Happy New Year 2022 in Marathi आज इंग्रजी वर्ष 2022 ची सुरुवात सर्वप्रथम शेतकरी या ब्लॉग टीमकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो असेच वर्ष 2021 आले होते आपण एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या आणि काही जणांनी तर संकल्प दिवस सुद्धा म्हणून पाळला होता. म्हणून फक्त संकल्प करून चालत नाही तर कृती करावी लागते.
नववर्ष आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो. परंतु जर आपण नववर्षदिन हा संकल्प दिवस म्हणून पाळला तर येणाऱ्या वर्षात आपल्याला काय काय करावे लागेल किंवा पण काय करू शकतो किंवा कुठल्या गोष्टी आपण करायला नको, हे या लेखांमध्ये जाणून घेऊयात.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कुठल्याही गोष्टीची आपल्याला सवय लावून घ्यायची असेल तर एकवीस दिवस लागतात मग आपल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या चांगल्या मध्ये रूपांतरित करण्याकरता सलग 21 दिवस आपण कुठलीही गोष्ट चांगली करून बघा तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल म्हणून आपण इथे पाहू की आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या नाहीत.
नवीन वर्ष 2022 मध्ये ह्या गोष्टी करून बघा
स्वतःवर विश्वास ठेवा.
स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका.
नेहमी खरे बोला.
इतरांच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
आई-वडिलांपासून दूर जाऊ नका.
थोरामोठ्यांचा आशीर्वाद नेहमी मिळवत जा.
थोर पुरुषांना कधीही विसरू नका आणि त्यांच्या कृती, कार्यावर भर द्या.
नेहमी चांगले शिकत रहा.
चांगल्या मित्रांची साथ सोडू नका.
व्यवसायामध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करा.
नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या सोबत हसत खेळत रहा.
वरिष्ठांची खरे असेल तर मर्जी सांभाळा.
आपला स्वभाव प्रेमळ ठेवा.
अजातशत्रू बना म्हणजे तुमच्या जीवनात कोणालाही शत्रू बनवू नका.
भांडणांमध्ये वेळ जातो म्हणून त्यापासून दूर राहा.
एक झाड दरवर्षी लावा.
पर्यावरणाला आपल्यापासून हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्या.
जुन्या आणि नव्या विचारांचा मध्ये साधा.
जुने ते सोने म्हणून त्याला चिकटून राहू नका.
इतिहासात जा परंतु त्यामध्ये गुंतून राहू नका.
नवीन नवोपक्रम विचारांना चालना द्या.
प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत राहा.
आपलीच शेखी मिरवू नका.
इतरांवर विश्वास ठेवायला सुरुवात करा.
मोठ्यांचा नेहमी आदर ठेवा.
आपल्यापेक्षा लहान यांचे नेहमी कौतुक करा.
कुठल्याही गोष्टीत समोपचार बाळगा.
चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
संयम ठेवून काम करा.
अंथरूण पाहून पाय पसरा.
नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ म्हणून आरोग्य सांभाळा.
रोज दोन किलोमीटर चला.
रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.
लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा.
मनाची एकाग्रता ठेवा.
चिंतन-मनन यावर भर द्या.
आपला इतिहास विसरू नका.
मुलांवर चांगले संस्कार टाका.
नेहमी आपल्या कामात मग्न राहा.
स्वतःला मोठे लेखून इतरांना कमी लेखू नका.
उद्योगी बना.
बचत करायला शिका म्हणजे आज तुम्ही पैशाला वाचवले तर पुढच्या काळी तो तुम्हाला वाचवेल.
शक्यतोवर कर्ज काढू नका.
जीवन जगण्याचा टाइमटेबल बनवा.
इतरांच्या दुखात नेहमी सामील व्हा, आनंदात सामील झाले नाही तरी चालेल.
जीवनात काही उद्दिष्ट ठेवा.
स मित्रांनो वरील गोष्टी आपण पाळल्या किंवा आत्मसात केल्या तर नेहमी तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहा आणि हा आनंद इतरांना सुद्धा तुम्ही देऊ शकाल. या नवीन वर्षामध्ये स्वतःची व आपल्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या, आरोग्य सांभाळा, व्यवसाय करा, शिकून मोठे व्हा, आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा