Kadaba Kutti Yantra Anudan Yojana | कडबा कुट्टी यंत्र अनुदान 100% योजना. |

Kadaba Kutti Yantra Anudan Yojana | कडबा कुट्टी यंत्र अनुदान 100% योजना.

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते व शेतकरी बांधवांना त्यातून मदतही करते. शेतकऱ्यांना हार्दिक हातभार लावते शासनाचा नेहमी हाच विचार असतो की शेतकऱ्यांना कोण्या प्रकारे मदत करावी व त्यांना शेतीसाठी गरजेचे काय आहे ? एक योजना आणखीन शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली आहे ती म्हणजे कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना . या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना कडबा कुट्टी मशीन मोफत वाटप करण्यात येणार आहे यासाठी फक्त त्यांना अर्ज करावा लागणार आहे ही योजना शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात आली आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही चालू होती. या लेखामध्ये आपण कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर पुढे पाहूया या योजनेबद्दल अधिक माहिती योजनेसाठी कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत?, योजनेसाठी पात्रता काय आहे?, योजनेसाठी अर्ज कसा करावा? अशी आणखीन माहिती चला तर पाहूया.

Read  Covid 19 Corona Omicron Lockdown in Maharashtra 2022| राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर!

कडबा कुट्टी यांत्रेकरीता अनुदान योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे :-

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे हे अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेसाठी अर्ज करताना ही कागदपत्रे आपल्या कामी पडणार आहेत चला तर पाहूया कागदपत्रे.

आधार कार्ड 
सातबारा,
आठ एक मार्ग,
बियाणे बिल.
योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरील कागदपत्रे ही अत्यंत महत्त्वाची आहे याचा उपयोग घेवून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

 कडबा कुट्टी यंत्र आपल्याजवळ असणे का आवश्यक आहे. :-

हे मशीन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे जी शेतकरी पशुपालन करतात म्हणजेच ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत त्यांच्यासाठी हे कडबा कुट्टी मशीन असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांकडे जनावरे असतील तर त्यांना पाणी व चारा भरपूर प्रमाणात द्यावा लागतो. आणि हा चारा जनावरांना सकाळ दुपार संध्याकाळ असा टाकण्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे हा चारा कापून दळणे हे फार कठीण जाते यासाठी कडबा कुट्टी मशीन अत्यंत उपयोगी आहे ही मशीन असेल तर आपण कमी वेळेमध्ये हा चारा कापून दळून जनावरांना खायला देऊ शकतो. बहुतेक गुरे ढोरे हे चारा बारीक करून खातात म्हणून ही मशीन शेतकऱ्यांवर असणे अत्यंत गरजेचे आहे मात्र ही मशीन फार महागडी आहे याने सर्वच शेतकरी जण ही मशीन घेऊ शकत नाहीत म्हणूनच महाराष्ट्र शासनाने कडबा कुट्टी यंत्रासाठी शंभर टक्के अनुदान जारी केले आहे व योजनेचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा घेण्यासाठी उत्तेजित केले आहे यामधून शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च होणार नाही व मशीनही अनुदानामार्फत मोफत मिळेल.

Read  Gas Subsidy Information in Marathi | पुन्हा गॅस सबसिडी ची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 कडबा कुट्टी यंत्र योजनेसाठी पात्रता :-

कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील अटी मध्ये बसणे आवश्यक आहे चला तर पाहूया काय आहे पात्रता.
या योजनेचा पात्र होण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे व यामध्ये अट अशी आहे नागरिक हा ग्रामीण भागातच राहणारा असावा. अर्जदाराचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असणे अत्यंत गरजेचे आहे जर बँकेमध्ये खाते नसेल तर तो अर्ज करणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही यामध्ये बँक खाते हे आधार कार्ड सोबत संलग्न असावे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा एकर पेक्षा कमी जमीन असावी लागते तरच तो नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

 कडबा कुट्टी यंत्र  अनुदान योजना फायदे .

या योजनेमधून शेतकऱ्यांना भरपूर फायदे आहेत कडबा कुट्टी यंत्रामधून चारा हा बारीक कापला जातो व जनावरांना खाण्यास सोपा जातो. कडबा कुट्टी मशीन द्वारे चारा हा कापला गेल्यामुळे तो कमी जागेत बसतो व शेतकऱ्याला इतर चारा ठेवण्यासाठी जागा उरते कारण कोठे कोठे जागेचेही कमी असते. शेतकरी बांधव गुराढोरासाठी जो चारा शेतामधून आणतात तो मोठा असतो आणि त्याला बारीक बारीक करण्याचे काम कडबा कुट्टी यंत्र हे खूप कमी वेळेमध्ये करते. या मशीनला आपल्याला विद्युत मोटार जोडावी लागते त्यानंतर ही मशीन चालू होते व आपले काम सोयीस्कर होते मशीनला विद्युत जोडल्यामुळे मशीनचा वेग वाढतो व चारा खूप वेगाने कापला जातो, यामुळे वेळ पण वाचतो व कामही सोपे होते.

Read  Crop Insurance 2023 | शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई, 30 हजार रुपये.

कडबा कुट्टी यंत्र  अनुदान योजने साठी अर्ज कसा करावा व कोठे करावा ?

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी आपल्याला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. वर लेखांमध्ये पात्रता दिलेली आहे जर आपण या सबसिडीसाठी पात्र असाल तर नागरिकांनी महाडीबीटी वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
 अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता लॉगिन केल्यानंतर तुमची नोंदणी झाली असेल तर ठीक नाहीतर त्याचे नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करा व नोंदणी करून घ्या. त्यामध्ये पुढे पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला लिंक दिसेल अर्ज करा अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा त्यामध्ये एक ऑप्शन दिसेल कृषी यांत्रिकीकरण यावर क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला माहिती टाकावी लागेल खालील प्रमाणे तुम्ही ती माहिती टाकू शकता.
सर्वप्रथम मुख्य घटक या पर्यायांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा त्यानंतर तपशील मध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय तुम्ही क्लिक करून पुढे जा त्यानंतर बिल ड्राईव्ह प्रकार असा पर्याय निवडा त्यानंतर एचपी शनीमध्ये तुम्हाला कशावरही क्लिक करायचे नाही आहे यंत्रसामग्रीसाठी फॉरेस्ट अँड हा पर्याय क्लिक करा तेथे प्रकल्प खर्च श्रेणी ही तशीच ठेवा त्यानंतर मशीनचे प्रकार दिसतील त्यामध्ये एक पर्याय निवडा अर्ज सेव करा अशा सोप्या पद्धतीने तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही स्वतःही करू शकता तुमच्या मोबाईलवरही हा अर्ज भरल्या जाईल. या योजनेसाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान दिले जात आहे तर लवकरच योजनेचा फायदा घ्या.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Akshay Athare Age, biography, Wiki, Inatagram,Grilfriend Name 2022

Leave a Comment