ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ अ तसेच सातबारा उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, आता शासनाने संपूर्ण तलाठी Talathi दप्तर ऑनलाईन करण्याचा अभिनव प्रयोग हाती घेतलेला दिसतो. याअंतर्गत तलाठ्याकडे येणाऱ्या सर्व येथे एकवीस नमुन्यांची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार असून हा प्रयोग आता केला जाणार आहे. नेट लोकांशी संपर्क असलेला घटक आणि महसूल विभागाचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
Talathi तलाठी दप्तर होणार ऑनलाईन
त्यासाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण एकवीस नमुन्यांची माहिती ठेवण्यात आलेली असते. या मध्ये गाव नमुना क्रमांक 1 ते 21 असतात त्यापैकी आता आठव फेरफार आणि सातबारा उतारे यांचा संबंध हा नागरिकांची येत असतो सातबाराचा संबंध जमिनीच्या मालकी हक्काबाबत चा असतो तर 12 नंबरचा उतार पिकांस संबंधित असतो.
गट क्रमांक गावाचे नाव कब्जेदार, आईचे नाव, उपविभाग क्रमांक, खाते क्रमांक, लागवड क्षेत्रफळ, हक्क इत्यादी तपशील त्यावर देण्यात आलेला असतो.
तसेच नमुना 12 मध्ये पिकाखालील क्षेत्र फळाची माहिती दिलेली असते आणि आठव्या उताऱ्यामध्ये एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गटाची माहिती असते. जेव्हा जमिनीची खरेदी विक्री होते त्याप्रमाणे फेरफार उतारा मध्ये नोंदणी केल्या जात असतात. ही सर्व माहिती आजवर हाताने म्हणजेच हस्तलिखित असल्याने, त्यामध्ये असंख्य मानवी चुका सुद्धा होत होत्या.
साधी नोंद करायची असली तर, लोकांना तलाठी ऑफिस मध्ये जावे लागत असे. यासाठी अनेक वेळा आपण बघतो की शंभर रुपयाचे काम दोनशे रुपये मध्ये जायचे. आता तलाठी दप्तर ऑनलाईन झाल्यानंतर अनेक लहान-मोठी कामे ची आहे ते आपण घरबसल्या सहज शक्य करू शकतो. तलाठी दप्तर ऑनलाईन करणे म्हणजे मोठे काम आहे.
सध्या ऑनलाईन ई-फेरफार, सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. आणि त्यामुळेच आता पुढचे पाऊल म्हणजे संपूर्ण तलाठी कार्यालयात ऑनलाइन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यामुळे लोकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि तलाठ्यांची कामे सुद्धा सोपी होणार आहेत.