Maha Aawas Abhiyan Gharkul Yadi Maharashtra | महाआवास अभियान महाराष्ट्र

Maha Aawas Abhiyan Gharkul Yadi Maharashtra

आज आपण या लेखामध्ये एका महत्त्वपूर्ण शासन निर्णय बदल पाहणार आहोत या शासन निर्णयामुळे तुमचं स्वतःचं हक्काचं घर असणार आहे तुमचे घराचं स्वप्न होतं ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आपण घरकुल योजनेची आस धरून असतो.

मग यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना असो, रमाई योजना असो, शबरी आवास योजना असो, पारधी आवास योजना असो किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल आवास योजना असो, या सर्व योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत.

मात्र घरकुल योजना म्हटलं की तक्रारी आल्या जसं की काम होत नाही वेळेवर पैसे भेटत नाही. घरकुल लवकर मंजूर होत नाही, म्हणूनच या सर्वांवर विचार करता सर्वांना हक्काचे घर लवकर मंजूर व्हावं ते त्यांना मिळावं ह्याकरता एक अभियान सुरू करण्यात आलेल आहे ते आहे ‘महाआवास अभियान’

महाआवास अभियानाचा जीआर आपण आता बघणार आहोत. या अभियानांतर्गत दहा उपक्रम राबविले जाणार आहेत ज्यामध्ये घरकुलाचे मंजुरी असेल, त्याचा निधी वाटप करणार आहे, चांगल्या दर्जाचा घरकुल बांधून देणार आहे.

Read  Ration New Rules 2023 | राशन नवीन नियम २०२३

आपल्याजवळ असलेल्या कमी जागेमध्ये जास्त बांधकाम करून देणे आहे, शौचालय तयार करून देणार आहे घरामधील पाणीपुरवठा असेल अशा सर्व प्रकारच्या पायाभूत किंवा आधारभूत सुविधा आहेत ह्या सुविधा देण्या बरोबरच ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधणी करता जमीन नाही, अशा लाभार्थ्यास जमीन उपलब्ध करून देणे आहे, हे सर्व उपक्रम त्यामध्ये राबवले जाणार आहेत. आणि हा उपक्रम राबवत असताना विभाग, तालुका किंवा जिल्हा जे चांगलं काम करतील त्यांना पुढे पारितोषिक सुद्धा मिळणार आहेत.

शंभर दिवसांचा हा कार्यक्रम राज्य सरकारने सुरू केलेला आहे आणि त्याचा जीआर काय आहे तेच आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया

मित्रांनो एकूण 19 नोव्हेंबर 2020 चा जीआर आहे. जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यामध्ये महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याबाबत अशाप्रकारे हा जीआर आहे.

प्रस्तावना मध्ये सांगितल्याप्रमाणे ‘सर्वांसाठी घरे 2022’ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून, राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून त्यांना पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी सहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा योजनाही राबविण्यात येत आहेत

Read  Nashik Bharti Maharashtra 2022 | नाशिक भरती महाराष्ट्र २०२२ .

2020-21 या वर्षाकरता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 405077 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येये मधील ध्येय क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण 17 पैकी किमान 14 वर सकारात्मक प्रभाव पडणार आहे यासाठी घरकुलांच्या कामाची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी

नाविन्यपूर्ण कल्पना अमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे तसेच नैसर्गिक आपत्ती इस सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधकामासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे शासनाचे ध्येय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास योजना देशात दिनांक 20 नोव्हेंबर 2016 पासून अमलात आली असून दरवर्षी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय आवाज दिन म्हणून राबवण्यात येतो

Read  पिक विमा मंजुर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा Pik Vima

या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास दिनाचे औचित्य साधून राज्य राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता

शासन निर्णय

सन 2020 21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत महा आवाज अभियान ग्रामीण राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता ने हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment