Bhendwal Ghat Mandani Bhavishyawani 2021 भेंडवळ घट मांडणी

सर्वांना ज्ञात असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे (Bhendwal Ghat Mandani Bhavishyawani 2021) निष्कर्ष जाहीर झालेत. या मांडणीतील भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा हाहाकार  वाढला आहे. त्यामुळे याहीवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ही प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आता या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत.

ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात,मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीये दिवशी हे भाकित सांगितलं जातं असतं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे.

Read  Soyabin Pik Vima Yojana 2022 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25% सोयाबीन पिक विमा

 महत्त्वाची भाकितं पुढीलप्रमाणे- Bhendwal Ghat Mandani Bhakit

देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून मात्र राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल असं भेंडवळच्या घट मांडणीत सांगण्यात आलं आहे.

देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित या घट मांडणीत व्यक्त करण्यात आलं आहे. शिवाय देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.

या भाकितानुसार यावर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात होणार असून, ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल. या भाकितामध्ये अशी देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.

Read  50,000 Anudan 3 List Maharashtra 2022 | 50,000 अनुदान ३ यादी महाराष्ट्र २०२२ .

शेतकऱ्यांसाठी संंमिश्र भाकित या घट मांडणीत करण्यात आलं आहे. यावर्षी कापूस ,ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. मात्र तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव राहणार नाही.

कोरोना सारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचं यावर्षभरात तरी शक्यता नाहीये.

सर्वात महत्वाचं म्हणजे या भाकिताकडे ज्या बाबतीत सर्वांचं लक्ष होत ते म्हणजे यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भेंडवळची घट मांडणीच भाकित जाहीर केलं आहे, यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्या प्रमाणावर आहे तर आर्थिक टंचाई सुद्धा भासेल.

कशी असते भेंडवळची घटमांडणी?

येत्या हंगामात पीकपरिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांबाबत इथं अंदाज व्यक्त करण्यात येतात.

Read  Tomato in Marathi 2021 टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

भेंडवळ इथं होणाऱ्या या घटमांडणी वर शेतकर्‍यांचा विशेष विश्वास आहे. हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात. मात्र गेली दोन वर्ष शेतकरी आणि इतर उत्सुकांना याठिकाणी जमता येत नाही आहे.

Leave a Comment