Vrudh Kalakar Mandhan Yojana | वृद्ध कलाकार मानधन योजना

Vrudh Kalakar Mandhan Yojana साधारणतः दोन योजनांची माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

पहिली योजना

वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या माध्यमातून आराधी, नाटककार, गोंधळी, तमाशा मध्ये काम करणारे, साहित्यिक इत्यादी करता मासिक वेतन योजना सरकारने सुरू केली आहे ज्यास आपण वृद्ध कलाकार मानधन योजना करू शकतो. या वृद्ध कलाकारांना मासिक वेतन 2200 रू सरकारने सुरू केलेले आहे. तर शहरी कलाकारांनी करता 2750 रुपये मानधन दिले जाणार आहे. या मासिक वेतन योजने करता कोण कोण अर्ज करू शकतात अर्ज कोठे करायचा आहे हे या लेखामध्ये विस्तृत आपण जाणून घेऊया.

आता या योजनेकरिता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अर्ज प्राप्त झाले आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज प्राप्त झाली नसतील, त्या जिल्ह्याला देखील लवकरच प्राप्त होणार आहेत. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्ज करण्याकरता शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 देण्यात आलेली आहे. पंचायत समिती मार्फत हा अर्ज आपल्याला करायचा आहे.

Read  कोरोनामुळे मयताच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत Corona Covid 19 Death

 

दूसरी योजना

कोरोना कालावधीमध्ये तमाशाचे फळ, लावण्या, बाऱ्या, दशावतार नाटके अशा ठिकाणी विविध प्रकारचे जे कलाकार आहेत त्यांचे करोना काळामध्ये काम गेलेले असल्यामुळे त्यांना एक वेळेसचे 5000 रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय सरकारने काढला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून करुणा पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसाहाय्य देणे बाबत शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2021 रोजी काढलेला आहे.

शासन निर्णय मध्ये म्हटल्याप्रमाणे देशात करोना विषाणू चा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशांमध्ये लावून लागू होता तसेच लोक डाऊन सितील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नाट्यगृहे चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित रहावे लागले तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळामध्ये संगीत करण्यात आले होते.

Read  Gharkul Yojana Update | घरकुल योजना अपडेट

या काळात सांस्कृतिक व कला क्षेत्रातील संघटित व असंघटित कला प्रकारातील विविध कलाकार ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे त्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे इतर राज्यांमध्ये कलाकारांना करुणा च्या पार्श्वभूमीवर ठोक एकरकमी अनुदान देण्यात आलेले आहे तसेच राज्यातील विविध विभागामार्फत करण्याच पार्श्वभूमीवर बाधित असलेल्या जनसामान्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आलेली आहे याच धर्तीवर राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकारांना शासनामार्फत आर्थिक मदत व्हावी अशी मागणी लोकप्रतिनिधी विविध संघटना संस्था व कलाकार यांनी केली आहेत सदर मागणी विचारात घेऊन अशा कलाकारांना एक रकमी आर्थिक सहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

3 जानेवारी 2022 पर्यंत साधारणतः आहे अर्ज स्वीकारले जाणार आहेत शासन निर्णय मध्ये याची विस्तृत माहिती दिली गेलेली आहे. साधारणतः 56000 कलाकारांना ही मदत दिली जाणार आहे. आपण खाली क्लिक करून शासन निर्णय वाचू शकता. अर्ज आपल्याला तहसील कार्यालयामध्ये करायचा आहे त्यासाठी खाली शासन निर्णय वर क्लिक करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता.

Read  Satbara Utara 7/12 सातबारा उतारा वाचन कसे करतात?

शासन निर्णय 

 

 

 

Leave a Comment