जमीन खरेदी विक्री नियम

जमीन खरेदी विक्री नियम जमीन खरेदी केली असेल तर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही कसे स्वतःचा बचाव कराल. बऱ्याचदा आपण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बद्दल फसवणूक झाल्याचे पाहिले आहे. तुम्ही नवीन जमीन खरेदी केली असेल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. त्या तुम्ही केल्या आहेत का? केल्या नसतील तर खालील माहिती वाचा.

जमीन खरेदी विक्री नियम

काही गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो कायद्याच्या बाबतीत किंवा इतर कागदपत्रांचे बाबतीत आपण जागृत नसतो किंवा आवश्यकता दाखवत नाही. याचं कारण असं आहे की जमीन खरेदी करणाऱ्याला व विक्री करणाऱ्याला दोघांनाही जमीन घेण्यात देण्याबाबत घाई असल्यामुळे पाहिजे ती काळजी घेणे शक्य होत नाही.

परंतु ही काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर ही काळजी आपण वेळीच घेतली नाही तर भविष्यात नंतर वादाचे मुद्दे तयार होतात. त्यामुळे अगोदर आपण कायदा जाणून घेतला पाहिजे आणि आपले सर्व कागदपत्र आपल्या जवळ सांभाळून ठेवायला पाहिजेत.

Read  सातबारा दुरुस्त कसा करायचा? Satbara Kasa Durust karayacha? सातबारा उतारा 2020-21

आपलं रेकॉर्ड आपल्याजवळ असेल किंवा आपले जे काही कागदपत्र असतील, ते सर्व आपल्या बाजूने असले पाहिजे, तरच तुम्ही त्या जमिनीवर ताबा मिळवू शकता. तुम्ही जर नवीन जमीन खरेदी केली असेल किंवा जमीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

त्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे उपनिबंधकाकडून दोन प्रती मिळवायचे आहेत. त्यातील पहिली प्रत म्हणजे ‘खरेदीची मूळ प्रत’ आणि दुसरी म्हणजे ‘सूची 2’ त्याला index 2असे देखील म्हणतात. अशी दोन कागदपत्र तुम्हाला उपनिबंधकाकडून मिळवायचे आहेत.

सूची दोन हे प्रथम तुम्हाला मिळवायचे आहे. त्यासोबतच तुम्ही तुमच्या जमिनीवर ताबा सुद्धा मिळवू शकता. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्याला करणे गरजेचे आहे. ते म्हणजे सूची 2 निबंधकाकडून आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपण जे काही मुळ खरेदीची प्रत असेल (index2) असेल, हे नंतर आपल्याला तलाठी ऑफिसला किंवा तलाठी ऑफिस नसेल तर सर्वे सिटी ऑफिसमध्ये भेट देऊन सूची 2 ची म्हणजेच index2 ची झेरॉक्स आपल्याला द्यायची आहे.

Read  Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

त्यानंतर फेरफार नोंदीचा अर्ज आपला तलाठी ऑफिसला द्यावा लागणार आहे. तलाठी ऑफिसला फेरफारचा अर्ज दिल्यानंतर आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फेरफाराची नोटीस वर किंवा त्या अर्जावर सह्या घेणे. फेरफाराची नोटीसवर जमीन विकणारा आणि घेणारा हे दोघांच्याही सह्या आवश्यक असतात. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.

त्यानंतर सातबाऱ्यामध्ये देखील तशाच प्रकारे उतरले आहे का? हे पण पाहणे गरजेचे आहे. सर्वात पहिले म्हणजे खरेदीची मूळ प्रत त्याच्यानंतर सूची 2 म्हणजेच index2 आपल्याला मिळणे गरजेचे आहे. index2 ला घेऊन जायचं आहे. तलाठी ऑफिसला त्यानंतर फेरफार नोंद घेणे गरजेचे आहे.

त्यासाठी सूची 2 ची झेरॉक्स तिथं देणे गरजेचे आहे आणि त्यानंतर फेरफार नोटीसवर दोघांच्याही म्हणजेच खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोघांचीही सह्या असणे गरजेचे आहे. फेरफार जशी आहे, तशाच प्रकारे सातबारा उतरतो का? हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे.

Read  Satbara Land Information in Marathi | तुमच्या ताब्यात असलेली जमीन आणि 7/12 वरची जमीन सारखी आहे पहा मोबाईलवर

शेतकऱ्यांनो हे तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे परंतु बरेच शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. हे कायद्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे आहे, शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी जमीन खरेदी विक्री नियम महत्त्वाचे आहे. त्यामुळे वावर आहे तर पावर आहे अशाप्रकारे प्रयत्न करत रहा. जागृत राहा.

Leave a Comment