Sheti Tar Compound Yojana Maharashtra 2023 | शेती कुंपण योजना महाराष्ट्र २०२३.

भारत हा शेतीप्रधान देश आहे व त्यातील बहुतांश शेतकरी शेती हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करताना त्यांना खूप त्रास होतो व त्यांनी केलेल्या कष्टातूनही त्यांना पुरेल तसा मोबदला मिळत नाही. त्रास म्हणजे सांगायचे झाल्यास जंगली पशु पक्षांमुळे होणारा त्रास. हा त्रास शेतकऱ्यांनाही होतो आणि शेतीतील पिकालाही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते आता त्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात येत आहे , शेताला तारेचे कुंपण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही अशी योजना आखणी गरजेचे आहे कारण ही योजना राजस्थानमध्ये सरकारने सुरू पण केली आहे. महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच पिकांमधील काही पिके असे आहे ज्याला कुंपण करणे अतिशय गरजेचे आहे . शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नाही की तो पूर्ण शेताला कुंपण करेल जर महाराष्ट्र सरकारने ही अशी योजना आणली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल व त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल ही योजना आणि गरजेचे आहे कारण त्याने पिकांना खूप नुकसान होते. जसे वर आपण सांगितले आहे की राजस्थान सरकारने ही योजना चालू सुद्धा केली आहे त्यामध्ये पाच हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी मुख्यमंत्री किसान साठी ही योजना राबविली जाते.

Read  Khapli Gahu Pik गव्हाचे पीक लागवड

अनुदान किती मिळणार येथे क्लिक करा .

Leave a Comment