सोयाबीनची वाटचाल 5000 रुपायांकडे

शेतकरी मित्रांनो सोयाबीन 5000 रुपायांकडे वाटचाल करत आहे. खाद्यतेलाला असलेली मागणी, उच्चांकी दर, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हणजेच सी बोट आणि देशांतर्गत कमी आवक तसेच चीनची आक्रमक खरेदी, यामुळे सोयाबीनच्या किंमतीमध्ये तेजी आहे.

ड्रॅगन म्हणजे चिनने ऑक्टोबर महिन्यात 8.7 दशलक्ष टन सोयाबीनची आयात केली होती. जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 80 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये सोयाबीनची आणखी 300 रुपयांनी किंमत वाढेल यात शंका नाही आणि यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये सोयाबीन 4900 रुपयांचा पल्ला तरी गाठेल असा अंदाज बाजारामध्ये जे तज्ञ बसलेले आहेत यांनी वर्तविला आहे.

मील धारकांनी व खाजगी व्यापार्‍यांनी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट आहे असे सांगितले. त्याचबरोबर यंदाच्या सोयाबीनचा पावसामुळे दर्जा सुद्धा चांगला नाही त्यामुळे सोयाबीनची गुणवत्ता ही कमी आहे.

Read  30 कापूस खरेदी केंद्रे निश्चित, पणन महासंघाचा निर्णय

वाशिम च्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या शनिवार ला चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला या हंगामातील व राज्यातील विक्रमी म्हणजे 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आपल्या शेजारील मध्य प्रदेशामध्ये 4200 ते 4300 या दरम्यान चा भाव मिळालेला आहे. अशातच खाद्यतेल दरांमध्ये वाढ झाल्याने त्याचा लाभ सोयाबीनलाच मिळत आहे. सोयामिल आणि पोल्ट्री उद्योग यामध्ये सध्या मागणी वाढत आहे.

इंडोनेशियाचे बायोडिझेल साठी पामतेल वापरतात, ते राखून ठेवल्याने ही सोयाबीनच्या तेलाला मागणी वाढत आहे. त्यातच ड्रॅगनची आक्रमक खरेदी सुद्धा सुरु आहेच.

दिनेश सोमानी जे शेतमाल बाजार विश्लेषक आहे त्यांनी सांगितले की दरवर्षी दिवाळीपर्यंत बाजारांमध्ये साधारणतः 10 ते 12 लाख बॅग प्रति दिवस सोयाबीनची आवक असते, ती सध्या केवळ फक्त सात ते आठ लाख बैग आहे. दिवाळीपूर्वी शेतकरी आपली जशी गरज आहे तशा प्रकारे सोयाबीन विक्री करत असतात.

Read  Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

मात्र दिवाळीनंतर हे सोयाबीन शेतकरी विकत नाहीत सोयाबीनची चांगली किंमत असेल तरच विकतात त्यामुळेसुद्धा बाजारांमध्ये सोयाबीनची आवक कमी आहे.
सोयाबीनच्या दरात तेजी आल्यामुळे वायदे बाजारही तेजी मध्ये आलेला दिसतो. 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवारला एनसीडीईएक्स वर सोयाबीनचे डिसेंबर चे करार आहे ते 4377 रुपये प्रतिक्विंटल ने झाले.

आता आपण बघून सोयाबीन मधील तेजिची कारण काय आहेत-

1) सी बोट वर सोयाबीन अनेक वर्षाच्या उचांकी पातळीवर गेले.
2) चीनने सोयाबीनची आक्रमक खरेदी सुरू ठेवलेली आहे.
3) वायदे बाजारात ही सोयाबीनच्या कराराची दर वाढलेले दिसतात.
4) जगातील इतर देशांचा ही शेती मालाचा साठा करण्याकडे कल आहे.
5) दिवाळीनंतर शेतकरी माल विकत नसल्याचा अनुभव.
6) गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बाजारात निम्मे सोयाबीन आवक आहे.

Read  CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

तर अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची वाटचाल 5000 रु दराकडे होत आहे. आनंदाची गोष्ट आहे.

हे लेख आपण वाचले आहेत का?

Leave a Comment