Ration Card Opening Process Maharashtra पिवळे, केसरी रेशन कार्ड वाटप सुरू…. जिल्हा निहाय यादी आली….
ज्या शिधापत्रिकाधारकांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेले आहेत आणि पूर्वीच्या शिधापत्रिकेमध्ये कुटुंब विभक्त झाल्यामुळे, विभक्त शिधापत्रिका मिळवलेली आहे, आता त्यांना त्या शिधापत्रिकेवर राशन मिळत नाही, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मित्रांनो, राज्य सरकारने आता नवीन इष्टांक मंजूर केलेला आहे. याचा फायदा या सर्व शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. याच विषयाचे महत्वाचे अपडेट आले आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हा न्यायाधीश सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात तर्फे आलेला दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी हा शासन निर्णय आहे. शासन निर्णयात अशी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अन्नधान्याचा लाभ मिळवण्यासाठी अनाथांकडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर खालील नमूद निकषानुसार नवीन शिधापत्रिका देण्यात यावी व शिधापत्रिकेवर अनुकूल असणारे लाभ सुद्धा त्यांना देण्यात यावे.
या शासन निर्णयातील प्रस्तावानुसार बऱ्याच वेळा इष्टांक मागणीही जिल्ह्यांना करण्यात आलेले होते आणि आतापर्यंत 2018 पर्यंतचे सर्व राशन कार्ड मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु 2018 पासून जिल्ह्यावर इष्टांक राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. इष्टांक म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी कोणत्या शिधापत्रिकेसाठी किती कुटुंबांना त्यांची आवश्यकता आहे, याची माहिती राज्य सरकारला जिल्ह्यात कडून मिळालेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने एक ठराविक आकडेवारी गृहीत धरून प्रत्येक जिल्ह्याला नवीन इष्टांक नवीन राशन कार्ड मंजूर केलेले आहे. याची आकडेवारी सुद्धा या जीआरमध्ये दिलेली आहे.
या आकडेवारीनुसार दिनांक 15/ 9/ 2021 च्या शासन निर्णयान्वये यापूर्वीच निश्चित करण्यात आलेले सर्व कट ऑफ म्हणजे कुठल्या तारखेपर्यंत या शिधापत्रिका मंजूर करावयाच्या याबाबतची अंतिम मुदत ही रद्द करण्यात आलेली आहे आणि आजपर्यंत ज्या शिधापत्रिका अशा योजनांसाठी पात्र आहेत त्यांना या रिष्टाँकासंसर आता नवीन शिधापत्रिकेवर धान्य राशी मिळण्यास सुरुवात होणार आहे.
मित्रांनो, यापूर्वीच शिधापत्रिकाधारकांना करून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे वार्षिक कुटुंब उत्पन्न व प्रत्येक सदस्यांच्या आधार क्रमांक या सर्व कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती दर्शवणारा सुधारित प्रत देखील भरून घेण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. आता इथून पुढे क्षेत्रीय अधिकारी अशा प्रकारची सर्व माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू करणार आहे.
शासन निर्णय:
1) शासन निर्णयानुसार 16 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णय सोबतचे विवरण पत्र रद्द करण्यात आलेला आहे.
2) अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांची प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी निवड करण्याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातसमोर दर्शवलेल्या इष्टांकाच्या आकडेवारीच्या मर्यादित लाभार्थ्याची निवड करण्यात यावी.
या शासन निर्णयान्वये/ पत्रकान्वये दिलेल्या सर्वसामान्य सूचना तसेच शासनाच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सर्वसामान्य सूचना कायम राहतील. या व्यतिरिक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला, असून त्याचा सांकेताक 20220202181445503406 असा आहे. हा आदेश डिजिटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती नवीन राशन कार्ड मंजूर करावयाचे आहेत याची माहिती या संकेतस्थळावर दिलेली आहे. त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचे नाव आहे. त्या जिल्ह्यासाठी अंत्योदयाअन्न योजना शिधापत्रिकेसाठी किती संख्या मंजूर केलेली आहे आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी किती नवीन संख्या मंजूर केलेली आहे. याविषयीची माहिती दिलेली आहे. या आकडेवारीच्या प्रमाणात नवीन शिधापत्रिका या मंजूर होणार आहे. 2018 पासून सुरुवात होणार आहे आणि इष्टांक संपल्यानंतर त्यांना इथून पुढे सुद्धा अन्नधान्य मिळणार नाही. अशाप्रकारे जिल्ह्यासाठी किती राशन कार्ड मंजूर झालेले आहेत. याविषयीची माहिती तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावर पाहू शकता.
Ration Card Opening Process Maharashtra ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.