मित्रांनो जिल्हास्तरावरून आणि राज्यस्तरावरून राबविण्यात येणारी शेळी Shelipalan Yojana आणि मेंढी गट वाटप अनुदान योजना या योजनेच्या अटी मध्ये आणि निकषांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि आता जे अनुदान मिळणार आहे ते 50 टक्क्यांवरून 75 टक्के मिळेल अनुदान यामध्ये मिळणार आहे तर याच्या अटी आणि शर्ती मध्ये नेमके काय बदल केलेली आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात जीआरच्या पुराव्यानिशी पाहणार आहोत.
पहा मित्रांनो शेळी मेंढी (Mendhi Palan) गट वाटप बाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी-मेंढी यांच्या खरेदी किमतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दिनांक 25 मे 2021 चा शासन निर्णय आहे.
तर शासन निर्णयात काय माहिती दिली आहे पहा. योजनेचे स्वरूप कसे असेल, याचा तपशील हा मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिलेल्या आहे. यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या शेळ्या खरेदीसाठी प्रति शेेळी 8 हजार रुपये अशा प्रकारे 10 शेळ्यांच्या गटासाठी 80 हजार रुपये एवढा खर्च लाभार्थ्यांना येणार आहे आणि ज्या स्थानिक जाती आहे त्यांच्यासाठी प्ररती शेेळी 6 हजार रुपये अशा प्रकारे 10 हजार रुपये एवढा खर्च लाभार्थ्यांना येणार आहे, आणि याच सोबत एक बोकड खरेदी जो उस्मानाबादी बोकड( Bokad) आहे. त्यासाठी 10 हजार रुपये प्रति बोकड एवढा खर्च येणार आहे, आणि स्थानिक जातीसाठी 8 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. यामध्ये मित्रांनो शेळी व बोकड यांचा विमा आहे.
हे पण वाचा :प्यारी खबर
विम्याचा खर्च दिलेला आहे 13 हजार 545 एवढा करतो उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी आहे. स्थानिक जाती साठी हा खर्च 10 हजार 231 रुपये मिळणार आहेत. एकूण सर्व खर्च उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी करता 1 लाख 3 हजार 545 एवढा संपूर्ण खर्च येणार आहे, तोही विम्या सह. स्थानिक जातीसाठी 78 हजार 231 एवढा खर्च येणार आहे. अशाप्रकारे शेळी आणि बोकड यांच्या किमती आहेत.
Shelipalan खर्च
आता पाहू आपण मेंढ्या खरेदी करता किती खर्च येणार आहे प्रति मेंढी 10 हजार रुपये या दरानुसार माडग्याळ जाती करता एक लाख रुपये खर्च येणार आहे. दखनी आणि स्थानिक जाती च्या मेंढ्यांसाठी 8 हजार असा एकूण 10 मेंढा यांकरिता 80 हजार रुपये खर्च येणार आहे.
नर मेंढ्या करता माडग्याळ या जाती करिता 12 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे तोही प्रति नर 10 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे असे एकूण 16 हजार 850 विमा सहज खर्च येणार आहे.
स्थानिक जाती करता 13 हजार 845 एवढा खर्च येणार आहे मेंढ्यांचा एकूण खर्च पाहता माडग्याळ या जाती जाती करता 1 लाख 28 हजार 850 रुपये खर्च येईल.
तसेच स्थानिक जातीसाठी 1 लाख 3 हजार 545 मध्ये दख्खनी व अन्य स्थानिक जाती येतील. अशाप्रकारे हे योजनेचे स्वरूप होतं आणि सर्व जातिंकरता किती खर्च येईल हे आपण बघितल आहे.
10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या आणि 1 नर ह्या करता वरील माहिती आपण बघितली.
शेळी मेंढी (Shelipan Yojana)गट वाटप योजनेचे स्वरूप किंवा अटी व शर्ती
1. या योजनेअंतर्गत लाभार्थ्ना उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दखणे व अन्य स्थानिक प्रजातींच्या दहा मेंढ्या अधिक एक नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल शेळी अथवा मेंढ्यांच्या प्रजातींची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील.
2. सदर योजनेमध्ये खुल्या व इमाव म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 50 टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व 50 टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन किमान पाच टक्के स्व हिस्सा व उर्वरित 45 टक्के बँकेचे कर्ज असे उभारणे आवश्यक आहे.
3. तसेच सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व 25 टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन म्हणजेच किमान पाच टक्के हिस्सा व उर्वरित 20 टक्के बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक आहे.
4. या योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रम निकष म्हणजेच उतरत्या क्रमाने खालीलप्रमाणे राहतील.
अ. दारिद्र रेषेखालील लाभार्थी
ब. अत्यल्पभूधारक म्हणजेच एक पर्यंत भूधारक.
क. अल्पभूधारक म्हणजेच 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक
ड. सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.
इ. महिला बचत गटातील लाभार्थी म्हणजेच क्रमांक अ ते ड मधील.
5. शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा सर्व खर्च ला भारताने करणे आवश्यक राहिल सदर योजनेअंतर्गत 10 शेळ्या अधिक 1 बोकड या शेळी गटांचा व 10 मेंढ्या अधिक 1 नर मेंढा या मेंढी गटांचा खर्चाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
6. योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती.
1. सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणे अथवा लाभार्थ्याचे कोअर बँकींग सुविधा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असल्यास सदर खाते या योजनेशी संलग्न करणे आवश्यक राहिल जेणेकरून या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग करणे शक्य होईल.
2. लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक लागू असेल तेथे या बचत खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.
3. अशाप्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांनी सोयीच्या ची रक्कम समान कल्याची खात्री केल्यानंतर शासकीय अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येईल.
4. या योजनेअंतर्गत उस्मानाबादी संगमनेरी किंवा अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम शेळ्या बोकडांची तसेच माडग्याळ दखणी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या मेंढ्या ची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ गोखलेनगर पुणे 16 यांच्याकडून करण्यात येईल महामंडळाकडे शेळ्या बोकड मेंढ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास अधिकृत बाजारातून खरेदी करण्यात येईल.
5. शेळी मेंढी गटाचा पुरवठा केल्यानंतर लाभार्थ्याने कमीत कमी तीन वर्षे शेळी-मेंढीपालन व्यवसाय करण्याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.
6. लाभार्थ्याने शेळ्या-मेंढ्या विकल्याचे किंवा अन्य प्रकारे योजनेच्या अंमलबजावणी चूक केल्याचे दिसून आल्यास अनुदानाची रक्कम वसूल करण्याबाबत विहित महसूल कार्यपद्धती चा अवलंब करण्यात येईल.
7. योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीची यादी संबंधित पशुधन विकास अधिकारी विस्तार कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्था व संबंधित ग्रामपंचायत त्यांचे स्तरावर उपलब्ध करून द्यावी पशुधन विकास अधिकारी विस्तार यांनी तसेच कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्थांनी लाभार्थ्यांची नोंद शेळी-मेंढी (Shelipalan Yojana) गटाच्या तपशिलासह स्वतंत्र नोंद वहीत घ्यावी व पाठपुरावा करावा. अशीच माहिती बघण्याकरता आमच्या आई मराठी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या