Soyabin Pik Vima Yojana 2022 – शेतकरी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा आहे. अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे सोयाबीन पीकवणारे असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 25% आगाऊ सोयाबीन विमा (Soyabin Vima 2022) म्हणजेच खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना अकोला जिल्हा करता लागू करण्यात आलेली आहे.
अकोला या जिल्ह्यामधील कीड रोग, अतिवृष्टी व पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनचे फुल गळून पळाले त्यामुळे शेंगा परिपक्व झाल्या नसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची दिसून आले. आता अशा परिस्थितीमध्ये अकोल्या जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकरी हे पिकांच्या नुकसानीचे 50% आगाव रक्कम मिळण्यासाठी पात्र झाले आहेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढावी अशी मागणी केली जात होती.
त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अकोला सोयाबीन विमा 2022 करता अधिसूचना लागू केलेली आहे.
1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये अकोल्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले त्यामुळे जिल्हा समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे.
जर दुष्काळ, पावसाचा खंड, पूर अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त गट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ म्हणून 25% मर्यादेपर्यंत रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
यामुळे आता अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकाच्या उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोयाबीन या पिकाकरिता हंगामी प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केलेली आहे.
अकोला जिल्ह्यामधील मंडळा नुसार नुकसान टक्केवारी आपल्याला खालील प्रमाणे बघता येईल