1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

मित्रांनो जमिनीसंबंधीची आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा त्या जमिनीचा इतिहास बघतो आणि मगच जो करायचा असेल तो व्यवहार आपण करतो म्हणजेच आपण ती जमीन कोणाची होती आता कुणाची आहे यासंबंधीचे पुरावे आपण बघत असतो.

चला तर मग ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हीच माहिती किंवा जमिनीचा इतिहास किंवा पुरावा आपण सातबारा, फेरफार, खाते उतारा 1880 पासून कसा शोधू शकतो.

आता हे खाते उतारे, सातबारा किंवा फेरफार आपण मूळ स्वरूपात असेल तसेच भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये 1880 पासून उपलब्ध आहेत. तेही आपल्या सोयीकरता.

सरकारने आता ही माहिती ऑनलाइन देण्याची सुरुवात इ-अभिलेख कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळजवळ तीस कोटी जुने अभिलेख आपल्या करता उपलब्ध करून देणार आहे.

ही माहिती आपण ऑनलाईन कशी बघू शकता तेही मोबाईल द्वारे, लॅपटॉप किंवा पीसी द्वारे आपल्याला कसे बघता येतील हे या लेखात बघणार आहोत.हे बघण्याकरता आपल्याला एक वेबसाईट Google वर सर्च करावी लागेल.

aapleabhilekh.mahabhumi.gov.in अशा नावाने.

 

 

वेबसाइट ओपन झाल्यानंतर e-Records (Archived Documents) पहिल्या पेजवर तुम्हाला असं लिहिलेला दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल तुम्हाला तुमची भाषा निवडण्यासाठी तिथे पर्याय दिसेल भाषा निवडून झाल्यावर आपल्याला लॉगिन करता येईल

Read  Cash Limit At Home 2023 | घरामध्ये किती रक्कम ठेऊ शकतो २०२३ .

जर या अगोदर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला तिथे नोंदणी करावी लागेल.  प्रथम आपल्याला वापर करता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचा आहे.  त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे जसे की आपले नाव, बाबाचे नाव आणि आडनाव.

त्यानंतर त्याखाली अंडर नेशनालिटी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय निवडायचा आहे. जसे की business/ service/ others जो तुमचा व्यवसाय असेल तो निवडून घ्या.

त्यानंतर तुमचा मेल आयडी, जन्मदिनांक लिहायचा आहे आणि शेवटी तुमचा पूर्ण पत्ता लिहावा लागेल,  ज्याही खाण्यामध्ये चांदणी दिसतील तो रकाना न सोडता आपणास पूर्ण भरावा लागेल.  पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्य आपोआप येईल अशाप्रकारे ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर, लोगिन-आयडी तयार करावा लागेल.

तुमचा लॉगिन आयडी तपासा, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे.  स्वतःचा एक पासवर्ड  बनवून घ्या.  तुमच्या आठवणीत राहील असा, त्यानंतर तीन ते चार प्रश्नाची आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत.

त्याचे प्रश्न सोपे आहेत त्या प्रश्नांपैकी एकाचे उत्तर द्या आणि ते लक्षात सुद्धा ठेवा,  म्हणजे तुमचा पासवर्ड तुम्ही विसरलात, तर तुम्हाला तो प्रश्न तिथे विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल.  तरच तुम्ही पुढील वेळेस लॉगिन करू शकाल.

Read  Talathi तलाठी दप्तर होणार ऑनलाईन 2021

त्यानंतर बाजूला दिसणारा Captcha तुम्हाला तिथे टाकायचा आहे. जे आकडे तिथे तुम्हाला दिसतात ते तिथे टाका आता Submit बटन वर क्लीक करा.

हे झाल्यानंतर तुमच्यासमोर वापर करता नोंदणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल.  त्यानंतर लॉगिन यावर क्लिक करा, यानंतर तुम्ही जो यूजर आयडी बनवला होता तो युजर आयडी आणि पासवर्ड तिथे टाका.

यामध्ये आपण आता सातबारा फेरफार खाते उतारा पाहू शकता. सुरुवातीला आपण खाते उतारा कसा पाहता येईल हे पाहूया.  सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.

हा कार्यक्रम सध्या फक्त सात जिल्ह्यांसाठी आहे.  नंतर सर्व जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

नंतर आपला तालुका गाव आणि अभिलेखा चा प्रकार निवडायचा आहे. आपण जर फेरफार उतारा निवडला असेल तर गट क्रमांक टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचा आहे.

58 अभिलेख प्रकार यामध्ये देण्यात आलेले आहे पैकी तुम्हाला जो अभिलेख पाहिजे असेल त्यावर क्लिक केले की,  तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित खाते उतारा तुम्हाला दिसेल. फेरफार क्रमांक वर्ष दिलेला असतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि संबंधित खाते उतारा तुमच्यासमोर ओपन होईल.  कार्ट मध्ये ठेवा असा पर्याय  तिथे येईल. त्यावर क्लिक केलं तुमच्यासमोर खाते उतारा ओपन होईल.

Read  Satbara Utara Online Maharashtra | सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र वरील चूक दुरुस्त कशी करायची?

तुम्हाला हा खाते उतारा डाऊनलोड करता येतो.  डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर खाते उतारा दिसायला लागेल.  या जमिनीच्या उताऱ्यामध्ये अधिकार अभिलेख मध्ये काय बदल झाले कधी झाले याची माहिती तुम्हाला दिसेल.  त्याचप्रमाणे तुम्ही जर सातबारा हे ऑप्शन निवडले.

तर सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. अशाप्रकारे मित्रांनो अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण 1880 पासून खाते उतारे, सातबारा आणि फेरफार ऑनलाइन बघू शकता.  डाऊनलोड करू शकता आणि त्याची कॉपी आपल्या जवळही ठेवू शकता.

हा लेख तुम्हाला आवडला असेल जरूर इतरांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून अशा गरजू व्यक्तींना ही माहिती जरूर पाठवा

आपण हे वाचलेत का?

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

बांधकाम परवानगी बाबत ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

 

 

Leave a Comment