Satbara Utara कसा वाजवतात ते आपण पाहणार आहोत. आपल्या पैकी बऱ्याच जणांना नोकरी निमित्ताने किंवा इतर कारणाने आपल्या मूळ गावापासून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे शहरात किंवा दुसरा कुण्या गावामध्ये स्थायिक व्हावे लागत असते. बर्याचदा त्या गावात आपल्या काही वडीलोपार्जीत किंवा स्वतः कष्टाची जमीन देखील असतात.
Satbara Utara सातबारा उतारा वाचन कसे करतात?
Table of Contents
आपल्या आजी-आजोबा आईवडिलांच्या पिढीला जमिनी संदर्भातल्या थोड्या तरी कायदेशीर बाबी ती त्या गावच्या ठिकाणी राहत असल्याने माहीत असायच्या परंतु आपल्या पिढीला मात्र त्या गावापासून लांब राहिल्यामुळे सातबाराचे उतारे, फेरफार पत्रक, वारसा हक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीं विषयी फारशी माहिती दिसत नाही.
तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनी संदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उत्तर याचीही माहिती करून घेणार आहोत. जमिनीचे रेकॉर्ड आहे. ते तलाठ्याकडे मध्ये ठेवले जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना आणि 12 नंबरचा नमुना असे दोन नमुने एकत्र करून सगळ्या शेत जमिनीचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा एक छोटा फॉर्म बनवण्यात आला.
त्याला Satbara उतारा तलाठ्याकडून सातबारा उतारा हा दरवर्षी आपण काढला पाहिजे कारण यामध्ये दोन तीन कारणांमुळे बदल होतो. एक म्हणजे आणि मुळे दुसरा म्हणजे पारस तो झाली अथवा जमिनीची खरेदी विक्री झाली. तर त्यामुळे सातबारामध्ये याबद्दल दहा वर्षानंतर तलाठी यांच्याकडून 26 सातबारा दिला जातो.
आता आपण समजून घेणारा सात बारा कसा वाचायचा, सुरुवात करायची, कसा समजून घ्यायचा सातबाऱ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. गाव नमुना सात आणि गाव नमुना सातबारा तयार आलेला आहे. जो आहे तो मालकी हक्काबाबत आहे. दाराच्या नावाबद्दल आहे. सातबाराच्या सर्वात वरती गावाचे नाव असते. त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
आपल्या महाराष्ट्राचे जिल्हे, तालुके, गावे, खेडी यात विभागणी झालेली आहे. या जमिनीचे क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर नदी नाले व समुद्राच्या किनाऱ्याच्या भरतीच्या खोली पर्यंतचा जो भाग असतो. तो शासकीय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते. त्यात शेतीसाठी वापरत असलेली जमीन पडीत जमीन, माळरान जमीन, गावठाण अशा बऱ्याच प्रकारचे जमिनीचा समावेश होत असतो.
सातबारा म्हणजे काय?
Satbara Utara म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाच असतो. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्याजागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 अंतर्गत शेत जमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळे नोंदणी पुस्तके देखील असतात. त्यालाच रजिस्टर बुक असे म्हणतात.
या रजिस्टर बुकमध्ये कुडाचे मालकी हक्क शेत जमिनीचा हक्क व शेतातल्या पिकांना यांचा समावेश असतो. तसे यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे गाव नमुने ठेवले जातात. प्रत्येक गावच्या नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 म्हणून सातबारा उतारा तयार होत असतो म्हणून या उतारा सातबारा उतारा असे म्हणतात.
सातबारा उताऱ्यामध्ये काय असते? Satbara Utara
तर प्रत्येक जमीन धारकास स्वतः कडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उतारा वरून आपल्याला कळू शकते. गाव नमुना सात हे अधिकार पत्रक आहे व गाव नमुना बारा आहे. पीक पाहणी पत्रक आहे. जमीन महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. सातबारा उतारा याच्या अगदी वर गाव तालुका जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते.
गाव नमुना 7
उताऱ्याच्या डाव्या बाजूस भूभाग माप सर्वे गट व हिस्सा नंबर दाखवलेला असतो. सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला नंबर दिलेला असतो त्याला भूमापन किंवा सर्वे नंबर किंवा गटनंबर असे म्हणतात आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा किती आहे हे हिचा नंबर सुद्धा दाखवलेले असते. त्या जवळच जमीन ज्या प्रकाराने धारण केले असते ती भूधारणा पदधती दाखवलेले असते.
जमिनीवर त्या व्यक्तीकडे कशी आली हे सुद्धा आपल्याला त्यावरून करू शकते. भोगवटादार वर्ग एक म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली मालकी हक्क असलेली असते. यालाच खालचा असेही म्हणतात. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी. जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री,भाडेपट्टा, गहाण, दान, हस्तांतरण करता येते.
सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भूधारणमध्ये मोडते. अशा अटींचा भंग केल्यास सरकार ती काढून घेते. या ईनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात. भूमापन क्रं.चे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास त्याचा उल्लेख असतो.
त्याखाली जमिनीचे लागवडीचे योग्य क्षेत्र यात जिरायत, बागायत, भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते. हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते. त्याखाली पो.ख. म्हणजे पोट खराबा म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते. यात पुन्हा वर्ग (अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग (ब) मध्ये रस्ते, कालवे, तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते. त्याखाली आकार, जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.
गाव नमुना 7 च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते. प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा Satbara Utara पाहिला असता जर जमिन विकत देणार्याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे. जमिन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नविन मालकाचे नाव त्याखाली लिहीले जाते. मालकाचे नावाशेजारी, वर्तुळात काही क्रं. दिलेले असतात त्याला फेरफार असे म्हणतात. त्याबद्दल आपण नंतर पाहू.
गावनमुना 7 च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते. ‘इतर हक्क’ मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणार्याच्या नावाची नोंद असते. या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते.
इतर हक्क सदरात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे आवश्यक असते. काही वेळेला संपूर्ण जमिन न घेता त्यातील काही भागचं विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात. इतर हक्क मध्ये ‘तुकडेबंदी’ असे नमूद केलेले असेल तर ती शेतजमिन असेल तर ती शेतजमिन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही.
पुनर्वसानासाठी संपादीत असा शेरा असल्यास सरकारला रस्ते, धरण यासाठी जी जमिन संपादित करायची असेल त्यातील शेतकर्याचे पूनर्वसनासाठी सरकार इतर जमिनी संपादित करु शकते. तेव्हा अशी जमिन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही.
कुळकायदा कलम 43 च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमिन जिल्हाधिकार्यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही.
कुळकायदा कलम 84 च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास शेतीवापरासाठी असलेली जमिन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असलीचं पाहिजे. ती व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकार्याकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते.”तुम्हाला आमची माहिती Satbara Utara कसा वाचतात याविषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
कुळ व खंड कोष्टका मधील “रीत पाच “चा अर्थ कसा आहे