group

एका एकरात बटाट्याची लागवड करून मिळावा एकरी 4 ते 5 लाखाचे उत्पन्न

मित्रांनो या लेखांमध्ये आपण बटाटा लागवड विषयी सविस्तर माहिती बघूया.  या अगोदरच्आया लेखात आपण उसाची लागवड, व हरभरा लागवड  या विषयी सविस्पतर माहिती बघितली आहे. या लेखात आपण  एका एकरात बटाट्याचे  45 ते 50 रु खर्चून 4 लाखे ते 5 लाख उत्पन्न काढू शकतो.  उत्पन्नाची वाढ व फवारणी या विषयी सविस्तर माहीती बघूया.  बटाट्याचा वापर खाद्यपदार्थ शिवाय अनेक उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करतात,  त्यामुळे बटाट्याला आपण बघतो की वर्षभर बाजारामध्ये चांगली मागणी असते.  बटाटा लागवड मध्यम ते हलक्‍या जमिनीमध्ये करता येते.  जमीन कसदार व उत्तम निचरा होणारी असावी.  थंड हवामान बटाटा पिकासाठी सर्वात चांगले असते.

वेगवेगळ्या पिकांकरिता वेगवेगळे हावामान आवश्यक असते परंतु काही पिकांना गरम तर काही पिकांना थंड हवामान आवश्यक असते. बटाटा या पिकाकरीता थंड हवामान आवश्यक आहे. 18 ते 22 अंश सेल्सिअस मध्ये या तापमानामध्ये बटाट्याची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होते.  शेतकरी मित्रांनो बटाटा पिकाचे भरघोस उत्पन्न घेणारे कृषी तज्ञ आहेत चांगले शेतकरी आहे. त्यांच्याकडून आपण ही माहिती एकत्रित केलेली आहे.  तसेच बीएससी ऍग्री असणारे शेती तज्ञ यांच्याकडूनही आपण माहिती मिळवली आहे बटाट्याची लागवड ऑटोमॅटिक कशी केल्या जाते.

पूर्वमशागत मध्ये 30 ते 35 टन चांगल्या प्राकारे कुजलेले शेणखत टाकावे, कारण याने जामीन चांगली भुसभुशीत होऊन पिक चांगले येईल. पिकाला 90 ते 110 किलो नत्र, पालाश हेक्टरी 90 ते 100 किलो व व स्फुरद 85 किलो टाकणे आवश्यक आहे स्फुरद नत्र व पालाश लागवडी वेळी एकाच वेळेस वापरावे.राहिलेले अर्धे नत्र असेल ते लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी सरीत टाकून त्यावर मातीचा भर अवश्य द्यावा.

पाणी कसे द्यावे?

बटाटा लागवडीनंतर बटाट्याला हलके पाणी द्यावे लागते हे पाणी दिल्यानंतर नंतर चार किंवा सात दिवसांनी पाणी द्यावे पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की वरंबे दोन-तृतीयांश पाण्यामध्ये बुडतील आणि जमीन ही ऑर्सल राहील अशाप्रकारे पाणी देणे आवश्‍यक आहे 20 ते 30 दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ करून घ्यावे आणि राहिलेली खताची मात्रा आहे ते सुद्धा आपण बटाट्यांना देऊन टाकावी.

Read  Janani Suraksha Yojana 2023 | जननी सुरक्षा योजना 2023.

दुसऱ्यांदा मातीची भर अशी आहे ती शक्यतोवर 50 ते 60 दिवसांनी द्यावी बटाटा पिकास बटाटा या पिकास सहाशे ते सातशे मिलिमीटर पाण्याची आवश्यकता असते जी जात कमी कालावधीची आहे म्हणजेच 80 दिवसांत पर्यंत तिला कमी पाणी द्यावे लागते आणि जात 120 दिवसांची आहे त्या बटाट्याला जास्त पाणी द्यावे लागते बटाटा या पिकाला उपलब्धतेच्या 60 टक्के ओलावा जमिनीमध्ये जर असेल तर त्यावेळी पाणी दिले तरी चालेल बटाटा पिकाला आपण तुषार सिंचनाने सुद्धा पाणी देऊ शकतो.

