Wangi Lagwad | वांग्याची लागवड कशी करायची?

चला तर शेतकरी मित्रांनो, आज आपण वांग्याची लागवड Wangi Lagwad कशी करायची, त्याचे पीक हे कशाप्रकारे भरघोस पद्धतीने घ्यायचे हे बघूया.

Wangi Lagwad | वांग्याची लागवड कशी करायची?

वांगी याची माहिती-

आपण दररोजच्या खाण्यामध्ये वांगी हा प्रकार वापरतो तर वांगी म्हणजे भाजीपाल्याचा एक प्रकार आहे . या पिकाची लागवड शेतकरी वर्षभर पूर्ण हंगामात सुद्धा घेऊ शकतो म्हणजे खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात सुद्धा या पिकाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.

कोणत्याही जमिनीमध्ये म्हणजेच कोरडवाहू शेतीमध्ये म्हणा किंवा मिश्र पिके यामध्ये म्हणून वांग्याची लागवड करता येते. आपल्या आहारात वांग्याची भाजी, वांग्याची भजी, आणि वांग्याची इतर पदार्थ सुद्धा आपण करून त्याचा खाण्यामध्ये उपयोग घेतो.

वांग्याचे फायदे
वांग्यामध्ये अ ब क ही खनिजे जीवनसत्त्वे तसेच लोह प्रथिने यांचे प्रमाण सुद्धा पुढच्या प्रमाणात आढळते महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाज 28, 113 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे तसेच बऱ्याच प्रमाणात पाण्याखाली शेती ही सुद्धा उपयोगात आणली जाते त्याच्यामध्ये पांढरी वांगी ही मधुमेहासाठी चालतात आणि त्या रोग्यांना गुणकारी सुद्धा असतात.

वांग्याच्या पिकासाठी लागणारे हवामान
वांग्याची पिके हे सरासरी 13 ते 21 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगल्या प्रकारे व भरघोस येते कोरडे आणि उष्ण हवामानाची आहे या हवामानामध्ये वांग्याची वाद आहे ती चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीची होते यासाठी ढगाळ हवामान व एक सारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही त्यामुळे त्याच्यावर कीड सुद्धा जास्त प्रमाणात येऊ शकते.
वांग्याची लागवड करताना थोडी काळजीपूर्वक करावी लागते योग्य वातावरण व तापमान बघून वांग्याची लागवड करणे ही आपल्याला उपयुक्त ठरेल.

वांग्याच्या पिकासाठी लागणारी उपयुक्त जमीन-

या पिकासाठी जमीन कशी हवी तर सर्व प्रकारची जमीन किंवा हलकी असो किंवा भारी असो जमिनीत वांग्याची पीक घेता येते .अशा प्रकारच्या जमिनीमध्ये वांग्याची पीक घेताना सुद्धा बऱ्याच काळजी घ्यावी लागते परंतु सुपीक व चांगला तर पाण्याचा निचरा होणारी मध्यम जमिनीमध्ये वांग्याचे झाड अतिशय चांगल्या प्रकारे सुद्धा वाढू शकते आणि जर काळी माती असली तर फारच चांगले.
त्यासाठी वांग्याच्या वाडीला जमिनीचा सामू असतो तो सहा ते सात असल्यास पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ती म्हणजे नदीकाठचा जर गारवड भाग असला तरी या भागाच्या जमिनीमध्ये वांग्याचे उत्पादन अतिशय चांगल्या प्रमाणे आणि भरघोस पद्धतीने येऊ शकते.

वांग्याची पिके घेण्याअगोदर घ्यावयाची दक्षता म्हणजेच काळजी ज्यावेळेस आपण वांग्याची लागवड करतो तर ती लागवड करण्याअगोदर सर्वप्रथम शेतामध्ये चांगल्या प्रकारे नांगरणी करून घेणे हे आवश्यक असते आणि ती जमीन अतिशय भुसभुशीत करणे सुद्धा महत्वाचे असते त्या कारणामुळे जमिनीतील ओलावा जमिनीतील उष्णताही समप्रमाणात येऊन वांग्याच्या रोपांना धोका पोहोचेल अशी गोष्ट होऊ देत नाही.

