Talathi Mandal Adhikari Bharti राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे की तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती या दोन्ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत 3110 तलाठी तसेच 518 मंडळ अधिकारी अशी एकूण 3628 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
गेल्या काळामध्ये राज्यात अनेक तलाठी पदे रिक्त होती. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आलेली असल्याने अनेक कामांना विलंब व्हायचा आणि त्यामुळे महसुली यंत्रणेवर त्याचा तहान यायचा म्हणून विखे पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी याकरता पुढाकार घेतलेला दिसतो. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी संबंध येत असतो सातबारा असेल किंवा विविध दाखले द्यायचे असतील तर नियमितपणे तलाठ्याकडे जावे लागते तलाठीच नसले तर हे दाखले किंवा सातबारा मिळणे कठीण होऊन जाते त्यामुळे तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी मदतच होणार आहे.
यामुळे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विविध विहित केलेल्या निकषांच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसूल विभागणीय प्राप्त माहिती अनुसरून वाटप करण्यात आलेल्या 3110 आणि 518 महसूल मंडळ अधिकारी कार्यालयासाठी 3110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती करण्याचे ठरले आहे असे एकूण 3618 पदे निर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे याबाबत आपण 7 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय बघू शकता.