Ration Shop Permission स्वस्त धान्य दुकान परवाना

Ration Shop Permission मित्रांनो प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानाची जाहिरात निघत असते आणि मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खालील  स्वस्त धान्य दुकानाचे प्राधान्यक्रम असतात.

1) पंचायत.

2) नोंदणीकृत सहाय्यक स्वयंसहाय्यता बचत गट.

3) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था.

4) संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास. दुकाने. मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्यासमोर याद्वारे समुदायात द्वारे करणे आवश्यक राहील प्राधान्य सूचनेनुसार पंचायत संस्था गटांची निवड करताना ज्येष्ठ वर्धन सक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेल्या पंचायत संस्था गटास प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज करतांना अर्जासोबत पंचायत संस्था स्वयंसहाय्यता गटांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.

1) पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्यासाठी ग्रामसभेचा ठराव ग्रामपंचायत चा दुकान मागणीचा अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला इत्यादी.

2) पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) नोंदणीकृत सहायता बचत गट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास. नोंदणी प्रमाणपत्र.

Read  आधार कार्ड डाऊनलोड चेक | UIDAI Aadhar Card Download in Marathi

3) पंचायत / स्वयंसहाय्यता बचत गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास.  यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र, जसे बँक पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र.

4) व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत प्रमाणपत्र जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर टॅक्स पावती, सातबारा व 8 अ, लाईट बिल, मिळकत उतारा, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौरस फूट मध्ये.

5) बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र.

6) पंचायत / स्वयंसहाय्यता बचत गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास. यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल.

7) पंचायत /स्वयंसहाय्यता बचत गट /संस्था /सार्वजनिक संस्था /न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन 2016 – 2017 पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल.

8) पंचायत / स्वयंसहायता बचत गट / संस्था / सार्वजनिक संस्था/ न्यास यांना दिलेले कर्ज व झालेली झालेली परतफेड विवरण 2016 – 2017 पासून आतापर्यंत.

9) पंचायत /स्वयंसहाय्यता बचत गट /संस्था सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सभासदांचे नाव पूर्ण पत्त्यासह.

Read  Aadhaar Smart Card | 50 रुपयांमध्ये घरी बोलवा आधार स्मार्ट कार्ड

10) पंचायत/ स्वयंसहायता बचत गट /संस्था /सार्वजनिक संस्था / न्यास यांचे मुळ व आजचे भाग भांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती.

11) रास्त भाव दुकान मिळणेबाबत व व्यवसाय करणेबाबत संमती दर्शविलेला पंचायत स्वयंसहाय्यता बचत गट/ संस्था /सार्वजनिक संस्था /न्यास यांचा ठराव.

12) पंचायत/ स्वयंसहाय्यता बचत गट /संस्था /सार्वजनिक संस्था /न्यास स्वतः एकत्रितरित्या चालवीतील, कोणीही इतर व्यक्ती किंवा इतर संस्थेस चालविण्यास येणार नाही. किंवा हस्तांतरित करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.

13) जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाचे निवासी जागेतील शिधावाटप दुकानासाठी नाहरकत प्रमाणपत्र.

14) भाडेतत्त्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधिग्राह्य दस्तऐवज.

15) प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी, बांधकामाच्या वैधतेसंबंधी इतर तत्सम बाबींसंबंधी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा केंद्रशासनाच्या कायद्याचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब विना नोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र.

16) पंचायत /स्वयंसहायता बचत गट /संस्था /सार्वजनिक संस्था /न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधा वाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र किंवा स्थानिक प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र.

Read  LPG Gas Sylinder Subsidy in Marathi | आपल्या बँक खात्यात गॅस सबसिडी रक्कम जमा झाली किंवा नाही कसे तपासणार?

17) पंचायत /स्वयंसहायता बचत गट /संस्था /सार्वजनिक संस्था /न्यास सदस्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरील प्रतिज्ञापत्र.

18) जाहीरनाम्यातील नमुद गावांपैकी ज्या स्वस्त धान्य दुकानाचे अधिकार पत्र अनुज्ञप्ती प्राधिकारी यांचे आदेशान्वये रद्द करण्यात आलेले आहे व त्याबाबत मा. उपायुक्त पुरवठा माननीय मंत्री अन्य अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्य अथवा मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय येथे अपील निर्णया कामी प्रकरण प्रलंबित आहे अशा स्वस्त धान्य दुकानासाठी पात्र पंचायत संस्था गट यांची केवळ निवड करून ठेवण्यात येईल.

सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर 2021 पर्यंत स्वस्त धान्य दुकानात करिता अर्ज मागवण्यात येत आहेत.

आपल्या तालुक्या मध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे सरकारकडून स्वस्त धान्य दुकानाची जाहिरात निघाली तर आपणास सुद्धा स्वस्त धान्य दुकान करता अर्ज करायचा असेल तर तहसील मध्ये जाऊन आपण खालील दिलेला फॉर्म सबमिट करू शकता. अर्जासोबत वरील दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment