Seeds Subsidy डाळीचे पीक अधिक व्हावे याकरिता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये एक विशेष खरीप धोरण आखलेले आहे केंद्र सरकारने विविध राज्यांशी चर्चा करून देशांमध्ये जास्त पिकवल्या जाणाऱ्या डाळी जसे की मूग आहे तूर आणि उडीद डाळीच्या लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादकता ह्या दोन्ही वाढविण्याकरीता एक सविस्तर अशी योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत उत्तम पीक देणाऱ्या जातींची बियाणे आहे जी केंद्रीय वीज संस्थांकडे अथवा राज्यांच्या बियाणे केंद्रांकडे उपलब्ध असतील अशा सर्व बियाणांचे मोफत वाटप शेतकऱ्यांना केले जाणार आहे आणि त्यामुळेच मुख्य पीक आणि आंतरपीक म्हणून डाळिंबाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे
येणाऱ्या खरीप हंगामामध्ये 82.1 कोटी किमतीच्या 20, 27, 318 बियाण्यांच्या पिशव्या शेतकऱ्यांना मदत म्हणून दिल्या जाणार आहेत या सर्व बियाण्यांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे त्यामध्ये उडीद मूग आणि तूर डाळीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे या अंतर्गत आपल्याला खालील पिशव्या दिल्या जातील.
13, 51, 710 छोट्या पिशव्या
यामध्ये एच वाय व्ही चे गेल्या दहा वर्षात त्याची लागवड झाली आहे असे प्रमाणित तूर बियाणे असेल. ज्याची उत्पादकता आंतरपीक म्हणून 15 किंटल हेक्टर पेक्षा कमी नसेल.
त्यानंतर आहेत 4,73, 295 मूग बियाण्याच्या छोट्या पिशव्या यामध्ये आपल्याला याच वाय वी चे गेल्या दहा वर्षातील याची लागवड झाली आहे असे प्रमाणित मूग बियाणे आपल्याला मिळेल याची उत्पादकता हेक्टरी 10 क्विंटल पेक्षा कमी नसेल.
93, 805 याच वाय बी चेक गेल्या दहा वर्षात ज्यांची लागवड झाली आहे असे प्रमाणित उडीद बियाणे असेल. ज्याची उत्पादकता हेक्टरी दहा क्विंटल पेक्षा कमी नसेल.
आता आहे 1,08,508 वाय व्ही चे गेल्या दहा वर्षात त्याची लागवड झाली आहे असे प्रमाणित बियाणे असेल मात्र मुख्य पीक म्हणून त्याची उत्पादकता दहा कुंटल पेक्षा कमी नसेल.
वरीलपैकी सर्व बियाण्यांच्या छोट्या पिशव्या ह्या आंतरपीक म्हणून आणि उडीद मुख्य पीक म्हणून खरीप हंगामात एकूण 4.05 लाख हेक्टर लागवड क्षेत्रासाठी पुरेसे असेल.
राज्यांमधील आणि केंद्रांमधील विभागणी नुसार राज्यांनाही या पलीकडे लागवड क्षेत्र आणि आंतरिक वाढवण्याचा कार्यक्रम पुढे सुरु ठेवल्या जाईल.
योजनेच्या माध्यमातून देशातील 11 राज्यांमध्ये आणि 187 जिल्ह्यामध्ये तूर आंतरपीक लागवड केली जाईल यामध्ये आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे व आंतरपीक लागवड क्षेत्र 9 राज्यांमध्ये 85 जिल्ह्यांमध्ये असेल.
यातही महाराष्ट्राचा समावेश आहे उडदाची आंतरपीक लागवड होणार आहे महाराष्ट्रासह एकूण 6 राज्य आणि 6 जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाईल तर उडदाची मुख्य पीक म्हणून लागवड सहा राज्यात केली जाणार आहे.
अर्ज करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
www.mahdbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin