ग्लॅडिओलस लागवड आणि व्यवस्थापन Gladiolus Plantation & Managements

नवनवीन प्रजातीच्या विविध रंगी ,सुगंधित आणि देखण्या फुलांची शहरी बाजारपेठेत मागणी खूप वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये सजावटीसाठी आणि गुच्छ व बुके तयार करण्यासाठी लांब दांड्याच्या फुलाला वर्षभर ही मागणी सुरूच असते कंदवर्गीय फुलांचा राजा समजल्या जाणाऱ्या ग्लॅडिओलस या फुलांच्या प्रजातीलाही बाजारपेठेत अत्यंत जोराची मागणी वाढत आहे.  म्हणूनच ग्लॅडिओलस लागवड आणि व्यवस्थापन Gladiolus Plantation & Managements पाहूयात.

भारतामध्ये या फुलाची लागवड साधारणतः 1832 साला मध्ये प्रथम करण्यात आली.  सध्या या फुलाकडे एक व्यापारी पीक म्हणून पाहिले जाते आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला कल फुलशेतीकडे वळवला आहे. फुल शेती अत्यंत कमी क्षेत्रफळात करता येत असल्याने उर्वरित क्षेत्रावर इतर पिके घेणे शेतकरी पसंत करतात त्यामुळे या नवीन प्रजातीला आता महत्त्व आले आहे ही शेती महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी घेत आहेत.

फुलशेतीला शेतकरी बारामाही पद्धतीने करू शकतात त्यामुळे आर्थिक उत्पन्न सतत चालू राहू शकते ही बाब लक्षात घेता शेतकरी आता ग्लॅडिओलस ही प्रजाती लावणे उत्तम समजत आहेत. विविध रंगांमध्ये आणि आकर्षक असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये सजावटीसाठी आणि बुके किंवा गुच्छ तयार करण्यासाठी या लांब दांड्याच्या फुलाला वर्षभर मागणी असते.* ग्लॅडिओलस फुल जातीची निवड कशी करावी –

जगभरात ग्लॅडिओलस च्या अनेक जाती आहेत.  यामध्ये नव्या जातींचे दरवर्षी भरही पडत आहे व्यापारी दृष्टिकोनातून या लागवडीसाठी जातींची निवड करणे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्तम प्रकारच्या जातीची निवड करताना फुलाचा रंग फुलांची संख्या फुलदांनड वरील एकूण फुलांची संख्या दांड्याची लांबी व रोग-किड नाशकाची प्रतिकारक्षमता किती आहे,  या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच शेतकरी कोणत्या भागातील आहे व तेथील हवामान कोणत्या स्वरूपाचे आहे,  याची माहिती असणे किंवा त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

ग्लॅडिओलस ची महाराष्ट्रात विविध जाती उपलब्ध आहेत त्यापैकी संसरे ,यलोस्टोन, ट्रॉफी कशी ,फुले गणेश , फुले नील रेखा, सुचित्रा, सुहागन ,सपना, हॅटिंग सॉंग या फुले जातींना विशेष मागणी आहे .* लागवडीसाठी ग्लॅडिओलस (Gladiolus)कंदाची निवड –

Read  Rashtriya Ann Sursksha Abhiyan 2022 | राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान 2022

ग्लॅडिओलस सेकंदाचे मध्यम लहान व मोठे असे तीन प्रकार पडतात.  यापैकी मोठ्या व मध्यम गटातील फुल दांड्याचे उत्पादन येते. ग्लॅडिओलस ची लागवड करताना त्यांना तीन महिने शीतगृहात पूर्ण विश्रांती देऊन नंतर कंदाची निवड करावी जर कंद सुकलेले असतील तर त्यांना लागवडीसाठी घेऊ नये.

ग्लॅडिओलस च्या लागवडीकरीता हेक्टरी 1.25 ते 1.50 लाख कंद लागतात लागवडीपूर्वी कंद यांना बुरशीनाशक प्रक्रिया करणे गरजेचे असते त्यासाठी कंद कॅप्टॉन या बुरशीनाशकाच्या 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या मिश्रणात 20 ते 25 मिनिटे बुडवून ठेवावेत. या प्रक्रियेमुळे ग्लॅडिओलस च्या कंदाची बुरशीनाशकाचा पासून सुरक्षा होऊन कंदाची कार्यक्षमता वाढते .

* ग्लॅडिओलस च्या कंदाची लागवड –

ग्लॅडिओलस च्या कंदाची लागवड करताना सरी, वरंबा अथवा गादीवाफ्यावर करतात कंदाच्या लागवडीसाठी दोन ओळीत 30 सेंटीमीटर व दोन दांडातील अंतर हे 15 ते 20 सेंटिमीटर ठेवावे पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने ग्लॅडिओलस कंदाची लागवड ही सरी किंवा वरंब्यावर केलेली अधिक फायदेशीर ठरते.  सरी वरंब्यावर लागवडीसाठी 45 बाय 15 सेंटिमीटर अंतर ठेवावे लागवड करताना मातीत 5 ते 7 सेंटीमीटर कंदाची लागवड करायला हवी. सरी-वरंबा याचा फायदा असा की पिकांमध्ये होणाऱ्या तनाला योग्यवेळी खुरपणी देता येते तसेच खत किंवा कीटकनाशकांची फवारणी करणे पिकामध्ये सोपे ठरते गादीवाफा मध्ये मात्र ही प्रक्रिया अडचणीची ठरते .

* ग्लॅडिओलस या कंदा करीता खत आणि पाण्याचे व्यवस्थापन –

ग्लॅडिओलस च्या उच्च प्रतीच्या चांगल्या आणि देखण्या फुलांच्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात रासायनिक आणि सेंद्रिय खताची मात्रा देणे आवश्‍यक ठरते त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 70 ते 100 टन शेणखत जमिनीच्या नांगरणी नंतर मातीत मिसळावेत व जेव्हा लागवडीचा काळ येईल अशा वेळी 200 किलो स्फुरद व 200 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे व 300 किलो नत्र द्यावे या 300 किलो नत्रा पैकी लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर ठीक 2,4 आणि 6अशा पानावर आल्यावर लागवडीनंतर सुमारे तीन ते पाच आठवड्यांनी उरलेले अर्धे नत्र समान मात्रेत विभागून द्यावे

Read  Khapli Gahu Pik गव्हाचे पीक लागवड

यामुळे खताची मात्रा समान योग्य राहून पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही. या पिकाला पाण्याची गरज असते लागवडीनंतर पिकाला नियमित परंतु योग्य प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी हे द्यावेच लागते जमिनीच्या मगदुरानुसार दोन पाळ्यांतील अंतर हे सात ते आठ दिवसाचे असायला हवे फुले काढल्यानंतर पुढे कंदाच्या वाढीसाठी एक ते दीड महिना पिकाला नियमित पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता असते पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पिक तनविरहीत ठेवावे. तसेच प्रत्येक गृहिणीच्या वेळी योग्य भर देत राहावे यामुळे फुलदांडे सरळ वाढण्यास मदत होऊन जमीन या अंतर्गत कंदाच्या वाढीसाठी व पोषणासाठी मदत होते.

* ग्लॅडिओलस च्या कंदाची काढणी व निगा –
ग्लॅडिओलस च्या कंदाची काढणी करताना कंदाला चार ते पाच पाने ठेवावीत फुलदाणी त्याची काढणी केल्यानंतर जमिनीत वाढणाऱ्या ग्लॅडिओलस त्या कंदाचे पोषण सुरू होते पुढे ते दीड ते दोन महिने सतत हे पोषण चालूच असते त्यामुळे फुलदांडे काढणीनंतर पिकाला नियमित पाणी द्यावे लागते व योग्य ती आंतरमशागत करावी लागते उघडे पडलेले कंद मातीने झाकून टाकावे यानंतर नैसर्गिक रित्या पाणे पडू लागल्यानंतर काढणीस तयार झाले असे समजावे पाणी पिवळी पडू लागल्यानंतर पिकास पाणी देण्याचे त्वरित बंद करावे पुढे जमीन वाक्यावर आल्यावर कंद काढावेत कंद काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे असते कंद काढताना धारदार अवजारे वापरू नयेत.

कांद काढणीनंतर लहान ,मोठे ,मध्यम अशा प्रकारात कंदाची विभागणी करावी व त्यानंतर कॅप्टॉन या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी तीन ग्रॅम कॅप्टॉन एक लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व पंधरा ते वीस मिनिटे द्रावणात बुडवून सुकवावेत अशी ही प्रक्रिया केलेले कंद चांगल्या कापडी पिशवीत पॅक करून लेबल लावून शीतगृहात सात ते आठ अंश सेंटिग्रेड तापमानात तीन महिने ठेवावेत.

या प्रक्रियेद्वारे केलेल्या कंदाची एकसारखी उगवण होऊन पुढे पिकाचे प्रमाण वाढते व हेक्टरी लागवडीपासून सुमारे एक ते दोन लाख लहान, मोठे ,व मध्यम कंद मिळतात कांदकाढणी वरच पुढचा बहार अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांनी कंद काढताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण त्यांना इजा होणे म्हणजे कंदाची वाढ न होता तो खराब होने यावर उपाय योजना केल्यास वाढ जोमाने होऊन झुपकेदार फुलांची लागण होऊन योग्य प्रकारे पीक घेता येते.

* फुलांची काढणी आणि उत्पादन –
फुल दांड्याची काढणी एकदा सुरू झाली की ते पुढे महिनाभर चालूच राहते फुलं दांड्यावरील पहिले फुल रंग दाखवून उमलू लागले की दांड्याची काढणी करतात. ही काढणी करताना 4,,5, पाणे ठेवून दांडा छाटावा त्याच्या लांबीनुसार रंगानुसार प्रतवारी करावी प्रतवारी केलेल्या बारा फुल दांड्या ची एक जुडी बांधून त्यांच्या भोवती वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बाजूच्या खोक्यात पंधरा ते वीस जोडी पॅक करुन दूरच्या बाजारपेठेत पाठवाव्यात अशाप्रकारे शेतकरी दीड ते दोन लाख फुले दाण्याचे उत्पादन एका हेक्‍टरमध्ये घेऊ शकतात.


* ग्लॅडिओलस वरील रोग व किडीचे व्यवस्थापन –
ग्लॅडिओलस हे पीक नाजूक आहे या पिकावर कंदकूज हा रोग व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.  कंदकूज हा बुरशीजन्य रोग असून खराब कंदाची लागवड केल्यामुळे हा होतो उपाययोजना म्हणून कंद पाठविण्यापूर्वी तीन ग्रॅम कॅप्टॉन एक लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावेत रोगट झाडे आढळल्यास ताबडतोब कॅप्टॉन द्रावणाची आळवणी करून फवारणी करावी.

Read  Ativrushti Nuksan Pik Vima Claim पावसाने झालेले नुकसान भरपाई कशी मिळणार?

ग्लॅडिओलस पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पटकन लक्षात येतो.  ह्या अळ्या पाने कुरतडून खातात किंवा पानांना भोके पाडतात कधीकधी ही कीड जमिनीलगत रोप करते त्यामुळे पूर्ण रोप नष्ट होण्याचे प्रमाण वाढते . या हानिकारक किडीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 20 किलो फोरेट जमिनीत मिसळावे तसेच किडीचा प्रादुर्भाव लक्षात येतात 2 मिली क्विनोल फास्ट एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ग्लॅडिओलस हे एक नाजूक ठीक आहे अतितप्त उन्हामुळे हे पीक खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पॉलिहाउस किंवा शेडनेट वापरून या पिकास संरक्षण देता येते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!