मित्रांनो या वर्षी हातातोंडाशी आलेला पिकासा घास अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांपासून दूरच राहिला. पावसामुळे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचे झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पीक पूर्णपणे मातीमध्ये मिसळले. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना गरज आहे ती मोठ्या धीरची आणि मदतीची. तर मित्रांनो ही मदत आता शेतकऱ्यांना कशी मिळेल? हेच आपण या लेखामध्ये बघूया.
कृषिमंत्र्यांनी सांगितले की नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, त्या शेतकऱ्यांकरता विमा कंपन्यांचे पावतीवर नंबर आहेत, त्या नंबरवर शेतकऱ्यांनी कॉल करावा असेही सांगितले जात आहे, आणि आपल्या पीक नुकसानीच्या भरपाईचा दावा करा अशी सांगितल्या जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांमध्ये उभे राहून फोटो काढायला सांगितले जात आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही बघा शेतकऱ्यांनी काय करायचं, या शेतकऱ्याला असेच वाऱ्यावर सोडले जाणार का या शेतकऱ्यां करता कुणी वाली नाही का? हा पण प्रश्न पडतो. मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्र मध्ये बहुतांश भागात अशाच प्रकारची पावसाळी परिस्थिती होती आणि खूप सार्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान सुद्धा झाले होते.
2020 मध्ये पाच ते दहा टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळाली होती. आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचा रोष हा विमा कंपन्यांच्या विरुद्ध होता. पिक विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला. पिक विमा कंपन्या विमा देत नाहीत. असं विमा कंपन्यांच्या विरुद्ध वातावरण मागच्या वर्षी होतं. आणि यामुळे बरेच शेतकरी 2021 मध्ये विमा काढण्यापासून दूर राहिले. शेतकऱ्यांना असे वाटणे हे सहाजिकच आहे. कारण नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्या जर पिक विमा देत नसतील तर, विमा काढून काय फायदा असेही शेतकऱ्यांना वाटले.
आता 2021 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही. फक्त महाराष्ट्रातील 50 टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे मग राहिलेल्या 50 टक्के शेतकऱ्यांनी काय करायचं? पिक विमा शेतकऱ्यांनी भरला असेल तर त्यांचे पंचनामे होतील परंतु ज्यांच्या शेतामधून पूर गेला आहे किंवा अतिवृष्टीमुळे त्यांचं पीकच वाया गेला आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? तर महसूल च्या माध्यमातून तलाठी, कृषी सहाय्यक असतील यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकाची पाहणी करणे गरजेचे आहे.
या शेतकऱ्यांची सुद्धा पिकांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. कृषिमंत्र्यांनी काल सांगितले आहे की, अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. आता हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे जातील, जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश देतील, आणि तहसीलदार कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवकास आदेश देतील. आणि ज्या वेळी पिकांची पाहणी होईल किंवा पंचनामे होतील त्यावेळी पूर ओसरला असेल किंवा शेतांमधून पाणी निघून गेलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय दिसणार?
पन्नास हजार प्रोतसाहान ची दुसरी यादी पहा येथे
म्हणूनच आपला पीक विमा काढला नसेल आणि आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर आपण तर ताबडतोब आपल्या कृषी सहाय्यक किंवा तलाठ्याची संपर्क साधा आणि त्यांना आपल्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करायला लावा. आपल्या पिकाचे फोटो काढा आणि तहसीलदारां समोर सादर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच पुढे शासनाकडून याबाबतीत काही मदत जर आली तर, आपल्याला ती मिळू शकेल. कारण बऱ्याच वेळा कृषी सहायकांच्या माध्यमातून आणि तलाठ्यांचे माध्यमातून जे पंचनामे होतात, त्यांना नंतर आर्थिक मदत मिळते. परंतु जर आपले पंचनामे झालेच नसतील तर, आपल्याला नंतर येणारी मदत मिळणार नाही.
नुकसानभरपाई मिळेलच परंतु त्यास थोडा उशीरही लागू शकतो. म्हणून आपल्या पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे होणे खूप गरजेचे आहे. नुकसान भरपाई कमी मिळेल का जास्त मिळेल हे सांगता येत नाही. मदत ही राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून कोणाकडूनही मिळू शकते. केंद्राचे पथक आले तर, पीक नुकसानीची पाहणी होणारच आहे. कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे की तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत. आता कृषिमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी किती प्रमाणात होते हे पाहणे देखील आवश्यक आहे.
म्हणून आपण ताबडतोब कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे ताबडतोब संपर्क साधणे गरजेचे आहे. तरच आपण पात्र असु. कुलजर पंचनामे करण्याकरता पैशाची मागणी करत असेल तर वरच्या पातळीवर त्या व्यक्तीची तक्रार करणेही गरजेचे आहे. करण शेतकरी आधीच पूर्णपणे हवालदिल झालेला आहे.