group

Solar rooftop subsidy scheme | मोफत वीज मिळेल सरकारच्या योजनेतून

Solar rooftop subsidy scheme संपूर्ण देशात विजेचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेला आहे भारतामध्ये विजेच्या निर्मिती करिता मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जातो आहे काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला अशा बातम्या देखील आल्या. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार देश वाशी यांकरिता एक मोठी योजना घेऊन आली आहे त्यामुळे नागरिकांना मोफत वीजपुरवठा होऊ शकेल.

काय आहे योजना?

Solar rooftop subsidy scheme सोलर रूफ टॉप सबसिडी स्किम अशा या योजनेचं नाव आहे सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना मानले जाते. देशांमधील सौरऊर्जेला प्रोत्साहन भारत देत आहे सोलर रूफ टॉप योजनेद्वारे केंद्र सरकार देशांमध्ये कधीही न संपणारी ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देते आहे याकरिता केंद्र सरकार ग्राहकांना सोलर रूफ टॉप बसण्यावर अनुदान देते.

Read  Ayushman Card List 2022 | आयुष्मान भारत यादी 2022

किती वर्ष मोफत वीज मिळणार?

साधारणतः  सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर रूप टॉप बसवून विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी करता येईल. सोलर रूफ टॉप 25 वर्षासाठी वीज पुरवेल आणि या योजनेतील खर्च 5 ते 6 वर्षात दिला जाईल यानंतर तुम्हाला पुढील 19 ते 20 वर्ष सौरऊर्जेवरील मोफत विजेचा लाभ मिळेल.

सरकार किती सबसिडी देणार?

सोलर रुफ टॉप सबसिडी योजना ही योजना भारत सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. 3kw परंतु आपल्याला सौर रूफतोप पॅनल स्थापित करण्याकरता सरकारकडून 40% पर्यंत सबसिडी मिळेल त्याच वेळी तुम्ही जर 3kw च्या पुढे केंद्र सरकार कडून तुम्हाला 10kw पर्यंत 20% सबसिडी दिली जाणार आहे.

Read  Changes in PM Kisan Yojna | पी एम किसान योजना मध्ये झालेले हे बदल

जागा किती लागेल?

सोलर पॅनल लावण्याकरता जास्त जागेची गरज नाही तुम्ही ते तुमच्या घराच्या किंवा कारखान्याच्या छतावर आरामात लावू शकता. 1kw सौरऊर्जेचे करता 10 चौरस मीटर जागा आवश्यक आहे. सोलर रूप टॉफ सबसिडी योजना करता तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता तसेच तुम्ही mnre.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

group
x