वांग्याची लागवड Wangi Lagwad करण्याआधी शेतीमध्ये योग्य प्रकारची शेणखत मिसळले शेणखत आणि बऱ्याच प्रमाणात चांगले असलेले तयार केलेले खत हे वापरणे सुद्धा योग्य ठरेल कारण जेवढ्या गाड्या खत आपण टाकू तेवढच वांग्याचे पीक सुद्धा योग्य येईल तर आपण दर दोन हेक्टरला 60 ते 100 गाड्यांमध्ये शेणखत जमिनीत पसरवू शकतो.

Read  हरभरा लागवड तंत्रज्ञान | Harbhara Lagwad

वांग्याची लागवड करण्याचा जो ऋतू असतो त्याची माहिती तसे पाहिले तर वांग्याची लागवड असते ते आपण तिनही ऋतुमध्ये करू शकतो आणि करतासुद्धा ह्यामध्ये बियांची पेरणी असते ते कोणत्या आठवड्यात करायची तर ज्यावेळी जूनचा दुसरा आठवडा सुरू होतो त्यावेळेस रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली तरी चालेल मात्र रब्बी किंवा हिवाळी हंगाम बियांचा पेरणीचा वेळ असतो

तो पेरणीचा वेळ सप्टेंबरच्या शेवटी शेवटी करायचा असतो आणि जी काही रोपे बसतात तयार झालेली ती तयार झालेली रोपे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याला लावतात मात्र उन्हाळी हंगामात जी बी आहे ते बी जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीमध्ये करतात यासाठी कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये रोपांची लागवड करताना बरेच काही वातावरणाचा सुद्धा परिणाम त्याच्यावर चांगल्या प्रकारे दिसून येतो.

वांग्याच्या जाती Wangi Lagwad
वांगी कोण कोणत्या जातीचे असतात व कोणती वांगे कशाप्रकारे चांगली उत्पन्न देतात, हे पाहुयात परंपरेपासून जी वांग्याची जात चालू आहे की जात आपण सर्वप्रथम बघुयात जांभळी वांगी, काळे वांगे, गुलाबी वांगी, हिरवी  वांगी, पांढरी वांगी आणखी काही जाती मध्ये सुद्धा वांकी आढळतात उषा अनमोल, राधा क्रांती, विजय, हायब्रीड कुसुमाकर, पर्पल राऊंड, पर्पल क्रिस्टल इत्यादी.

महाराष्ट्रात लागवडीस जास्त वापरण्यात येणारे जे वांग्याचे प्रकार आहेत ते म्हणजे खालील प्रमाणे—

जांभळ्या रंगाची, लांब वांगे, मांजरी गोटा वांगे, उसा क्रांती, जांभळे गोल वांगे, वैशाली वांगी, इत्यादी प्रकारची वांग्याची जात आहे ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे लावली जाते व त्याचे पीक सुद्धा अतिशय जोमाने येते. सुधारित जाती मध्ये आपण मांजरी, गोटा फुले, अर्जुन co2 व पिके एम वन, अशाप्रकारची वांगी सुद्धा बघायला मिळतात.

वांग्याची लागवड करण्याची अतिशय सोपी व चांगली पद्धत-
वांग्याच्या रोपांची लागवड केव्हाही करायची असेल तर त्याच्या तत्पूर्वी आपली जमीन चांगली नांगरलेली असावी तिची चांगली मशागत सुद्धा केलेली असावी आणि त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे म्हणजेच गाईचे म्हशीचे शेणखत मिसळावे म्हणजे जमिनीचा भाग असतो जमिनीचा कस असतो तो ह्या खताने अति उत्कृष्ट दर्जाचा होईल.

वांग्याची लागवड करताना आपण जी वाफे तयार करतो तेव्हा मधील जखऱ्या तयार करतो त्या योग्य प्रकार या असाव्या हलक्‍या जमिनीत 75 75 सेंटीमीटर सुद्धा असली तरी चालेल जास्त वाढणार्‍या किंवा चांगल्या जातीच्या साठी जीटीए असतं त्या वांग्याच्या रोपासाठी 90 बाय 90 सेंटिमीटर किंवा 80 80 सेंटीमीटर असे अंतर ठेवले तरी योग्य ठरेल.

जमीन जर काळी किंवा मध्यम वर्गाची कसदार असली तर कमी वाढणारे ज्या जातीची रोपे बसतात वांग्याची झाडे असतात त्यांना 90 75 सेंटीमीटर सुद्धा असले तरी चालेल व जास्त वाढणारी जात आहे तिच्यासाठी 100 80 किंवा 100 बाय 90, सेंटिमीटर अंतर ठेवलं तरी चालेल ह्यामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे सुद्धा येऊ शकतात.

Read  Moti Sheti | Pearl Farming | मोत्याची शेती करून मिळवा ३ लाख रुपये महिना

वांग्याच्या पिकासाठी खताचे योग्य नियोजन व त्याची व्यवस्थापन

असे म्हणतात तशी खान ची माती त्याचप्रमाणे ही सुद्धा गोष्ट अशीच झालेली आहे जमिनीच्या कसा प्रमाणे जर आपण खत वापरले तर त्या खताच्या मात्रा चा प्रमाण कमी-जास्त सुद्धा होऊ शकतो म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्यम जमिनीसाठी जे हे तरी खताचे प्रमाण आहे ते आपण कसं वापरायचं तर ते बघुयात 50 किलो पालाश व 50 किलो स्फुरद व दीडशे किलो नत्र ह्याप्रमाणे एका हेक्‍टरसाठी वापरावे संपूर्ण स्फुरद व पालाश आहे हे नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेले अर्धे नत्र असतं

ते लागवडीनंतर तीन समान आठवड्यामध्ये त्याचे हिस्से करायचे आणि ते विभागून त्यामध्ये लावून द्यायचे पहिला पहिला आठवडा जो असतो त्या आठवड्यामध्ये लागवडी झाल्यानंतर एक महिन्याच्या कालांतराने दुसरा आठवडा त्याच्या नंतर परत एक महिन्याच्या काळात राणी आणि तिसरा शेवटचा आठवडा असतो तो आठवडा त्याच्या लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात अंतराने द्यावा ही खताची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे म्हणजेच वांग्याचे पीक आहे ते पीक भरघोस येण्यासाठी चांगली मदत होईल.

पीक लागवडीनंतर घेण्यात येण्यासाठी जी सोय आहे ती सोय म्हणजे त्या पिकाची ‘अंतर मशागत’ होय. या पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे म्हणजे उत्पादन चांगले येण्यास मदत होईल मात्र त्याची काळजी कशी घ्यावी ते आपण अगोदर बघुयात.

पिकातील खुरणा झाल्यानंतर पिकांमधील घेतलं असतं ते काढून टाकावं आणि शेताच्या बाजूला फेकून द्यावा किंवा जाळून टाकलं तरी चालेल नंतर आपण जेव्हा लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची चांगल्या प्रकारे भर द्यावी प्रत्येक वेळी खुरपणी करणे व त्याची योग्य काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे जर आपण ती स्वच्छ ठेवले तर त्याची योग्य ती काळजी घेणे होईल.
पाणी देण्याची वेळ म्हणजे कशी द्यावी तर हा भाग जमिनीचा प्रकार असतो किंवा त्या जमिनीचे हवामान या गोष्टींवर अवलंबून असते खरपी हंगामात जो विकास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याची जी वेळ आहे की त्या हिशेबानुसार द्यावी.
या पिकाला उन्हाळ्यामध्ये तीन ते चार दिवसात पाणी द्यायचे असते जर हिवाळा असला तर त्याच्यामध्ये आपण दिवसांची वाट सुद्धा करू शकतो उदाहरणार्थ सात ते आठ दिवसानंतर सुद्धा आपण पाणी दिले तर योग्य राहील या पिकाला पाण्याचा जास्त केव्हा स्थान देऊ नये जास्त पाणी त्याला देऊ नये, कारण अति पाण्याच्या देण्यामुळे त्या पिकाच्या मुळा सडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

