता निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने आता नवीन कडक नियमावली जारी केली आहे.
आता शेतकऱ्यांना ही केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आता 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर च्या दरम्यान 10व्या हप्त्याची 2 हजार रुपये रक्कम जमा होण्यापूर्वी e KYC शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
घरबसल्या कशी कराल e KYC?
केवायसी प्रक्रिया करणे अत्यंत सोपी पद्धत आहे त्याकरता तुम्हाला सर्वप्रथम केंद्र सरकारच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला वेगवेगळे टॅब दिसतील. त्यामध्ये सर्वात वरती e KYC असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक समाविष्ट करायचा आहे आणि लगेच दिलेला इमेज कोड टाकून सब्मिट बटन वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमची e KYC पूर्ण होईल.
सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये एक पी एम किसान योजनेच्या अंतर्गत देते. कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला आहे शासन ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत असल्याकारणाने गेल्या पाच वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
या योजनेच्या माध्यमातून बऱ्याचश्या खोट्या लाभार्थ्यांनी लाभ मिळवलेले सरकारच्या निदर्शनास येताच नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. ज्यांनी कागदपत्रांचा गैरवापर करून योजनेचा लाभ घेतला अशा नागरिकांकडून पैसे सुद्धा वसूल केले जात आहेत.
आतापर्यंत 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना या पैशांचा लाभ मिळत आहे. गेल्या वर्षी सुद्धा 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये रक्कम जमा झाली होती त्यामुळे यंदा सुद्धा नेमक्या कोणत्या दिवशी रक्कम अदा होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आता या संदर्भातील काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. म्हणून 10व्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकरी यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. आपण ती यादी संकेतस्थळावर बघू शकता.