2 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून 193 कोटी वसूल करणार PM Kisan Yojana

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील २८ जिल्ह्यांत २ लाख ५१ हजार ९८२ शेतकरी राज्यभरात केलेल्या पाहणीत अपात्र आढळून आले.

PM Kisan Yojana च्या अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली असून अशा शेतकऱ्यांकडून १९३ कोटी ६६ लाख रूपये वसूल केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जमीन नावावर नसलेले व फार मोठा पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे ‘लोकमत’च्या रिपोर्टमध्ये आढळले आहे.

महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ७९ हजार ९८ अपात्र लाभार्थी आढळून आले, अशांकडून ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. जिल्हेवार बघता बीड जिल्ह्यात सर्वात जास्त ३१ हजार अपात्र लाभार्थी आढळले. पश्चिम महाराष्ट्रात ७९ हजार,विदर्भात ५२ हजार, तर उत्तर महाराष्ट्रात ३९ हजार अपात्र लाभार्थी आढळले आहेत.

काय होते पी एम किसान योजनेचे निकष :

ज्यांचे दोन हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे अशा शेतकरी कुटुंबास प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये असा लाभ मिळतो. राज्यात डिसेंबर २०१८-फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. दर चार महिन्याला हे पैसे खात्यात जमा होतात.

Read  पी एम किसान योजनेत 6 मोठे बदल, सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार.

वसुली तर होणारच परंतु फौजदारी गुन्हाही लागेल :

शेतकऱ्यांने अर्जात चुकीची माहिती दिली असल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहीन, असे संबंधित शेतकऱ्याकडून लिहून घेतलेले आहे. म्हणजेच त्यामुळे रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.

महा ई-सेवा केंद्रांवर कारवाईस सुरुवात :

योजनेचा फॉर्म भरणारे किंवा काम करणाऱ्या व माहिती घेण्यात हलगर्जी करणाऱ्या महा ई-सेवा केंद्रांवर कारवाई सुरू झाली आहे.

तर कोण आहेत अपात्र लाभार्थी? :

नावावर सुतभरही जमीन नसलेल्यांपासून मोठे पगार घेणारे सरकारी अधिकारी अपात्र लाभार्थी आढळले आहेत. 10000 रुपयांच्या वर पेन्शन घेणारेही अपात्र लाभार्थी आहेत. काहीं शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन असून, तेही लाभार्थी आढळले आहेत. कारण अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्याने गोंधळ उडाल्याचे दिसते आहे.

पश्चिम महाराष्ट्र
जिल्हा      अपात्र लाभार्थी     रक्कम वसूल करणार
कोल्हापूर     १३,४३७             १३.२६ कोटी
पुणे             १६,११८             १४.०७ कोटी
सोलापूर       १६,२१०             १५.१६ कोटी
सातारा        १९,०६६             ११.४३ कोटी
सांगली        १४, २६७             ११.३५ कोटी

विदर्भ:
जिल्हा         अपात्र लाभार्थी    रक्कम वसूल करणार
अमरावती     ७,६०३।            ५.८८ कोटी
बुलडाणा।     ५,९८६।            ५.३३ कोटी
अकोला।      ७,१०४              ४­.८९ कोटी
गडचिरोली    ९१०                ८३.३४ लाख
चंद्रपूर          ३,४६५              ३.४४ कोटी
यवतमाळ।    १५,०००।          ३ कोटी
गोंदिया         ३,१७१              ३.५७ कोटी
वाशिम         १,७२९               १.५४ कोटी
वर्धा             ४,३६६              ३.७८ कोटी
भंडारा          ३,२१३              २.६६ कोटी

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

उत्तर महाराष्ट्र
जिल्हा           अपात्र लाभार्थी रक्कम वसूल करणार
जळगाव         १३,१७२              १२.४८ कोटी 
नंदुरबार          १,७४६                १.७१   काेटी
नगर              २७,९६३               २२      कोटी
धुळे                ७,७२७                ७        काेटी
नाशिक           ११,८५४              ११.१० काेटी

मराठवाडा
जिल्हा          अपात्र लाभार्थी      रक्कम वसूल करणार
बीड              ३१,६६९।            १४.२७ कोटी
जालना          ५१२२                   ४.७५ कोटी
परभणी।        ४,६७७                  ४.२४ कोटी
नांदेड।           ९,९८५                  ७.४३ कोटी
लातूर            ८,५५१                   ८       कोटी
औरंगाबाद।    ७,५१६                   ७.९    कोटी
उस्मानाबाद अपात्र नाही –

Read  रेशनचे मोफत धान्य होणार बंद या महिन्यापासून मोजावे लागतील पैसे ration

कोकण
जिल्हा           अपात्र लाभार्थी      रक्कम वसूल करणार
रत्नागिरी        ५,६००।               २.११ काेटी

हे आपल्याला माहिती आहे का?

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

 

Leave a Comment