Psychological market strategy of Prices 99 & 999 | वस्तूंची किंमत 99 किंवा 999 अशीच का असते?

Psychological market strategy of Prices 99 & 999 – बरेचदा वस्तूंची किंमत 99 किंवा 999 अशीच का असते हे जाणून घ्या. याचा ग्राहकांवर काय परिणाम होतो? आपण दुकानावर किंवा ऑनलाईन खरेदीला गेल्यावर आपल्याला नेहमी 99-999 अश्या किमती दिसत असतील. सुट्टे  नाहीत म्हणून दोन चॉकलेट्स सुद्धा तुम्ही स्वीकारले असतील. पण कधी हा विचार केला आहे का कि असे नक्की का? याचा परिणाम नक्की काय होतो? आणि  सर्वात महत्वाचे याचा फायदा आपल्याला कि विकणाऱ्याला?

एका रुपयामुळे असा नक्की फायदा किती होत असेल. नाना पाटेकर मॉल मध्ये एका रुपयासाठी तमाशा करतो आणि चॉकलेट स्वीकारत नाही. हि विडिओ क्लिप पाहून आपण भरपूर हसलो पण त्यामागील तथ्य आणि आर्थिक विश्लेषण तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

तुमच्या मनात कधी ना कधी असा एक प्रश्न आला असेल की, ही वस्तू फक्त नव्व्याण्णव रुपयाला का ठेवली जाते याचे नेमके कारण काय आहे. हे समजून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन देखील केले आहे. या संशोधनाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की या वस्तूंचा ग्राहकांवर ( customer behaviour) काय परिणाम होतो.

Read  Indian post office schemes | पोस्ट ऑफिस योजना

स्टोअर ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन मग यामध्ये दुकान चालवणाऱ्या दुकानदारांचा एकंदरीत टर्न ओव्हर किती असतो तसेच याचा ग्राहकांना कशा प्रकारे परिणाम होतो ते पाहूया.

संशोधकांनी जे रिपोर्ट सादर केलेले आहेत. त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, किमतीवर लावण्यात आलेल्या 99 किंवा 999 अशा प्रकारच्या लेबलचा असा थेट ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि अशावेळी त्यांच्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो म्हणूनच बऱ्याच वेळा ग्राहक अशा प्रकारच्या वस्तू विकत घेण्यासाठी पुढे येतात. यावरून असे लक्षात येते की, ग्राहक अशा प्रकारच्या वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करतात जाणून घेऊया त्यामागील खरं कारण :

ग्राहकांना 99 ही 100 पेक्षा किंमत कमी वाटू लागते :
लाईव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार अनेक देशांमध्ये असे केले जाते. सर्वप्रथम अशा किमतीं मुळे विक्रेत्यांचा मोठा फायदा होतो. Freed-Hardeman University in Henderson मधील मार्केटिंग या विषयातील प्रोफेसर Lee E. Hibbet यांच्या मते एक रुपया कमी करून किंमत लावणे हा एक Psychological market strategy म्हणजेच मनोवैज्ञानिक बाजार धोरणाचा प्रकार आहे. ग्राहकाला मानसिकदृष्टया खरेदी करण्यास भाग पाडणे. यांच्या मते ग्राहक हा प्रथम डावीकडील अंक पाहतो आणि त्यानंतर च्या अंकांना दुय्यम महत्व देतो. उदा. एखाद्या वस्तूची किंमत 1000 रुपये आहे परंतु त्याची वस्तूची किंमत 999 रुपये ठेवली तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या डोक्यात त्या वस्तूची किंमत सर्वप्रथम 900 रुपये राहते आणि नंतर रुपये 99 असणाऱ्या किमतीवर व्यक्ती जास्त लक्ष केंद्रित करत नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पहायला गेलो तर अशावेळी व्यक्तीला हजार रुपये हे 999 च्या तुलनेमध्ये खूपच कमी वाटतात तसे पाहायला गेलो तर या किमतीतील फरक एक रुपयात असतो.

Read  Changes in PM Kisan Yojna | पी एम किसान योजना मध्ये झालेले हे बदल

हर्वर्ड बिझनेस रेव्ह्यूचा रिपोर्टनुसार सेल दरम्यान वस्तूंच्या किमती व जो लेबल लावलेला असतो. तो प्रामुख्याने आपल्याला रुपये 99 असा लिहिलेला दिसतो अशातच ग्राहक वस्तू विकत घेताना त्या लेबल वरच जास्त लक्ष देत असतात ₹99 लिहिलेल्या किमती वर पाहून या वस्तूंची किंमत कमी आहे. अशा प्रकारचा ग्राहकांचा समज होतो आणि ती वस्तू विकत घेण्याचा आग्रह प्रयत्न करत असतो.

दुसरा फायदा हा सुद्धा असू शकतो कि, एक रुपया सुट्टा नसल्याने बऱ्याच वेळा विक्रेता 100 रुपये घेतो आणि ग्राहक सुद्धा तो एक रुपया सोडून देतो. ग्राहकाच्या आणि विक्रेत्याच्या बिलिंग स्लीप वर मात्र 99 रुपयाची नोंद होते. म्हणजे हा एक रुपया बिलिंग स्लीप वर येत नाही, त्यामुळे टॅक्स रेकॉर्ड मध्ये हि दिसत नाही. आता लक्षात घ्या जर एका दुकानात एका महिन्यात 10,000 ग्राहक येतात आणि अशी 10 दुकाने आहेत. प्रत्येकाकडून जर असा एक रुपया ठेवून घेतला  तर वार्षिक 1,20,000 एका दुकानाचे आणि 12,00,000 ते त्या 10 दुकानांचे टॅक्स न लागणारे म्हणजेच ब्लॅक मनीचे उत्पन्न झाले. संशोधकाचे असे म्हणणे आहे की, वस्तूंच्या किमतीवर लिहिलेले रुपये नव्व्याण्णव ग्राहकांच्या व्यवहार व शैलीला बदलतो म्हणूनच ही रणनीती मार्केटिंग मध्ये वापरली जाते. मानसिक दृष्ट्या पाहायला गेलो तर या रणनीतीचा खूपच मोठ्या प्रमाणावर फायदा सुद्धा मिळतो असा निष्कर्ष संशोधनांनी शोधून काढला आहे.

Read  School Reopen in Maharashtra | राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment