Tomato in Marathi 2021 टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

रोजच्या मानवी जीवनात टोमॅटोचे Tomato in Marathi 2021 स्थान असतेच भाजीपाला पिकांत टोमॅटो हे एक महत्त्वाचे पिक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात सुमारे 50 हजार हेक्‍टर क्षेत्रातून सुमारे 12 लाख टन उत्पादन मिळते. तसेच तुलना पाहता इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे हवामान हवामान खात्याचे व शेतीचे योग्य नियोजन असेल तर शेतकरी टोमॅटोचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात.

टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान Tomato in Marathi 2021

महाराष्ट्र राज्याचे हवामान या पिकास योग्य असून हवामान ,पाणी, आणि जमीन यांचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांना टोमॅटोचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येते व मानवी जिवनात रोजच्या आहारात टोमॅटो अंतर्भाव असतो. वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी टोमॅटो उपयोगात पडते टोमॅटोवर मोठे प्रकल्प प्रक्रिया उद्योग आज राज्यात आणि देशात सुरू आहेत

टोमॅटो साठी लागणारे हवामान लक्षात घेता कोरडे, स्वच्छ व कमी आद्रता असलेले व उष्णतामान चांगले असलेले हवामान मानवते व हहे पीक चांगले येते की कमी किंवा जास्त तापमान झाल्यास जेटोमॅटो पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन पिकास इजा होते आणि परिणाम त्या टोमॅटोच्या उत्पादनावर दिसून येतो. कमी आर्द्रता जास्त तापमान आणि कोरडे वारे वाहत असतील तर मात्र टोमॅटो पिकाची फूलगळ होऊ शकते. मात्र योग्य तापमान व खताचा योग्य वापर केला तर टोमॅटो फळाची गुणवत्ता सुधारता येते म्हणून सारखे प्रमाणात टोमॅटो ची लागवड करावी.

टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान Tomato in Marathi 2021

 टोमॅटो पिकासाठी लागणारी जमीन Tomato in Marathi 2021

टोमॅटो Tomato in Marathi 2021 बारीक काड्या जमिनीत किंवा साधारण जमिनीत चांगल्या प्रकारे येऊ शकते टोमॅटोचे पीक लवकर येते तर उत्तम जमीन मात्र फळांचा तोडा थोडा उशीरा येतो परंतु उत्पादन भरपूर होते शेतकऱ्यांनी शक्यतो जास्त पावसाच्या भागात हलकी ते मध्यम जमीन निवडावी आणि पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही याची शक्यतो काळजी घ्यावी जमिनीवर घर काढले तर फारच योग्य त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात थांबणार नाही क्षारयुक्त पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटून फुलगळ होण्याची शक्यता जास्त असते.

Read  एका एकरात बटाट्याची लागवड करून मिळावा एकरी 4 ते 5 लाखाचे उत्पन्न

 टोमॅटो पिकासाठी जमीन तयार करणे

टोमॅटो लागवड जमीन तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन आडवी उभी नांगरून घ्यावी ,रोपे लागवड करते वेळी वेळी दोन रोपातील अंतर हे 45 बाय 60 इतके ठेवावे योग्य आकारमानाचे गादीवाफे करुन रोपांची लागवड करावी तत्पूर्वी टोमॅटो लागवड करणाऱ्या जमिनीच्या भागात शेनखत किंवा जैविक खत वापरावे म्हणजे पिकाची उत्पादनक्षमता कधी वाढेल.

टोमॅटो पिकाच्या लागवडीच्या जाती 

लागवडीच्या जाती खालील प्रमाणे

 फुल राजा –

फुल राजाही टोमॅटो पिकाची उत्तम जात असून यामध्ये फळे नारंगी लाल रंगाचे असतात फुल राजा ही संकरित जात आहे फुलराजा या जातीवर लिपकल व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. फुलराजा या जातीचे उत्पादन क्षमता आहे 60 ते 55 टन प्रति हेक्‍टर एवढी आहे.

 राजश्री 

राजश्री फुल राजाप्रमाणे टोमॅटो ची दुसरी जात आहे ही जात संकरित जात असून फ्लीपकर्ड व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने या जातीवर पडतो मात्र या जातीचे उत्पादन हे फुराजा या वाणाच्या तुलनेत 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर मिळते.

धनश्री 

धनश्री या जातीचे फळ मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाचे असतात या जातीचे सरासरी उत्पादन हे सुद्धा 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर एवढे होते स्पॉटेड बिल्ट आणि लिपकल व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव यावर प्रामुख्याने दिसून येतो.

टोमॅटो पिकाची रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत 

महाराष्ट्रात साधारणत तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली जाते शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी योग्य निवड व योग्य प्रकारे लागवड करावी लागते टोमॅटो या पिकाच्या संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे ठरते तसेच शेतकऱ्यांनी रोपवाटिका बनवतांना ती जमीन चांगली निवडावी तिला दोन वेळा उभ्या व आडव्या प्रकारात नांगरणी करावे तसेच 1 बाय 3 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत.

गादी वाफ्यांमध्ये शक्यतो शेनखत टाकावे त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून रोपाला वाढण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात सेंद्रिय घटक मिळतात आणि बीज प्रक्रिया करत असताना कॅप्टन किंवा थायरम 3 ग्रॅम नाहीतर ट्रायकोडर्मा किंवा 19.19.19, 15 .15 .15 या खत चांगले मिसळावे त्यातच ऍसिटोबॅक्‍टर तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे त्याचा फायदा हा रोपे कोलमडणे कॉलर कूज ,मर या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी होतो. रोपवाटिकेत बनवतांना वेगवेगळ्या

रोगाचे व किडीचे नियंत्रण करतांना रोगाला रोपावर शिरू देऊ नये तसेच मातीमध्ये बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी आता रोपे थोडी मोठी झाल्यावर ती उत्तम शेतात पुनर्लागवड करावी मात्र हे करताना आदल्या दिवशी तयार झालेल्या रोपांना पाणी देणे आवश्यक आहे जेणेकरून रोपांची काढणी करताना मुलांचा बचाव होईल व रोपे काढणे सोपे जाईल.

 ट्रे पद्धत –ट्रे पद्धत ही रोपे तयार करणे हीसुद्धा रोपे बनवायची आधुनिक पद्धत आहे यासाठी चांगले आणि उत्तम दर्जाचे ट्रे वापरावे साधारणता एक ट्रे भरण्यासाठी दीड किलो कोकोपीट लागते. कोकोपीट ने भरलेल्या ट्रेमध्ये एका कारखान्यात एक बी याप्रमाणे बीज रोपण करावे या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे या पद्धतीत बियाणे वाया जात नाही तसेच प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी पुरेसे घटक मिळतात अलीकडे आता ही पद्धत जास्त वापरण्यात येते.

टोमॅटो पिकासाठी खताचे व्यवस्थापन 

 जैविक खताचा वापर – शेतकऱ्यांना वेळोवेळी माती परीक्षण करून त्यानुसार खतांच्या मात्रा मध्ये फेरबदल करावा. दोन किलो स्फुरद व दोन किलो ऍझोटोबॅक्‍टर हे जिवाणू दोन किलो पालाश बरोबर घेऊन हे सर्व एक टन शेणखतात मिसळून घ्यावे. व स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे राहिलेले निम्मे नत्र 15, 25, 40 ,55 दिवसांची विभागणी करून द्यावे. यानंतर सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर पाच ते सात दिवसांनी द्यावे.

रासायनिक खते 

मध्यम प्रकारच्या जमिनीत संकरित वाणांसाठी हेक्‍टरी 300 किलो ग्रॅम नत्र 150 किलो स्फुरद तसेच 150 किलो ग्रॅम पालाश आणि सरळ वाणासाठी 200 किलो नत्र व 100 तु जेव्हाळजपुरत 100 किलो पालाश द्यावे. याशिवाय संकरित वाणांसाठी हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट 25 किलो मॅग्नेशिअम सल्फेट व पाच किलो बोरॅक्‍स आणि 25 किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. तसेच रोपांची परिस्थिती पाहता प्रमाणबद्ध खताचा वापर करावा.

सेंद्रिय खते 

या पिकासाठी प्रति हेक्‍टरी 25 टन शेणखत 200 किलो निंबोळी अर्क किंवा निंबोळी पेंड टाकावा.

टोमॅटो पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन 

या पिकाच्या साठी जमिनीचा स्तर व हवामान या दोन्ही गोष्टी मुख्यत्वेकरून विचारात घ्यावे लागतात जमिनीचा स्तर उत्तम नसेल तर पाण्याचे प्रमाण जास्त द्यावे लागते व जमिनीत जास्त चांगला असेल तर थोडे पाणी कमी द्यावे लागते.

पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची जास्त वाढ होते म्हणूनच फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे 65 ते 70 दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे ठिबक सिंचनातून पाणी द्यायचे असल्यास पिकाला लागणारं दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करूनच तेवढेच पाणी द्यावे.

जेव्हा फुले लागण्याचा काळ येतो तेव्हा झाडावर ताण पडल्यास फुले व फळे खा गळणे फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात आणि सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवे डाचा पुरवठा होऊ शकत नाही झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट होते अशा वेळी पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर पाणी द्यावे हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यायला पाहिजे उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी दिले तरी चालेल.

टोमॅटो पिकावरील पिकांमधील ताणाचे व्यवस्थापन 

टोमॅटो Tomato in Marathi 2021 पिकाला जास्त पाणी लागत असल्यामुळे डाटोमॅटोचे पिकात तनाचे प्रमाण जास्त होणे हे सहाजिकच आहे. अशावेळी टोमॅटोच्या पिकात तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास लागवडीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर दोन लिटर प्रति हेक्‍टर किंवा दोन लिटर प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापरावे टोमॅटोच्या लागवडीनंतर आवश्‍यकतेनुसार खुरपणी करुन पीक तणविरहित ठेवावे.

टोमॅटोचे पिकास मातीचा भर देणे –

टोमॅटो पिकाच्या लागवडी नंतर शेतकऱ्यांनी 30 ते 45 दिवसांनी झाडांना मातीची भर द्यावी यासाठी झाडाच्या बाजूला माती लावावी. असे केलास झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मूळे फुटण्यास मदत होते व मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते मातीची भर देताना झाड मातीमध्ये कोलमडून जाणार नाही याची शेतकऱ्यांची काळजी घ्यावी.

 टोमॅटोच्या झाडांना आधार देणे 

टोमॅटोच्या झाडांच्या लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी झाडाच्या वाढ जोरदारपणे होते फांद्या फुटतात त्याकरिता त्यांना बांबू सुतळी व तार्‍यां तोनी आधार द्यायला पाहिजे सहा ते नऊ फूट उंचीचे लाकडी बांबू जमीन रोवुन ठेवावेवे.जमिनीपासून एक मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तारे घट्ट बांधून घ्यावी जेणेकरून त्यामध्ये बांबूचा आधार दिला जाईल.

झाडावरील टोमॅटो तोडण्याची प्रक्रिया 

शेतकऱ्यांनी टोमॅटो Tomato in Marathi 2021 तोडताना सर्वप्रथम ती पिकलली व लाल रंगाची आहेत तीच टोमॅटो तोडावीत. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते पुढे बाजारपेठेसाठी पाठवायचे असतील तर पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावेत अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात गुलाबी लाल झालेली फळे मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी तर पूर्ण लाल झालेली पडे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवले तरी चालतात.

मात्र तोडणी करण्याच्या अगोदर दोन ते दिवस त्याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी करू नये. टोमॅटो ही अतिशय नाजूक पीक असल्यामुळे त्याची तोडणी शक्यतो कॅरेटचा वापर करूनच करावी. अशाप्रकारे शेतकरी टोमॅटोचे पेरणी व्यवस्थापन तोडणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करून टोमॅटोचे उत्पादन अधिकाधिक प्रमाणात घेऊ शकतात.

Share on:

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment

x