बटाटा जातीची कुफ्री अशोका, कुफ्री ज्योती, कुफ्री जवाहर, कुफ्री चांद्रमुखी, कुफ्री लवकर, कुफ्री सिंधुरी अशा सुधारित जाती आहेत.

बियाणे शक्यतो 2.5 ते 4 सेंटिमीटर आकाराचे असावेत व वजनाने 25 ते 35 ग्रॅम वजनाचे असावे व प्रति हेक्‍टरी 25 ते 28 क्विंटल ते आपण वापरले तरी चालतील

बियाण्यांची प्रक्रिया करतेवेळी 1.5 कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून बियाणे बुडवून लागवड आपल्याला करायची आहे.

तसेच सरी वरम यामध्ये आपण करू शकतो काय जर ट्रॅक्टरला यंत्र लावून सरी-वरम  पद्धतीने बटाट्याची लागवड करतात तर काही शेतकरी बटाट्याची लागवड परंपरागत पद्धतीने करतात. आता आपण बघू की एक एकर बटाटा लागवड करायचा आहे आणि चांगले  उत्पन्न घ्यायचे  आहे तर त्यासाठी किती खर्च येईल, औषधी कोणती लागेल आणि त्याकरता मेहनत किती घ्यावी लागेल हे आपण बघूया.

आपल्याला बटाट्याची एकरभर लागवड करायची असेल तर 12 ते 13 कट्टी आपल्याला बियाण्याचे लागतात म्हणजेच सहा क्विंटल पर्यंत आपल्याला बियाणे लागेल जे हजार रुपयापासून पंधराशे रुपये पर्यंत भावाची असते महाबीज बियाणे तुम्हाला महा बियाण्याची आहे ते 2000 रुपये पर्यंत ही मिळू शकतो त्याचबरोबर आपल्याला बेसल डोस सुद्धा लागेल 20 :24 :23
18 :46 10:26 MOP त्यासोबत आपण जैविक खतांचा वापर सुद्धा करतो जेणेकरून आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल

Read  Land Old Kharedikhat kase Pahave 2022 | जमीन जुने खरेदीखत कसे पाहावे २०२२.

त्यामुळे बटाटा पिकांचा रजिस्टन्स पावर सुद्धा वाढेल एकंदरीत खताचा जर वापर आपण केला तर दहा हजार रुपये पर्यंत आपल्याला खर्च येऊ शकतो आणि जर आपण ट्रॅक्टरने लागवड केली पॅटर्न जर लागवड केली तर आपल्याला ट्रॅक्टरचा खर्च चार ते पाच हजार रुपये लागेल.

बटाट्याची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी काय करता येईल?

Fortunet, Purti feed याचे दोन स्प्रे घ्या यामुळे उत्पन्नात वाढ होऊन तुमचे पीक सुद्धा तजेलदार राहील.

बटाटा पिकावर येणारे प्रमुख रोग व त्याचे नियंत्रण कसे करता येईल?

बटाट्यावर येणाऱ्या किडे आपण सुरुवातीपासून जर योग्य काळजी घेतली तर बटाट्यावरील पीक किडीचे आपण नियंत्रण करू शकतो त्याकरता जैविक खत असतील रासायनिक खतातील सेंद्रिय खत असतील त्याचा आपण निश्चितच वापर येथे करावा लागणार आहे त्यानंतर आपण स्प्रे म्हणजेच फवारणी सुद्धा केलेली आहे जेणेकरून त्यामुळे किड नियंत्रणांमध्ये येईल.

करपा असेल किंवा किडीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचे असेल त्यावेळेस आपण जैविक औषधींचा वापर करायला पाहिजे बुरशी नाशके तसेच कीटकनाशक आपण वापरू शकतो आणि ज्यावेळी नियंत्रणामध्ये येणार नाहीये त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नाही ह्याकरता काळजी घेणे खूप जरुरी आहे त्यासाठी आपण केमिकल जास्त वापरनेही जरुरी आहे ज्यावेळेस आपण कोणतेही उत्पादन काढतो जसे की बटाट्याचे उत्पादन आहे हे काढते वेळेस आपण सेविकांनी शेंद्रिय या दोन्ही खतांचा आपण वापर योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये केला पाहिजे

ऐकूण येणारा खर्च

बियाणेआहे, खते आहेत, फवारणी आहे त्याचबरोबर ट्रॅक्टरचे वापरणे आहे अवजारे वापर आहे या सर्वांवर खर्च तर येणार परंतु कमीत कमी खर्चामध्ये आपण बटाट्याचे चांगले उत्पादन काढू शकतो तर एकूण खर्च आपल्याला बटाटा उत्पादन करता 45 ते 50 हजार रुपये लागेल हा सर्व एकूण खर्च आहे म्हणजे बटाटा लागवडीपासून तर काढणी पर्यंत हा एकूण खर्च आहे

उत्पन्न किती होईल?

आपल्याला वीस रुपये बाजारभावाप्रमाणे जर जर उत्पादन झालं तर आपल्याला तिथे चार ते साडेचार लाखापर्यंत उत्पादन होऊ शकते म्हणजे जिथे म्हणजे जिथे खर्च वजा जाता उत्पन्न आपल्याला मिळेल तीन ते साडेतीन लाख रुपये.

Read  Star Kisan Ghar Yojana Bank Of India 2022 | स्टार किसान घर योजना बँक ऑफ इंडिया २०२२.

चांगल्या उत्पादनाकरिता काय करता येईल?

मित्रांनो जर आपल्याला अधिक उत्पन्न पाहिजे असेल आणि पीक चांगलं असावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याकरता आपण वेळोवेळी फवारणी करणे खूप जरुरी आहे पाहिजे त्यावेळी खत देणं खूप जरुरी आहे.

किती दिवसात पीक तयार होते?

लागवडीनंतर साधारणतः तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये आपण बटाट्याचे पीक काढू शकतो तुम्हाला असं वाटत असेल की बाजारभाव चांगले आहे तर बटाटे आपण लवकर सुद्धा विकू शकतो बाजारभाव कमी असतील तर या बटाट्याचा पाला पूर्णपणे सोडून द्या आणि त्यानंतर त्याची काढणी करा आणि मगच बाजारामध्ये विक्रीला न्या कारण मुरल्यानंतर बटाटा हा परिपक्व होत असतो म्हणजे त्या बटाट्यामध्ये टिकण्याची क्षमता असते.

तर मित्रांनो कमी दिवसांमध्ये जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे म्हणजेच आपण बटाट्याची लागवड करून तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये साधारण दहा हे पीक आपल्याला पैसे देऊन जातो आणि खर्च मात्र 40 ते 50 हजार रुपये तर आपणही बटाट्याचे पीक काढा व एकरी चांगले उत्पन्न येते म्हणजेच चार ते साडेचार लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न होऊ शकतं. फक्त बटाटा पिकाला आपण सुरुवातीच्या काळामध्ये दोन महिने जपणे त्याची काळजी घेणे जरुरी आहे.

सेंद्रिय खतांचा जास्त वापर करून आणि गोमुत्राचा वापर करुन आपण पिक तजेलदार ठेऊ शकतो म्हणजेच पिकावर येणारा अटॅक कमी होवून जातो रोगराई कमी प्रमाणामध्ये येते आणि भरघोस उत्पादन देऊ शकते.

शेतकरी मित्रांनो आपल्याला अशीच शेतीविषयक चांगली माहिती वाचायची असेल तर आमच्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचाव्या. त्याकरिता आमच्या खालील काही निवडक पोस्ट जरूर वाचा व आपल्या शेतकरी मित्रांना जरूर पाठवा.

शेळीपालन करून मिळवा लाखो रुपये 

रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020 ते 2021 व 2022 ते 2023

द्राक्ष बागेतील फळे छाटणी व त्यानंतर करायचे व्यवस्थापन

group

Leave a Comment

x