Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme 2022 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना. आम्ही तुमच्यासाठी खास एक योजना घेऊन आलो आहोत. त्या विषयी सविस्तर माहिती पहावयाचे असेल तर हि पोस्ट पूर्ण वाचा. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25000/- रुपये वरून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना :
वसंतराव नाईक महामंडळातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लघु उद्योग करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ज्यामध्ये तुम्ही विविध लघु व्यवसाय करू शकता जसे कि, आईस्क्रिम, पार्लर व इतर, मासे विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान इ. त्या व्यतिरिक्त खालील काही वेळ असा आहे की जे तुम्ही करू शकता.
मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर, हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीट्युट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरुस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग
VJNT loan scheme 2022 कर्जाचे स्वरूप :
प्रकल्प खर्चाची मर्यादा 1 लाख रूपये पर्यंत असेल. या योजनेत महामंडळाचा सहभाग 100% असून कर्जमंजूरीनंतर 1 लाख रूपयांचे कर्ज लाभार्थ्याला देण्यात येईल. जे लाभार्थी कर्जाची परतफेड दिलेल्या वेळेत करतील अशा लाभार्थ्यांकडून व्याज आकारण्यात येणार नाही.
नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल.
कर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला कर्जदाराला पहिला हप्ता 75% असेल म्हणजे तुम्हाला 75 हजार पहिल्यांदा भेटतील.
आणि उरलेली बाकी 25 हजार रुपये तुमचा उद्योग सुरु झाल्यानंतर 3 महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतील.
वसंतराव नाईक कर्ज योजना 2022 पात्रता :
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
उमेदवार कोणत्याही बॅंकेचा /वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला या लाभार्थीना तात्काळ व प्राथम्याने लाभ देण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक महामंडळ ऑनलाईन अँप्लिकेशन डोकमेंट्स :
1) आधार कार्ड
2) पैन कार्ड
3) बैंक पासबुक
4) जातीचे प्रमाणपत्र
5) राशन कार्ड
6) प्रोजेक्ट रिपोर्ट
7) एक पासपोर्ट साइज फोटो
जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्ही Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme 2022 या योजनेचा लाभ घ्या व ही माहिती इतरांना शेअर करा. तसेच माहिती तुम्हाला कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा.
माननिय साहेब आम्ही दोन वर्षांपूर्वी समाजकल्याण ला ही फाईल टाकले आहे तरी आमच्या बॅंकेने देण्यास टाळाटाळ करत आहे
Goat from
Goat from