Read  जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

पिकाचे संरक्षण कशा प्रकारे करायचे
या पिकावर शक्यतोवर ढगाळ वातावरणाचा जास्त परिणाम होतो या पिकाचे संरक्षण आहे ते करण्यासाठी सर्वात अगोदर या पिकावर येणारी जी कीड आहे उदाहरणात कोळी झाला पांढरी माशी झाली तुडतुडे झाले करणारे किडे झाले शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळ्या असतात त्यात अळ्या झाल्या त्यांचा प्रादुर्भाव होतो

हे या पिकाचा नाश करतात म्हणून त्याच्यावर योग्य वेळी फवारणी करणे सुद्धा महत्वाचे आहे कारण या किडीमुळे पाणी पांढरे सुद्धा पडतात त्याच्यामुळे लाल कोळी सुद्धा एक रोग आहे तसेच पानावर जाळ सुद्धा तयार होतं ह्या गोष्टीमुळे झाडाची वाढ असतं की वाढ खुंटते शेंडे झाले फळे झाले यामध्ये कीड पडते आणि त्या फळांमधून अळी बाहेर निघते यासाठी कोवळे शेंडे हे ज्या वेळेस झाडाला येतात त्या वेळेस या झाडाची निगा राखणे हे सुद्धा गरजेचे आहे.

वांग्याचे उत्पादन कसे घ्यायचे म्हणजेच तोडणी कशी करायची-

वांग्यांना योग्य बाजाराची किंमत येईपर्यंत तो भाग तोडू नये म्हणजे त्याची तोडणी सुद्धा करू नये ज्या वेळेस फळी पूर्ण प्रकारे वाढतील ते चांगल्याप्रकारे होतील आणि या फळांना दर्जेदार असं आकार व वजन येईल त्याचवेळेस वांगी तोडावी.
सर्वप्रथम वांग्याची तोडणी करण्याअगोदर त्यामधील सडलेली फळे म्हणजेच जे काही फळ ठरलेले आहे त्याच्यावर कीड आहे ते अगोदर तोडून टाकावी म्हणजेच बाकीचे फळ आपल्या कामात येतील.
वांग्याची तोडणी केल्यानंतर फळाचा आकार व फळांचा रंग ह्याचा विभागणीचा भाग तयार करून तरच ती फळे विक्री द्यावी म्हणजे त्या फळांना योग्य तो भाव मिळेल.

वांगे Wangi Lagwad बाजारपेठेपर्यंत पोचायला बराच वेळ लागतो तो पर्यंत त्या वांग्या चा दर्जा व त्याची प्रत ही योग्य प्रकारे राहील त्याचा रंग त्याची चमक सुद्धा योग्य प्रकारे राहील याची काळजी घ्यावी म्हणजेच तुम्हाला हजार ते दीड हजार याप्रमाणे दर दोन क्विंटल मागे पैसे मिळू शकतात.
या फळांची तोडणी दर चार ते पाच दिवस आला योग्य अंतरावर ठेवावे. म्हणजेच ही वांग्याची तोडणी आपल्याला योग्य ती भरघोस उत्पन्न देऊ शकते व चांगल्या प्रकारे तिच्या तोडणीचे नियोजन सुद्धा लागू शकते.

शेतकरी मित्रांनो विशेष सूचना अशी की कोणतेही असो आणि लागवड कोणतीही असो त्याचा काहीतरी हेतू असतो हा हेतू म्हणजे त्या पिकाची योग्य सोय करणे त्या पिकाची योग्य लागवड करणे आणि त्या पिकाची योग्य काळजी सुद्धा घेणे हे महत्त्वाचे आहे ज्या वेळेस तुम्ही मन लावून ह्या तीन सूत्र गोष्टीला सक्षम कराल त्या वेळेस तुम्ही योग्य शेतकरी म्हणून निवडले जातात कारण कोणतेही पीक घेणे अगोदर त्या पिकाची माहिती व त्या जमिनीचा कस हा आपल्या लक्षात येणारा महत्त्वाचा असतो

धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझी Wangi Lagwad ही माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा

Leave a Comment