आपल्या देशामध्ये शेतीचे प्रमाण हे खूप आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना नेहमी काळजी पडलेली असते की आपल्या शेतीचा बांध हा कोणी घेतला का किंवा तो जागेवर आहे की नाही . जेव्हा शेतकरी बांधव हे दुसऱ्या जवळून पैसे देऊन शेती स्वतःच्या नावावर करतात तेव्हा त्यामध्ये आपण दिलेल्या पैशांमध्ये जमीन पूर्ण आपल्याला मिळते आहे किंवा नाही. यासाठी आता एक नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांना माहित पडेल की आपली जमीन कोणी ताब्यात घेतली किंवा नाही. हा उपाय हा भूमी अभिलेख विभागाने सुचविला आहे. यासाठी अचूक जोडणी करून ही माहिती समोर येणार आहे. शेती विकत घेताना आपण देतो त्या पैशांमध्ये जमीन आपल्याला पूर्ण मिळती आहे का नाही ही पडताळणी करणे गरजेचे असते.